विमुक्ता – कोरोनावरील संजीवनी लसची जनक : ओझ्लॅम टुरेसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

साथरोगाच्या जागतिक संकटांमध्ये अत्यंत झपाटय़ाने प्रसार होणारा कोरोना हा पहिलाच साथरोग ठरला. देशोदेशीचे शास्त्र्ाज्ञ त्यावर उपाय शोधण्यासाठी दिवसरात्र एक करू लागले. मात्र, फायझर-बायोएनटेक कंपनीने कोरोनावर पहिली लस तयार केली, त्या लसचे जनक होते वैद्यकीय शास्त्र्ाज्ञ दांपत्य ओझ्लॅम टुरेसी आणि ऊउर शाहीन. ओझ्लॅम या यशस्वी अब्जोपती उद्योजक आहेत, बायोएनटेक (बायोफार्मास्युटिकल न्यू टेक्नॉलॉजीज) कंपनीच्या सहसंस्थापक आहेत. मात्र, त्याचबरोबर त्या वैद्यकीय शास्त्र्ाज्ञ, कर्करोगप्रतिबंधक औषधांच्या संशोधक आणि रोगप्रतिकारक चिकित्सक, प्राध्यापक आहेत. आजवर त्यांनी विविध रोगांवर लसी तयार केल्या आहेत. तथापि, तत्परतेने कोरोनाची पहिली लस तयार केल्यामुळे त्यांचे नाव मानवी वैद्यकीय रोगप्रतिबंधक इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले.

डिसेंबर 2019मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला, ही बातमी वाऱयासारखी जगभर पसरली. जोपर्यंत बातमी जगाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहोचते, त्याच अत्यल्प अवधीत जगभर कोरोनाचा प्रसार झाला. साथरोगाच्या जागतिक संकटांमध्ये अत्यंत झपाटय़ाने प्रसार होणारा कोरोना हा पहिलाच साथरोग ठरला. या रोगाची तीव्रता इतकी अधिक होती की, युरोपियन देशांमध्ये, चीन, अमेरिकेमध्ये मृतांचे ढीग लागले. हिंदुस्थानची परिस्थितीही वेगळी नव्हती. देशोदेशीचे शास्त्र्ाज्ञ त्यावर उपाय शोधण्यासाठी दिवसरात्र एक करू लागले. मात्र, फायझर-बायोएनटेक कंपनीने कोरोनावर पहिली लस तयार केली, त्या लसचे जनक होते वैद्यकीय शास्त्र्ाज्ञ दांपत्य ओझ्लॅम टुरेसी आणि ऊउर शाहीन.

खरं तर वैयक्तिक, आर्थिक यशापेक्षा मानव कल्याणकारी कार्य करणाऱया महिला, अशा अफलातून प्रभावी स्त्रियांचे जीवनयुद्ध मांडण्याचा विमुक्ता सदराचा उद्देश असतो. ओझ्लॅम या यशस्वी अब्जोपती उद्योजक आहेत, बायोएनटेक (बायोफार्मास्युटिकल न्यू टेक्नॉलॉजीज) कंपनीच्या सहसंस्थापक आहेत. मात्र, त्याचबरोबर त्या वैद्यकीय शास्त्र्ाज्ञ, कर्करोगप्रतिबंधक औषधांच्या संशोधक आणि रोगप्रतिकारक चिकित्सक, प्राध्यापक आहेत. आजवर त्यांनी विविध रोगांवर लसी तयार केल्या आहेत. तथापि, तत्परतेने कोरोनाची पहिली लस तयार केल्यामुळे त्यांचे नाव मानवी वैद्यकीय रोगप्रतिबंधक इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले.

ओझ्लॅम (जन्मः 6 मार्च,1967) तुर्की विस्थापित कुटुंबात जन्मल्या. त्या मूळच्या वेस्ट जर्मनीच्या, झिगन या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांची आई जीवशास्त्र्ाज्ञ, तर वडील विख्यात शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी सारलँड विद्यापीठ, होमबर्ग येथून 1992 मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. 2002 मध्ये त्यांनी ‘कॅन्सरसदृश गाठींचा शोध, लक्षणे आणि कर्करोग प्रतिबंधक चिकित्सेचा विकास’ या विषयात डॉक्टरेट पदवी संपादित केली. जर्मनीमध्येच त्यांनी ‘रेणीव औषधप्रणाली’ (मॉलिक्युलर मेडिसीन) या विषयाच्या प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. पदवी शिक्षण घेत असताना त्यांची जन्माचा जोडीदार ऊउर शाहीन यांची भेट झाली. कर्करोगावरील प्रतिबंधक औषधी शोधणे हा दोघांच्या संशोधनाचा समान धागा होता. 2002 मध्ये हे दोघे शास्त्र्ाज्ञ विवाहित झाले. मेरी आणि पिएरे क्युरी या दोन नोबेल विजेत्या शास्त्र्ाज्ञांप्रमाणेच ओझ्लॅम आणि ऊउर दांपत्य तितक्याच समर्पणाने, विनम्रतेने औषधी क्षेत्रात संशोधन करत आहेत. अब्जावधी श्रीमंत असूनही ते सायकलवरून प्रयोगशाळेत जातात. रोगप्रतिकारक संशोधन त्यांच्यासाठी करमणूक आणि जगण्याचे प्रयोजनदेखील आहे.

