।। ॐ सूर्याय नमः ।।

1094

>> डॉ. नेहा सेठ

सूर्याचे संक्रमण पर्व. सूर्य आपल्या जगण्यातील अविभाज्य, प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारी तेजाची देवता. सकाळचे कोवळे ऊन रोज अंगावर घेतले, सकाळच्या सूर्याकडे पाहिले तर सूर्यदेव आपल्याला भरभरून आरोग्यदान देतो.

सूर्य… संपूर्ण सृष्टी उजळवून टाकणारा. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून सूर्याची उपासना करण्याचे महत्त्व सांगितले जाते… सूर्याला देवता मानले जाते… तिचे वैशिष्टय़ असे की, व्यक्ती तिचे दर्शन प्रत्यक्ष घेऊ शकते… सूर्य उगवल्याशिवाय आपल्या दिवसालाच सुरुवात होऊ शकत नाही… त्यासाठी दररोज सूर्योदयापूर्वी स्नानादी कार्ये आटोपणे महत्त्वाचे मानले जायचे… सूर्योदय झाल्यानंतर त्याच्यासमोर नतमस्तक होऊन डोळे मिटून त्याची प्रार्थना केल्याने उत्तम आरोग्यासह व्यक्तीचे जीवनही उजळून निघते. याकरिता आजही आपण सूर्योपासना करून तिचा फायदा घेऊ शकतो. सूर्यास्तानंतर घराघरातून तुळशीपाशी दिवे लावतात. सूर्य आपले तेज आणि शक्ती सायंकाळी देवाजवळच्या दिव्याला देऊन जातो म्हणून देवापाशी दिवा लावावा.

अग्निहोत्राचे महत्त्व
अग्निहोत्राचा विधी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेप्रमाणे केला जातो. अगदी छोटा असणारा हा विधी कुठेही करता येतो. यामध्ये सूर्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते की, ‘‘तू दिवसभर आमच्यासाठी थांबलास. तुझ्यामुळे आम्हाला दिवसाची ऊर्जा मिळाली. त्याच्यामुळे आम्हाला सर्व कामे करता आली.’’ त्यामुळे ज्या ठिकाणी अग्निहोत्र केला जातो तेथे सकारात्मकता नांदते.17

अर्ध्य कसे द्यावे?
रोज सकाळी तांब्याच्या लोटीमध्ये स्वच्छ पाणी घ्या. त्यानंतर सूर्याच्या समोर उभे राहून दोन्ही हातांनी लोटय़ाला उंच उचलून सूर्याला अर्ध्य अर्पण करा. म्हणजे त्यातील पाणी खाली सोडून द्या. अर्ध्याच्या पाण्यात लाल फुले, अक्षता, कुंकू टाकावे. अर्ध्य वाहताना खालील मंत्र म्हणून संकल्प सोडावा-
एहि सूर्य! सहस्रांशो! तेजो राशे! जगत्पते!
अनुकम्प्यं मां भक्त्या गृहाणार्घ्य दिवाकर

(अर्थ – हे सहस्रांशो, हे तेजोराशे, हे जगत्पते, माझ्यावर कृपा करा. मी श्रद्धापूर्वक अर्पण केलेले हे अर्ध्य स्वीकारा.)

त्याचप्रमाणे खालील मंत्रांमध्येही सूर्याला आवाहन केले आहे. या मंत्रामध्येही दिव्य शक्ती आहे –

ॐ आरोग्य प्रदायकाय सूर्याय नमः।
ॐ हीं हीं सूर्याय नमः। ॐ आदित्याय नमः।
ॐ घ्रणि सूर्याय नम

अशा प्रकारे सूर्य नमस्कार व सूर्योपासनेद्वारे शरीराला निरोगी, सुखी व समृद्ध बनविता येते. त्यासाठी सूर्योपासना जरूरीची आहे.

सूर्यापासनेचे फायदे
– सूर्याच्या किरणांमुळे शारीरिक व मानसिक रोगांपासून निवारण होते. यासाठी त्याची उपासना करायची.
– सूर्योपासना सकाळी लवकर केली जाते. त्यामुळे आपण सूर्याबरोबर उठलो आणि सूर्याबरोबर झोपलो की शरीराचं चक्र व्यवस्थित सुरू राहतं.
– सूर्य म्हणजे प्रचंड उैर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे 10 मिनिटं जरी सकाळी सूर्यप्रकाशात उभं राहिलं तरी शरीरावरची म्लानता, निराशा दूर होते आणि एकूणच उत्साही वाटतं.
– जीवनसत्त्व ‘ड’ची ज्यांच्या शरीरात कमतरता आहे आणि त्यांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावं. त्यामुळे त्वचेचे सगळे विकार दूर होतात.
– सूर्योपासनेमुळे सर्व विषयांत, व्यापारात, उद्योगधंद्यात जयप्राप्ती होते. अन्य उपासनांपेक्षा सूर्योपासना जलद फलप्राप्ती करून देणारी आहे.
– सूर्योपासनेमुळेच वातावरण शुद्ध होऊन रोगराईचे निवारण होते. हा सूर्य पृथ्वीपासून 9 कोटी मैल दूर आहे तरीसुद्धा सूर्याचा प्रभाव या पृथ्वीवर सतत आहे. सूर्योपासनेमुळे कर्करोगासारखा
रोगही बरा होतो.
– ज्येष्ठांनी स्मृतिभ्रंश न होण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरावे. या उपासनेमुळे शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होतं. भोवतालचे जीवजंतू नष्ट होतात.
– सूर्याच्या उपासनेमुळे बल, शक्ती, स्मरण, तेज, ज्ञान आणि आरोग्य यांची प्राप्ती होते. या उपासनेमुळे वाईट स्वप्ने पडत नाहीत.
– सूर्याच्या दर्शनाने अपवित्र मानवही पवित्र होतो असे मानले जाते.
– ज्याला चांगले आरोग्य पाहिजे, त्याने सूर्योदयापूर्वीच उठून अंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्ध्य देऊन नमस्कार केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या