अर्जुन रामपाल विरोधात फसवणुकीची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

अभिनेता अर्जुन रामपाल याच्याविरोधात एका कंपनीने फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. वाय एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने ही तक्रार दाखल केली असून या कंपनीकडून अर्जुनने 12 टक्के व्याजावर 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

अर्जुनने 9 मे 2018 ला वाय टी कंपनीकडून 1 कोटी रुपये व्याजाने घेतले होते. व्याजासहीत ते सर्व पैसे 90 दिवसांच्या आत परत देण्याचा करार कंपनीसोबत झाला होता. मात्र मुदत संपूनही अर्जुनने ते पैसे परत केले नाहीत. त्यानंतर अर्जुनने कंपनीला एक चेक दिला होता तो देखील बाऊन्स झाला. त्यामुळे कंपनीने अर्जुनविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.