
>> चंद्रहास रहाटे
गुढीपाडवा जवळ येतोय. यानिमित्ताने गुंतवणूक म्हणून घर किंवा दुकान खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पर्याय शोधणे सुरू केले असेल. प्रॉपर्टी म्हणजे अशी वस्तू नाही की, स्वतःकडचे पैसे दिले व विकत घेतली. आपण जर अभ्यास केला तर कर्ज काढून प्रॉपर्टी घेणाऱयांचे प्रमाण आपणास अधिक आढळेल.
2005 पूर्वी प्रॉपर्टीचे भाव आजच्या मानाने अत्यल्प होते. 2016 पर्यंत याच प्रॉपर्टीने भाव चढत जाऊन उच्चांक गाठला. त्या काळात ज्यांनी कर्ज काढून प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली ते फायद्यात गेले, पण 2016 नंतर प्रॉपर्टीच्या चढय़ा भावात ज्यांनी कर्ज काढून गुंतवणूक केली ती मात्र आज फायदेशीर ठरलेली दिसत नाही. 2016 पासून 2023 पर्यंत प्रॉपर्टीचे भाव जेमतेम वाढले. त्यामुळे कर्जाचे व्याज लक्षात घेता 2016 ला घेतलेली प्रॉपर्टी आज विकायची झाली तर कुणाला नाममात्र फायदा झाला असेल तर काहींसाठी हे समीकरण तोटय़ाचे ठरले असेल.
जर आपली आधीच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक असेल तर
व्हर्च्युअल प्रॉपर्टीच्या पर्यायाचा विचार करायला काय हरकत आहे? आपण गॅरेंटेड इन्कम देणाऱया विमा पॉलिसीमध्ये व म्युच्युअल फंडात म्हणजेच व्हर्च्युअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवले तर कर्ज घेऊन प्रॉपर्टी घेण्यापेक्षा आपणास अधिक फायदा होऊ शकतो. यात रॉकेट सायन्स नाही, पण कर्जामुळे जे आपण व्याज भरणार आहोत ती रक्कम गुंतवणुकीसाठी उपयोगी आणल्यामुळे हे समीकरण अत्यंत आकर्षित होते.
कर्जाकर प्रॉपर्टी घेतल्यामुळे क्याजाचे गणित मांडले तर लक्षात येते की एक कोटीच्या
प्रॉपर्टीसाठी आपण वीस वर्षांत 2 कोटी 40 लाख रुपये भरले आहेत व प्रॉपर्टीची किंमत जर 20 वर्षांत चार कोटी जरी झाली तर फायदा मात्र एक कोटी साठ लाखाचा झाला.
मिळालेले भाडे व भरलेला मेंटेनन्स याचं गणित मांडलं तरीही समीकरण तेवढं आकर्षक नाही.
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)


























































