
गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळून आठवडा उलटत नाही तोच सोमवारी जुनागड जिह्यात आणखी एक पूल कोसळला. दुरुस्ती सुरू असताना हा अपघात झाला आणि 8 कामगार व बांधकाम साहित्य नदीत पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सर्व कामगारांना सुखरूप नदीतून बाहेर काढण्यात आले. मंगरोल तालुक्यातील अजाज गावात ही दुर्घटना घडली.