
मुंबई, दिल्ली या दोन शहरांनंतर अॅपलचे तिसरे स्टोअर आज उघडले आहे. अॅपलच्या दोन स्टोअरनंतर बंगळुरूमधील तिसऱ्या स्टोअरमध्ये अॅपल हेब्बलमध्येही ग्राहकांना मदत आणि प्रोडक्ट्स एक्सपीरियन्सची ऑफर मिळेल. बंगळुरूमध्ये तिसरे स्टोअर उघडल्यानंतर 4 सप्टेंबरला चौथे स्टोअर पुण्यात उघडले जाणार आहे. हे स्टोअर पुण्यातील कोरेगाव येथे उघडले जाणार आहे. याचाच अर्थ अॅपल कंपनीचे हिंदुस्थानात एकूण 4 अॅपल स्टोअर उघडले जाणार आहेत. हिंदुस्थानात अॅपलच्या प्रोडक्ट्सना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कंपनीने हिंदुस्थानवर चांगला फोकस केला आहे.