
>> डॉ. संजय बोरुडे
मानव टोळ्या करून राहत असताना टोळीतील माणसांची ओळख पटण्यासाठी काहीएक लोकसंकेत किंवा लोकचिन्ह आवश्यक ठरले. निसर्गातील परिचित वस्तू तसेच कुटुंब, घराणे, कूळ, वंश अथवा जमातींचे प्रतीक असलेला, त्यांच्या पूर्वजांची ओळख जपणारा किंवा भूतकाळाशी संबंध असणारा एखादा प्राणी, पक्षी, झाड, फूल, पान किंवा एखादी वस्तू म्हणजेच टोटेम किंवा कुलचिन्ह होय. कुलचिन्ह म्हणजे निसर्गाच्या अनुभूतीतून व्यक्त होणारे, त्यांना जगण्याची आगळी ओळख देणारे चिन्ह असे म्हणता येईल.
कुलचिन्ह म्हणजे देवक. लग्न जमवताना आजही आपण नाते-गोते पाहतो. नात्यांचा धागादोरा लागला की, देवक पाहतो. दोन्ही घराण्यांचे देवक जर एकच असेल तर ती सोयरीक होत नाही. कारण ते एकाच कुळातले ठरतात. युवावस्थेच्या काळात मानव टोळ्या करून राहत असताना टोळीतील माणसांची ओळख पटण्यासाठी काहीएक लोकसंकेत किंवा लोकचिन्ह आवश्यक ठरले. एखादा मानव रस्ता चुकून दुसऱया टोळीत शिरला किंवा दुसऱया टोळीला भेटला तर त्याची ओळख पटवणे गरजेचे ठरले. म्हणून टोळ्यांनी आपापले चिन्ह ठरवले. हे ठरवताना निसर्गातील परिचित वस्तू तसेच कुटुंब, घराणे, कूळ, वंश अथवा जमातींचे प्रतीक असलेला, त्यांच्या पूर्वजांची ओळख जपणारा किंवा भूतकाळाशी संबंध असणारा एखादा प्राणी, पक्षी, झाड, फूल, पान किंवा एखादी वस्तू म्हणजेच टोटेम किंवा कुलचिन्ह होय. हे चिन्ह आदिम जमाती, भटक्या-विमुक्त टोळ्या, पशुपालक, प्राथमिक शेती करणारे, पारंपरिक वस्तू विनिमय पद्धत असणाऱया लोकसमूहांचे वैशिष्टय़ ठरले. कुलचिन्ह म्हणजे निसर्गाच्या अनुभूतीतून व्यक्त होणारे, त्यांना जगण्याची आगळी ओळख देणारे चिन्ह असे म्हणता येईल.
मध्यंतरी आलेल्या ‘अवतार’ या इंग्रजी चित्रपटात निळ्या रंगाचे लोक आपली शेंडी वडासारख्या पारंब्यांना लावून पूर्वजांचे आवाज ऐकताना दाखवले आहेत. आपण कोठून आलो किंवा आपले पूर्वज कोण होते याविषयी एक आस्था, श्रद्धा आणि कुतूहल प्रत्येकाच्याच मनात असते. त्याच्याशी जोडून घेण्याची एक इच्छा असते. त्यातून आपली मुळे किंवा ऊर्जःस्वल परंपरा शोधण्याकडे माणसाचा कल असतो.
निसर्गातील प्राणी, पक्षी तसेच पाणी, आग/ वणवा यांचे भयकारी रूप पाहिल्यानंतर भीतीने किंवा त्याचा आपल्यावर कोप होऊ नये म्हणून त्यांना आपल्या आदिम भावविश्वात श्रद्धापूर्वक प्रतिष्ठापना केली गेली. म्हणजेच त्यांना कुलचिन्ह म्हणून मान्यता देण्यात आली.
