
अभिनेते अनुपम खेर यांची इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. ही पोस्ट समस्त टक्कल असलेल्या लोकांना आत्मीयतेचा सल्ला देणारी आहे. अनुपम खेर यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांचा फोटो शेअर करून लिहिलंय, ‘जर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला टक्कल असेल तर याचा अर्थ टक्कलवर काहीच उपाय नाही.’
पुढे अनुपम खेर यांनी असाही सल्ला दिलाय की, केस वाढवण्याच्या मागे लावून पैसे फुकट घालवू नका. बाल बाल बच गये आणि बाल की खाल मत निकाल असे हॅशटॅग त्यांनी जोडले आहेत. खेर यांच्या पोस्टवर नेटिजन्स भरभरून कमेंटस् करत आहे.

























































