सुरक्षेच्या कारणास्तव हिंदुस्थानी सैनिकांना फेसबुक, इन्स्टाग्रामसह 89 ऍप्स वापरण्यास बंदी

हिंदुस्थान चीन तणावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चायनीज ऍपवर बंदी घातली होती. आता हिंदुस्थानी सैनिकांना फेसबुक,इन्स्टाग्रमसह 89 ऍप्स वापरण्यावर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आऊटलूक या मासिकाने याबाबत वृत्त दिले आहे. हिंदुस्थान सरकारने सैनिकांना 89 ऍप्स वापरण्यास बंदी केली असून त्यातील बहुतांश ऍप्स हे अमेरिकन आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, वी चॅट या ऍप्सच समावेश आहे. तसेच टिंडर सारख्या डेंटिंग ऍप्सच्चाही समावेह्स आहे. 15 जुलै पर्यंत हे ऍप्स वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी हे ऍप्स वापरताना निदर्शनास आले तर त्यावर कारवाई केली जाई असे सैन्याने स्पष्ट केल आहे.

देशाची संवेदशनशील माहिती फुटली जाऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वीच केंद्र सरकारने टिकटॉक सारख्या चायनीज ऍप्सव बंदी घातली आहे. अमेरिकाही टिकटॉकवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या