
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने आता हार्डवेअरहून जास्त एआय आणि नव्या आर्किटेक्चरवर फोकस करण्याचे ठरवले आहे. या धोरणांतर्गत कंपनी सिरी, व्हिजन प्रो आणि अन्य काही सॉफ्टवेअर टीममधील जवळपास 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. अॅपलच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग डिव्हिजनच्या इंटेलिजेंट सिस्टम्स एक्सपीरियन्स टीममध्येही कर्मचारी कपात करण्यात आली आहे.
अॅपलने डिजिटल असिस्टेंट सिरीला पूर्णपणे नव्या एआय सिस्टमवर तयार करण्याचे ठरवले आहे. कंपनीचा पह्कस आता अशा इंजिनीअरिंगवर आहे ज्याला जनरेटिव्ह एआय आणि आधुनिक एआय आर्किटेक्चरचा अनुभव आहे. या बदलामुळे आता जुन्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. सिरी आणि सॉफ्टवेअर टीममधील 100 पदे आणि व्हिजन प्रोमधील 100 पदे अशी एकूण 200 पदे संपुष्टात येतील.





























































