
>> द्वारकानाथ संझगिरी
यूकेमध्ये गेल्यावर लेक डिस्ट्रिक्ट आणि स्कॉटलंडला जायला मला कधीही आवडतं. गेल्या वर्षीच लेक डिस्ट्रिक्टला गेल्यामुळे यावेळी विश्वचषकाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर मी स्कॉटलंडला गेलो. एक गोष्टही ठरवून टाकली होती की, यावेळी इनव्हरनेसला मुक्काम करायचा आणि तिथून इतरत्र फिरायचं. काही वर्षांपूर्वी मी इनव्हरनेसला काही तास थांबून तिथल्या लॉकनेस या जगप्रसिद्ध तलावाला पेâरफटका मारून निघून गेलो होतो. यावेळी मला पद्मिनी फक्त आरशात पाहायचं समाधान नको होतं. मला पद्मिनी डोळे भरून पाहायची होती. त्यामुळे इनव्हरनेसमध्ये मुक्काम केला. इनव्हरनेस हे शहर ‘नेस’ नदीच्या मुखावर देवाने गंधर्वासाठी आधी वसवलं आणि मग माणसाकडे सुपूर्द केलं असं वाटतं. या शहराच्या सौंदर्याला लॉकनेसमधल्या एका राक्षससदृश जनावराने जास्त सुप्रसिद्ध केलं. त्याला ‘नेसी’ विंâवा ‘लॉकनेस मॉन्स्टर’ असं म्हणतात. बाय द वे, स्कॉटिश भाषेत लॉक म्हणजे तलाव. या नेस तलावात तो राहतो अशी दंतकथा आहे. मी जरी त्याला दंतकथा म्हणालोे तरी तिथली काही मंडळी त्याला पाहिल्याचं छातीठोकपणे सांगतात. इनव्हरनेसच्या छोटेखानी टुमदार विमानतळावरून शहरात जाताना आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने त्याच्या वडिलांनी ‘नेसी’ पाहिल्याचे छातीठोकपणे सांगितले. त्याच्या वडिलांच्या वर्णनाप्रमाणे तो साधारण डायनासोरसारखा होता. गेल्या वेळी मी ज्या टुरिस्ट बसमधून फिरत होतो त्यावेळी लॉकनेसच्या काठाजवळच्या एका पबच्या बारटेंडरने त्याच्या कुणी मित्राने पाहिल्याचं सांगितलं होतं. तो त्याला चिनी ड्रॅगनसारखा वाटला होता. तुम्ही नेमकी कुठली स्कॉच घेतलीय यावर वर्णन अ18वलंबून असावं. माझ्या मते ती दंतकथा आहे. एडिंबराच्या किल्ल्यातल्या भुताटकीसारखी. नाहीतर आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगात त्या राक्षसी प्राण्याला लपून बसून सोयीप्रमाणे दर्शन देणं जमणारं नाही. तो असलाच तर सात्त्विक वृत्तीचा असावा. तो दर्शन देतो, पण हल्ला करत नाही. धूर्त ब्रिटिशांनी हा नसलेला राक्षस किती सुंदर विकलाय पहा ना! या वैज्ञानिक युगातही त्यावर विश्वास ठेवणारी माणसं ब्रिटिश असू शकतात. हार्वे, सर आयझॅक न्यूटनच्या देशातलं हे चित्र आहे.
इनव्हरनेस हे महागडं शहर आहे. साहजिकच आहे. सुंदर गोष्टी कधीच स्वस्त नसतात. इनव्हरनेसच्या सिटी सेंटरजवळ ‘बेड अॅण्ड ब्रेकफास्ट’ मॉटेल्सही प्रचंड महाग होती म्हणून आम्ही इनव्हरनेसच्या परिघावर असलेल्या युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहिलो होतो. खर सांगू, मजा आली. ती हॉस्टेल्स भाड्याने विंâवा हॉटेलप्रमाणे दिली गेली. कारण तो सुट्टीचा मोसम होता. बरीच मुलं घरी गेली होती. मला माझे जुने इंजिनीअिंरगचे दिवस आठवले. फक्त ही हॉस्टेल्स आमच्या त्या हॉस्टेल्सपेक्षा पॉश होती. आता आपलीही हॉस्टेल्स पॉश झाली असतील. कारण मी माझा १९७० मधला अनुभव सांगतोय. मस्तपैकी प्रत्येकाला एक वेगळी खोली, एक वेगळं टॉयलेट बाथरूम, बाकी टेबल, खुर्ची, कपाट, हीटर वगैरे गोष्टी आल्याच. हीटरची गरज मला लागलीच नाही. इंग्लंडच्या उत्तरेला असणारं इनव्हरनेस बNयापैकी उष्ण होतं. चक्क खिडकी उघडी ठेवून मी चार दिवस झोपलो. पूर्वी इंग्लंडमध्ये पंखा हा प्रकार क्वचित सापडायचा. आता पंखा ही मूलभूत गरज आहे. आठएक खोल्यांना मिळून एक कॉमन किचन होतं. त्यात सर्व होतं. मायक्रोवेव्ह, मिक्सर्स, भांडी, इलेक्ट्रिक शेगड्या, प्रâीज… सर्व अगदी घरच्या स्वयंपाकघरासारखे आणि अर्थात टीव्ही, बसायला सोफा वगैरे! आपण आपलं खाणं आणायचं, बनवायचं, खायचं आणि भांडीवुंâडी नीट धुऊन ठेवायची. बाकी बडदास्त उत्तम होती. त्यातला एकच त्रासदायक भाग होता, स्वत:चं जेवण स्वत: करणं. माझ्या वयाच्या पाश्चिमात्य पिढीलाही त्याची सवय असते. आजच्या हिंदुस्थानी पिढीलाही आहे. आमच्या पिढीला नव्हती. कारण आमच्या वेळी आई आणि नंतर बायकोने आम्हाला लाडावून ठेवलेलं आहे. आता बNयाचदा नवरा बायकोला लाडावून ठेवतो. चहाची किटली आणि डिपडिप इंग्लिश ब्रेकफास्ट टी (माझी दिलमा या श्रीलंकन चहानंतरची लाडकी) असल्यामुळे चहा जमून गेला. ऑम्लेट करणं जास्त जिकरीचं वाटलं. मला कुणी ऑफर दिली असती की, मला नेटमध्ये तीन ओव्हर्स गोलंदाजी कर. मी तुला ऑम्लेट बनवून देतो, तर ती मी स्वीकारली असती.
