
अभिनेत्री अनुष्का शर्माने फारूख इंजिनीअर यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे. फारूख इंजीनअर यांना उत्तर देताना अनुष्काने ट्विटर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.
इंग्लंड दौर्यादरम्यान हिंदुस्थान क्रिकेट निवड समितीतील लोक विराटची बायको अनुष्काला चहा द्यायचे असा दावा माजी क्रिकेटर फारूख इंजीनीर यांनी केला होता. त्यावर अनुष्काने जोरदार उत्तर दिले आहे. अनुष्काने म्हटले आहे आहे की, “स्वार्थासाठी माझे नाव लोक घेत असतात. गेली ११ वर्षे माझ्या करीअरमध्ये खोट्या आणि चुकीच्या बातम्यांवर गप्प होते. या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केल परंतु माझे गप्प बसणे ही लोकांना माझी कमजोरी वाटते.”
— Anushka Sharma (@AnushkaSharma) October 31, 2019
मी एक स्वावलंबी महिला आहे आणि मी स्वतःच्या जिद्दीवर आपले करीअर घडवले आहे. फक्त मी एका क्रिकेटरची पत्नी आहे. तसेच मी चहा नव्हे तर कॉफी पिते असेही अनुष्काने म्हटले आहे.
























































