
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
आपल्याकडे अजूनही मानसिक स्वास्थ्याला फारसे महत्त्व दिले गेलेले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक आजारांबाबत असलेलं औदासीन्य. ‘अध्ययन अक्षमता’ म्हणजेच ‘लर्निंग डिसऑबिलिटी’च्या बाबतीत बोलायचे झाले तर अशा व्यक्तींच्या पूर्ण राहणीमानावर तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र याविषयी अजूनही तितकी जागरूकता नाही हेच खरे.
महेश (नाव बदलले आहे) हा तिशीतला होतकरू तरुण होता. त्याला समुपदेशनासाठी यायचे होते, पण त्याची वेळ काही जुळून येत नव्हती. तो समुपदेशनासाठी अपॉइंटमेंट घेत असे, त्याच वेळेस त्याचे ऑफिसचे काम येई. महेशचे फिरतीचे काम असल्याने तो ऑफिसमध्ये दोनेक तासांकरिताच असे. बाकीच्या वेळेस त्याला फिरतीवर जावे लागे.
शेवटी एकदा महेशने एक दिवसाची रजा घेतली आणि तो अपॉइंटमेंट घेऊन आला. ‘‘मॅडम, मला जॉब चेंज करायचा आहे.’’ त्याला कारण विचारले असता महेश उत्तरला ‘‘मला आता मिळणारा पगार खूपच कमी आहे. माझ्या वयाचे माझे मित्र दुपटीने कमवत आहेत. मी मात्र कमी शिक्षणामुळे असाच राहिलो.’’ अतिशय खिन्न होऊन तो आपल्या भावना व्यक्त करत होता.
महेश हा फक्त दहावी पास झाला होता. तेही दोनदा परीक्षेला बसून! नंतर त्याने पुढे शिकणं सोडूनच दिलं. त्याच्या कमी शिक्षणाबद्दल छेडले असता त्याला त्याची समाधानकारक उत्तरे काही देता आली नाहीत. फक्त तो ‘‘मला अभ्यास समजायचा नाही’’ असंच बोलत होता. महेशला आता या त्याच्या समस्येबद्दल अधिक बोलतं करणं गरजेचं होतं. कारण त्याच्या बोलण्यातून त्याला ‘अध्ययन अक्षमता’ असल्याचे जाणवत होते.
अर्थात, हे ठोस अनुमान नव्हतं. महेशला त्याच्या शालेय जीवनाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले, ज्यातून त्याच्या या समस्येचा आणि ती त्याच वेळेस ओळखता न आल्याने तिच्या अनुषंगाने वाढलेल्या इतर समस्यांचाही उलगडा झाला.
महेशला तो शाळेत असतानाच लिखाण आणि वाचन जमत नसे. गणित विषयातही तो चिन्हांमध्ये गडबडून जात असे. हळूहळू त्याला अभ्यासाचा पंटाळा येऊ लागला आणि वर्गात त्याची मस्ती वाढायला लागली. एक मस्तीखोर आणि ‘ढ’ विद्यार्थी म्हणून त्याची गणना व्हायला लागली. घरीही तो अभ्यासच करत नसे. त्याचे आईवडील तसे कमी शिकलेले होते. त्यामुळे त्यांच्या महेशकडून अपेक्षा जास्त होत्या. त्याची अभ्यास न करण्याची कारणे त्यांच्या लक्षात येणं शक्यही नव्हतं. त्यामुळे घरी आणि नातेवाईकांकडेही तो ‘वाया गेलेला, कमी डोक्याचा’ अशा प्रकारची कुप्रसिद्धी मिळवत होता.
कसाबसा काठावर दहावी झाल्यावर महेशने शिक्षणाचा नाद सोडून कुरियर पंपनीत नोकरी पकडली. तो पार्सल्स पोचवण्यासाठी सारखा बाहेरच असायचा. तिथेही एक गोची होती. त्याला रस्ते आणि दिशा यांमध्ये कायम गोंधळ असायचा. त्यामुळे त्याच्याकडून पार्सल्स वेळेत पोहोचायचीच नाहीत. त्याचा परिणाम महेशच्या पगारवाढीवर झाला होता, पण तरीही त्याच कुरियर पंपनीत तो टिकून होता तो केवळ स्वतःच्या प्रामाणिकपणामुळे आणि कष्टाळू स्वभावामुळे.
