अर्णब गोस्वामीला पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राइकची पूर्वकल्पना होती! धक्कादायक माहिती उघड

टीआरपी घोटाळा प्रकरणातील दस्तऐवजातून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या घोटाळय़ातील आरोपी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यात व्हॉटस्ऍप चॅटद्वारे झालेला संवाद सोशल मीडियावर लीक झाला आहे. या कथित संवादातून अर्णब गोस्वामीला पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येत आहे.

टीआरपी घोटाळाप्रकरणी क्राईम बँचने 3600  पानांचे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल केले आहे. त्यातील 500 पाने ही गोस्वामी आणि गुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉटस्ऍप संवादाची आहेत. सोशल मीडियावर या संवादातील लीक झालेल्या माहितीमधून गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय व केंद्र सरकारमधील काही सदस्यांसोबत जवळीक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढविण्यासाठी केंद्र सरकारमधील काही उच्चपदस्थांची मदत घेतली जात होती. त्याबदल्यात भाजपला प्रसिद्धिच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न केला जात होता? असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील संभाषणातून अशी बरीच काही माहिती समोर येणार आहे असे एका इंग्रजी वेबपोर्टलने म्हटले आहे.

संवेदनशील विषयावर दोघांत चर्चा

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंत्यंत संवेदनशील विषय असणाऱया पुलवामा हल्ला व एअर स्ट्राईकच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती  व्हॉटस्ऍप चॅटमधून पुढे आली आहे. पुलवामा हल्ल्याची 4 दिवस आधी तर बालाकोट एअर स्ट्राईक संदर्भात 3 तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामीला माहिती होती. दासगुप्ता यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्यावेळी काहीतरी मोठे घडणार असल्याचा उल्लेख केला आहे.

दासगुप्ता जेजेच्या आयसीयूत

टीआरपी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना जे.जे.रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. 55 वर्षीय दास गुप्ता यांना अटक झाल्यावर तळोजा येथील जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

शुक्रवारी रात्रीपासून त्यांना हाय ब्लडप्रेशर व शुगरचा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी सकाळीच मुंबईतील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हॉटस्ऍप चॅटमध्ये कसल्या गप्पा सुरू आहेत?

  • फेब्रुवारी 2019 ते एप्रिल 2019 या काळात गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यात व्हॉटस्ऍप चॅटद्वारे झालेल्या संवादाचे स्क्रीन शॉट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
  • पुलवामात हल्ला होण्यापूर्वी चार दिवस आधीच अर्णब गोस्वामीला कश्मीरमध्ये काहीतरी गडबड होणार असल्याची कल्पना होती.
  • 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे प्रत्यक्ष दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी फक्त आपल्याच चॅनलचे लोक घटनास्थळी हजर असल्याचा दावा अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.
  • 23 फेब्रुवारी 2019 रोजी दासगुप्ता यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान काहीतरी मोठं घडणार असल्याचं गोस्वामी सांगितलं होतं.
  • 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट एअर स्ट्राइक झाला. त्यानंतर दासगुप्ता यांनी एअर स्ट्राइक हीच मोठी घटना ना, अशी विचारणा 27 फेब्रुवारीला व्हॉटस्ऍप चॅट करत केली.
आपली प्रतिक्रिया द्या