
आपल्या अंतराळात एका रहस्यमय पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा ‘3 आय/ अॅटलास’ नावाचा इंटरस्टेलर धूमकेतू आहे. हा धूमकेतू आकाशगंगेच्या बाहेरून आला आहे. तो ताशी 209214.72 किमी वेगाने पुढे सरकत आहे. नासाने अॅटलास धूमकेतूचा फोटो जारी केला आहे. त्यामध्ये हा धूमकेतू एका चमकदार बिंदूसारखा दिसत आहे. नासाने टिपलेल्या नव्या प्रतिमेत तर पाच चमकदार बिंदू धूमकेतूच्या सभोवती फिरताना दिसत आहेत. ते बघून सगळे हैराण झाले आहेत. ही एलियन थिअरी आहे की कॅमेऱ्याची गडबड? शास्त्रज्ञांच्या मते असे दृश्य खूप सामान्य आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे पाच चमदार ठिपके म्हणजे कॅमेऱ्याचे डिफ्रॅक्शन, सेन्सरचे रिफ्लेक्शन किंवा मागील तारे असावेत, जे धूमकेतूच्या चमकदारपणामुळे धूसर झाले आहेत. धूमकेतू ‘3 आय/ अॅटलास’ येत्या 19 डिसेंबर रोजी पृथ्वीच्या जवळून पण सुरक्षित अंतरावरून 17 कोटी मैलावरून जाईल. काही लोकांना हे एलियन तंत्र वाटत आहे. शास्त्रज्ञांना मात्र याबद्दल उत्सुकता दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये जेम्स वेब स्पेस दुर्बीण याचा बारकाईने अभ्यास करणार आहे.


























































