सिल्वर ओकवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुंबईत शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एस टी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आता आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. गावदेवी पोलिसांकडून अजित मगर या आरोपीला हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. यानंतर या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत .

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्यानंतर या बैठकीत शरद पवार आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

एसटी आंदोलकांनी सिल्वर ओकवर केलेल्या आंदोलनानंतर राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला होता. मुंबईत महाविकास आघडीतील प्रमुख नेत्यांनी पवारांची भेट घेतली होती. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.