अर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर

514

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचे अफेअर सुरू झाल्यापासून ट्रोलर्स अभिनेत्यावर निशाणा साधत आहे. अर्जुनच्या प्रत्येक फोटोवर सोशल मीडिया युझर्स प्रतिक्रिया देत असतात. अनेकदा तो या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतो. परंतु एका युझरने दिलेल्या प्रतिक्रियेवर तो स्वत:ला कमेंट करण्यावाचून रोखू शकला नाही. ट्रोलरच्या नकारात्मक प्रतिक्रियेला अभिनेत्याने मजेशीर उत्तर दिले आहे.

अर्जुन कपूर याने एक छानसा, हसरा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. न्यूयॉर्क ट्रिप दरम्यान मलायका अरोरा हिने हा फोटो क्लिक केला होता. या फोटोवर अर्जुनने, जेव्हा ती मला हसताना पकडते, असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर एका युझरने ‘मी या व्यक्तीचा द्वेष करतो’, अशी प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया वाचून अर्जुनही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने या युझरला ‘तरीही तू मला फॉलो करतोय’ असे उत्तर दिले.

arjun

आपली प्रतिक्रिया द्या