
अर्बन कंपनीपासून बोट कंपनीपर्यंतच्या 13 कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. या सर्व कंपन्यांना पब्लिक इश्यूमधून पैसे जमा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या 13 कंपन्यांचा आयपीओ येणार आहे. त्यामध्ये जुनिपर ग्रीन एनर्जी, ऑलकेम लाइफसाइंस, ओमनीटेक इंजिनीयरिंग, केएसएच इंटरनॅशनल, रवि इंफ्राबिल्ड प्रोजेक्ट्स, मौरी टेक, प्रायोरिटी ज्वेल्स, कोरोना रेमेडीज, ओम फ्रेट फॉरवर्डर्स, जैन रिसोर्स रीसायक्लिंग आणि पेस डिजिटेक या कंपन्यांचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यंत 50 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्या आहेत.