कॉ. शरद पाटील यांच्या मते प्राचीन मातृसत्ताक कुटुंब संस्थेकडून पितृसत्ताक कुटुंब पद्धतीकडे आपण आलो आहोत. मातृसत्ताक व्यवस्थेत मातेच्या नावावरून मुले ओळखली जायची. उदा. कौंतेय म्हणजे कुंतीपुत्र, राधेय अर्थात कर्ण. स्त्र्ााrकडे किंवा पशुपक्ष्यांतील माद्यांकडे जन्म देण्याची अद्भुत शक्ती आहे. त्यामुळे तिला दैवत स्वरूपात पुजले जाणे साहजिक होते. स्त्र्ायांनीच शेतीचा शोध लावला आणि आदिम पशुपालक समाज स्थिर झाला. त्यातूनच पाण्याच्या स्रोताजवळ संस्कृती उदयास आली. स्फ्यू नावाच्या झाडाच्या काठीने स्त्र्ााrने पुरुषाला जमीन कशी नांगरायची ते शिकवले. स्त्र्ााrनेच निसर्गातील नैसर्गिक संसाधनाच्या प्रति कृतज्ञ राहायला शिकवले. यातूनच मातृदैवतांचा विकास झाला.
वणवा का लागतो याचा कार्यकारणभाव न समजल्याने अग्नीचा आपल्यावर प्रकोप होऊ नये म्हणून त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याला दैवत मानले गेले. लोकमानसात्माती किंवा वारूळ ही भूमीची कुक्षी मानली गेली आणि नाग किंवा नांगर पुरुषत्वाचे प्रतीक मानला गेला. नागाला भाऊ मानून स्त्र्ाया त्याची पूजा करतात. त्यातूनच नागपंचमी हा सण आणि नागपंचमीची गाणी उदयास आली. नागासारख्या विषारी प्राण्याची वक्रदृष्टी होऊ नये हा त्यामागचा भाव आहे.
‘कूळ’ हा शब्द खानदान या नावाने वापरला जातो. ‘खानदाना’मध्ये अनेक पिढय़ा जे रीतिरिवाज, परंपरा, प्रथा आणि वागण्याची पद्धत या बाबींचे कटाक्षाने पालन करण्याची प्रवृत्ती आढळते. आपले कूळ, वंश किंवा खानदान कसे उच्च आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. जुन्या बखरी, तवारिखा यांमध्ये एखाद्या राजघराण्याची वंशावळ सांगताना मूळ पुरुष सूर्य किंवा चंद्र सांगितले जाते. कुरुकुल म्हणजे कौरव, रघुकुल म्हणजे रघुराजाचे कूळ. याच कुळात पुढे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला इत्यादी संज्ञा आपणांस ठाऊक आहेत. प्रत्येक कुळाची काही वैशिष्टय़े असतात. उदा. अवैदिक संस्कृतीतील नाग कूळ हे लढवय्ये असल्याचे दिसून येते. नाग लोकांची जिथे जिथे वस्ती झाली, त्या ठिकाणच्या गावाच्या नावामध्ये ‘नाग’ हा शब्द येतो. उदा. नागपूर, नागापूर, नागलवाडी, नागठाणे इत्यादी.
अनेक कुटुंबांचे एक कूळ असू शकते. मात्र अनेक कुळांचे एक कुटुंब असू शकत नाही. कुटुंबाचे आचार हे कुळाचारातून उत्पन्न होतात. वड, आंबा, पिंपळ, कदंब, जांभूळ इत्यादी वृक्ष, वाघ, हत्ती, वानर इत्यादी प्राणी; कावळा, मोर, पोपट इत्यादी पक्षी देवक अर्थात कुलचिन्हे असल्याचे पाहायला मिळते. निसर्ग व मानवाचा एक संबंध आहे, नाते आहे. कुलचिन्हांसारख्या शिस्तशीर नियंत्रणाद्वारे हा नातेसंबंध अधिकाधिक स्पष्ट व घट्ट होत आला आहे.
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
– [email protected]





























