‘‘मी काय करू मॅडम? हल्ली मी इतका चिडखोर स्वभावाचा झालोय ना की, सारखा छोटय़ा मोठय़ा कारणांवरून इतरांवर म्हणजे माझ्या घरच्यांवर वैतागतो. नंतर मलाच वाईट वाटत राहतं. एकतर साध्या-साध्या गोष्टी समजत नाहीत, हिशेब जमत नाही. घरचे लग्नाचं पाहताहेत मात्र कमी पगार म्हणून नकार मिळतोय. मला हल्ली खूप उदास उदास वाटायला लागलं आहे.’’
महेशची ही समस्या कित्येकांच्या बाबतीत घडली असेल. म्हणूनच मानसिक स्वास्थ्य, मानसिक आजार आणि त्यावरचे उपाय अत्यावश्यक झालेले आहेत.
आपल्याकडे अजूनही मानसिक स्वास्थ्याला फारसे महत्त्व दिले गेलेले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक आजारांबाबत असलेलं औदासीन्य. त्यामुळे त्या सर्वांची माहिती मिळवण्याचे फारसे कष्ट घेतले जात नाहीत. आता ‘अध्ययन अक्षमता’ म्हणजेच ‘लार्ंनग डिसऑबिलिटी’च्या बाबतीत बोलायचे झाले तर अशा व्यक्तींच्या पूर्ण राहणीमानावर तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
आजही बऱयाच शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्यावर प्रामुख्याने अध्ययन अक्षमतेच्या जागरूकतेविषयी बोलले जाते खरे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये ‘अध्ययन अक्षमता’ असल्यास पुढील पावले कशी उचलावीत अथवा यावर उपाय काय असू शकतात याविषयी मार्गदर्शन कमी पडते. काही वेळा मार्गदर्शन व्यवस्थित मिळाले तरी उपलब्ध स्रोतांची कमतरता जाणवते. म्हणूनही काही विद्यार्थ्यांमध्ये ‘अध्ययन अक्षमता’ असल्यास त्यांना त्या त्या वेळी योग्य ती दिशा मिळत नाही आणि ही समस्या त्यांना पुढील काळात अधिक गंभीर होऊन सतावू शकते.
महेशच्या बाबतीत असेच झाले होते. घरची गरिबी, आईवडील कमी शिकलेले आणि शाळेकडून न झालेले निदान या सगळय़ाचा एकत्रित फटका त्याला त्याच्या उभारीच्या वयात बसला. महेशसमोर आता होऊन गेलेल्या परिस्थितीला दोष न देता त्या परिस्थितीशी दोन हात करायचं आव्हान होतं. त्यासाठी त्याला स्वतःवर विश्वास ठेवणं अधिक गरजेचं होतं. ‘Move On’ (पुढे चल) हा सल्ला त्याला सर्वप्रथम देण्यात आला. स्वतःच्या ‘कमतरता’ स्वीकारत आणि त्यावर स्वतःच्या ‘गुणांसह’ पुढे प्रगती करण्याचे काही मार्ग त्याला सांगण्यात आले. शेवटी तो त्याच्याकडे असलेल्या चांगल्या गुणांमुळे नोकरी टिकवून होता हेही त्याच्या मनावर ठसवण्यात आले.
याचबरोबर ‘अध्ययन अक्षमता’ चाचणी करून घेण्यासाठी खात्रीलायक पेंद्रांची नावे सुचवण्यात आली.
महेश आता स्वतःवर अधिक मेहनत घेत होता. शिवाय स्वतःच्या रागावरही नियंत्रण ठेवायला हळूहळू शिकत होता. त्याच्या पंपनीतही त्याच्या समस्येबद्दल कळवण्यात आले होतेच. त्यामुळे त्याच्या पंपनीकडूनही त्याला आवश्यक ते सहकार्य दिले गेले. समुपदेशनाच्या जोडीला त्याने योगसाधना आणि इतर उपचार पद्धतीही शिकण्यास सुरुवात केली. आज महेश त्याच्या सचोटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर पुढे जातोय.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]






























































