‘अ‍ॅपल’चा चार लाख जणांना रोजगार

एकीकडे जगभरातील बडय़ा टेक कंपन्या हजारो कामगारांना कामावरून काढून टाकत असताना अॅपलने मात्र मोठय़ा संख्येने रोजगार मिळवून दिला आहे. आयफोन बनवणारी अॅपल कंपनी हिंदुस्थानात सर्वाधिक ‘ब्ल्यू कॉलर’ नोकऱया देणारी कंपनी ठरली आहे. अॅपलने दीड लाख कामगारांना अप्रत्यक्ष नोकऱया दिल्या आहेत. तसेच मागील 32 महिन्यात कंपनीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा चार लाख जणांना रोजगार दिला आहे. अॅपलने 2021 मध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना आणली तेव्हापासून कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. 19 ते 24 वर्षे वयोगटातील कामगार कंपनीशी अप्रत्यक्षरीत्या जोडले गेले आहेत.

अॅपलने 2017 साली हिंदुस्थानात आयपह्न मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले. त्यानंतर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हच्या (पीएलआय) माध्यमातून कंपनीने स्थानिक उत्पादन वाढवले.