
हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लवकरच पाकिस्तानसोबत आणखी एक युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “पुढील युद्ध लवकरच होऊ शकतं. आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल आणि यावेळी आपल्याला ही लढाई एकत्र लढावी लागेल.” मद्रास येथे ‘अग्निषोध’ – इंडियन आर्मी रिसर्च सेलच्या (IARC) उद्घाटनादरम्यान ते असं म्हणाले आहेत. याशिवाय ऑपरेशन सिंदूरबाबत जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान सरकारने आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, “आम्ही ऑपरेशन दरम्यान बुद्धिबळ खेळत होतो. आम्हाला माहित नव्हते की, शत्रूची पुढची चाल काय असेल आणि आम्ही काय करणार आहोत. त्याचप्रमाणे पाकिस्तानला देखील आमची चाल माहित नव्हती.”
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना उपेंद्र द्विवेदी म्हणाले-, “25 एप्रिल रोजी आम्ही नॉर्दर्न कमांडला भेट दिली. येथे आम्ही ऑपरेशनची योजना आखली, ज्यामध्ये आम्ही 9 पैकी 7 दहशतवादी अड्डे नष्ट केले, त्यात अनेक दहशतवादी मारले गेले.”