घराचे प्रवेशद्वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही घराचा मुख्य दरवाजा फार महत्त्वाचा असतो. कारण येथूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे मुख्य दरवाजाचे वास्तुशास्त्र योग्य असेल तर बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून घर सुरक्षित राहते. प्रवेशद्वारासाठी काय चांगले, काय वाईट ते पाहणे महत्त्वाचे ठरते.

– घराच्या मुख्य दरवाजावर सकाळी गंगाजल शिंपडावे. हे कार्य सकाळी घरातील स्त्री म्हणजेच गृहलक्ष्मीने करावे.

– घराच्या प्रवेश द्वारावर स्वस्तिक बनवल्यामुळे सर्व प्रकारच्या वास्तुदोष नाश होतात. प्रवेशद्वारावर रांगोळी काढली तर लक्ष्मीची कृपा राहते.

– वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व आणि पश्चिम दिशेला असेल तर ते चांगले मानले जाते. कारण या दिशेला असलेला दरवाजा घरामध्ये सुख-समृद्धी घेऊन येते.

– घराचे दरवाजे नेहमी दोन फाळक्यांचे असले पाहिजे. कारण ज्या घराचे प्रवेशद्वार दोन फाळक्यांचे नसेल तर घर मालकाचे आयुष्य कमी होते.

– घराचा मुख्य दरवाजा तुटलेला किंवा सडलेला नसावा. खरं तर घराचे प्रवेशद्वार सुख-समृद्धी आणि मान-सन्मान देत असतो.

– घराचा मुख्य दरवाजा नेहमी घराच्या आतील बाजूस उघडणारा असावा. कारण घराचा दरवाजा बाहेर उघडणारा असेल तर सतत अप्रिय आणि वाईट बातम्या ऐकायला मिळू शकतात.