
प्रसिद्ध टेक कंपनी अॅपल 2025पर्यंत इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याच्या तयारीत आहे. अॅपल पूर्णपणे सेल्फ ड्रायव्हिंग कारवर काम करत आहे. या कारमध्ये स्टेअरिंग व्हील नसतील. कारमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी यू आकाराची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अॅपल वॉचचे सॉफ्टवेअर एक्झिक्युटीव्ह केविन लिंच यांना सेल्फ प्रोपेल्ड इलेक्ट्रिक कार सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अॅपल कंपनी 2014 पासून ‘प्रोजेक्ट टायटन’वर काम करीत असून त्याअंतर्गत कंपनी फ्युचरिस्टिक कार तयार करीत आहे.


























































