
राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच एटीएस आणि ईडीच्या पथकांनी भिवंडी तालुक्यातील पडघाच्या जवळ असलेल्या बोरिवली गावात बुधवारी रात्रीपासूनच छापेमारीला सुरुवात केली आहे.
दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी ईडी आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असल्याचे समजते. या तिन्ही पथकांच्या अधिकाऱ्यांनी बोरिवलीमधील काही घरांवर पहाटेच्या सुमारास छापेमारी करत कारवाई केली असून अद्यापही ही कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या भिवंडीतील पडघा-बोरिवली गावावर पुन्हा एकदा तपास यंत्रणांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.





























































