
अमेरिकेतील टेक कंपनी ॲपल आणि गुगल कोरोना ट्रॅकिंग सिस्टमवर काम करत आहे. तसं तर covid-19 संदर्भात अनेक ॲप्स आणि वेबसाईट तयार झालेल्या आहेत. ज्यात शासकीय आणि खाजगी असे दोन प्रकार आहेत. मात्र गूगल आणि ॲपल कंपनी तुमच्या स्मार्टफोनलाच कोरोना ट्रॅकिंग डिव्हाईस मध्ये बदलण्याच्या तयारीत आहेत.
ॲपल आयओएस आणि अँड्रॉइड स्मार्टफोन जगात सर्वाधिक आहेत. अशातच अँड्रॉइड आणि आयओएस आधारित मोबाईलमध्ये कोरोना ट्रॅक्टर दिले जाऊ शकते. गुगल आणि ॲपल कंपनी इंटिग्रेटेड कोरोना ट्रॅक्टरवर काम करत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच याचे अपडेट लॉन्च केले जाऊ शकते. ॲपल आणि गुगल द्वारे बनवला जात असलेला हा कोरोना ट्रॅकर रोलिंग प्रॉक्सीमिटीवर काम करेल. ज्यात ब्लूटूथने ट्रान्सफर होत असलेल्या माहितीचा आधार घेतला जाईल. स्मार्टफोन वापरकर्त्याने हा कोरोना ट्रॅकिंग प्रोग्राम अनेबल केल्यानंतर त्याला त्याच्या आसपास कोरोना रुग्ण असल्यास त्या वापरकर्त्याला त्याबाबत नोटिफिकेशन द्वारे त्याची माहिती मिळेल.
पहिल्या चरणात ॲपल आणि गुगल एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसेस (एपीआय) रिलीज करेल. जे अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये फरक करेल. शासकीय आरोग्य संस्था संपर्क ट्रेसिंग अॅप्ससाठी हे एपीआय वापरू शकतील. जेणेकरुन लोकांना कळवले जाईल की ते कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले आहेत. तसेच एखाद्या रुग्णाची गोपनीयता लक्षात ठेवून ज्या वापरकर्त्यामध्ये कोरोनाचे लक्षण आहेत. त्या वापरकर्त्यांची माहिती दुसऱ्या वापरकर्त्याला मिळेल, मात्र ती पूर्णपणे कोडिट असेल माहिती.



























