2008 मध्ये त्यांनी बायोएनटेक ही औषध निर्माण कंपनी सुरू केली. अल्पावधीतच उद्योगातील यशामुळे शास्त्र्ाज्ञ जोडपे अब्जोपती ठरले. कॅन्सर रोगावर रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी ही कंपनी औषधी तयार करते. त्यांनी जैव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मेसेंजर-आरएनए हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले.

साधारणपणे कोणतीही लस तयार करायला दहा ते पंधरा वर्षांचा कालखंड अत्यावश्यक समजला जातो. लस तयार केल्यानंतर त्याचे तात्कालिक, शारीरिक, मानसिक, दूरगामी आणि आनुवंशिक परिणाम तपासले जातात. प्रतिजैविकांच्या मानवी चाचण्या होतात. ही सगळी प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ ठरते. तोपर्यंत साथरोग्यापासून बचावात्मक सुरक्षित राहणे हाच उपाय ठरतो. तोही फारसा परिणामकारक ठरत नाही. प्रत्येक साथरोगामुळे आजवर लाखो जीवांची हानी झाली, मानव समूहच्या समूह नष्ट झाले तेव्हा लस सापडली हा इतिहास आहे. कॅमिनॅटी लस वर्षभरातच उपलब्ध झाली असली तरी तिच्या संशोधनामागे केवळ एक वर्षाची मेहनत नाही. एम-आरएनए या तंत्रज्ञानावर ओझ्लॅम आणि ऊउर यांनी 1990 मध्ये प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात केलेली होती. हे संशोधन 2012 मध्ये पहिल्या रुग्णासाठी वापरले. एकूण बावीस वर्षांच्या संशोधनानंतर निर्माण झालेले जैव तंत्रज्ञान भविष्यात संपूर्ण मानवजातीला उपयुक्त ठरेल याची कल्पना ना या दोघा शास्त्र्ाज्ञांना होती, ना सामान्य नागरिकांना.

जर्मनीच्या चॅन्सलर आणि मुळात रसायनशास्त्र्ाज्ञ असलेल्या डॉ. एंजिला मर्केल म्हणतात, आपल्या देशात पहिली लस तयार झाली याचा आणि ओझ्लॅम आणि ऊउर यांचा अत्यंत अभिमान वाटतो. ओझ्लॅम यांच्यावर विविध पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव झाला. त्यांना अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. मेंझ देशाचे सन्माननीय नागरिकत्वही त्यांना मिळाले. जर्मन सार्वकालिक सन्माननीय व्यक्ती म्हणून ओझ्लॅम आणि ऊउर यांचा सन्मान झाला. गेल्या एक वर्षापासून ओझ्लॅम विविध विद्यापीठात ‘प्रतिबंधात्मक चिकित्साशास्त्र्ा’ या विषयाची व्याख्याने देत आहेत.

कोरोना या जटील अतिदुर्धर आणि अतिवेगवान साथरोगामुळे संपूर्ण जगावर मोठे संकट ओढवले होते. संपूर्ण मानवजात नष्ट होणार अशा संभाव्य धोक्याच्या काळात ओझ्लॅम यांनी शोधलेली लस वरदान ठरली. आज वेगवेगळ्या कंपन्यांनी लसनिर्मिती केली आहे, तरी ओझ्लॅम यांचे संशोधन मूलगामी आणि महत्त्वपूर्ण आहे, हे निर्विवाद!

कोरोनाचा रेणू काटेरी वर्तुळाकार आरएनए आहे हे समजल्यावर त्यावर एम-आरएनएचे त्यांचे संशोधन उपयोगी ठरू शकते हे त्यांच्या लक्षात आले, परंतु हे काम खर्चिक आणि जोखमीचे होते. त्यांनी फायझर कंपनीचा आणि अमेरिकेचा आर्थिक हातभार मिळवला. एकदा अर्थसहाय्य मिळाले की, दोघेही युद्धपातळीवर संशोधन कार्यात बुडाले. साधारण मार्चपर्यंत त्यांची लस दृष्टिक्षेपात आली, त्याबद्दलची माहिती त्यांनी वैद्यकीय मासिकांना दिली. डिसेंबर 2020 मध्ये अन्न आणि औषध प्राधिकरण यांनी कोरोना प्रतिबंधक ‘कॅमिनॅटी’ लसीला मान्यता दिली. वैद्यकीय आणि जैव तंत्रज्ञान शाखेमध्ये इतकी अतिजलद लस तयार झाल्याचा हा पहिलाच प्रयोग होता.

– [email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत.)