
सुरेल आवाजाचा देवदत्त वारसा लाभलेली आणि लहानपणापासूनच आईकडून संगीतधडे घेत असलेली गुणी गायिका अनुजा झोकरकर यांच्या सुरेल स्वरांचा आनंद घेण्याची संधी सूरसागर या मैफिलीच्या माध्यमातून रसिकांना मिळणार आहे. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता षण्मुखानंद पद्मा रंग चेंबर संगीत सभागृह येथे ही मैफल संपन्न होईल. भरत कामत आणि निरंजन लेले हे कलाकार अनुजा यांना तबला आणि हार्मोनियमवर साथ देणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या कार्यक्रमाकरिता मोफत प्रवेश देण्यात येईल.





























