आम्ही (मी आणि माझा मित्र विनायक दळवी) हॉस्टेलवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे नऊ वगैरे वाजले होते. उन्हाळ्यात तेव्हा सूर्य वगैरे असल्यामुळे रात्र पडलीय हे जाणवतच नाही, पण पोटात बोंबलणाNया कावळ्यांनी जाणीव करून दिली होती की, ‘डिनर’ची वेळ झालीय. जवळ एकही रेस्टॉरंट नव्हतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की, एखादं ‘टेस्को’सारखं सुपरमार्वेâट गाठावं. फळं, अंडी, पाव, बटर, बिस्कीट वगैरे घेऊन येऊन पोटाची खळगी भरावी. हॉस्टेलच्या रिसेप्शनिस्टने मला सांगितलं, ‘‘चालत पंधरा मिनिटांत येईल.’’ स्कॉटलंडमध्ये चालणार नाही, तर कुठे चालणार? थोडं पुढे गेल्यावर मोबाईलवर पत्ता टाकायला गेल्यावर कळलं की, आसपास तीन-चार टेस्को आहेत. झाला गोंधळ! मग हिंदुस्थानी पद्धत वापरली – विचारत जायचं, पण विचारायला रस्त्यावर माणूस लागतो. तो कुठून आणायचा? एकवेळ लॉकनेसमधला राक्षसी प्राणी दिसला असता, पण माणूस सापडणं कठीण. अचानक एक देवदूत आला. त्याची गाडी मी थांबवली. मी त्याला माझी व्यथा सांगितली. त्याने गाडीत घेतलं आणि जवळच्या टेस्कोच्या जवळ नेऊन सोडलं, पण ती थोडी इंडस्ट्रियल जागा होती. त्याने स्कॉटिश इंग्लिशमध्ये सांगितलेला पुढचा पत्ता डोक्यावरून गेला. इंग्लिश माणसाचं इंग्लिश तरी बNयापैकी कळतं. स्कॉटिश माणसाचं इंग्लिश कळण्यापेक्षा अर्धमागधी भाषा कळायला जास्त सोपी. १९९६ साली मी पहिल्यांदा स्कॉटलंडमध्ये लाला राजपूतकडे गेलो होतो. तो तिथे पर्थला राहायचा. ‘‘पर्थला जाणारी बस…’’ एवढा प्रश्न मी ग्लासगोच्या एका चौकात चार जणांना विचारला. तिघांनी इंग्लिश चित्रपटात हिरो खांदे उडवतो तसे खांदे उडवले. चौथ्याने जास्त आपुलकी दाखवली. मी काय म्हणतोय ते त्याला कळेना. शेवटी मी त्याला स्पेलिंग सांगितलं. झ्ERऊप्! ‘प्यार्थ’ तो म्हणाला आणि त्याने योग्य बस दाखवली. तर मी काय सांगत होतो, पुढे माझं सिव्हिल इंजिनीअरिंगचं ज्ञान वापरत आम्ही टेस्को गाठलं. सामान घेतलं. पुन्हा मोबाईलला आज्ञा देताना गोंधळ झाला. चार युनिव्हर्सिटीची हॉस्टेल्स वेगवेगळ्या ठिकाणी. काय करायचं? पुन्हा माझ्या सिव्हिल इंजिनीअरिंगच्या ज्ञानावर मी विश्वास टाकला आणि विश्वासघात झाला. आम्ही चुकलो वाट. तोपर्यंत अंधार झाला होता. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. पोटातला खड्डा भरताना आम्ही दोघांनी प्रत्येकी एक बॉक्स स्ट्रॉबेरी संपवला आणि दुसरा देवदूत भेटला. तो स्कॉटलंड यार्डचा पोलीस होता. त्याने प्रथम आमच्याकडे संशयाने पाहिले. कारण आमचे चेहरेच तसे, तो तरी काय करणार? मग त्याला मी कर्मकहाणी सांगितली. त्याने घड्याळाकडे पाहिलं. त्याला कुठेतरी गस्त घालायला जायच होतं. त्याला साधारण हॉस्टेलच्या जवळ काय आहे ते मी सांगितले. त्याने गाडीत घालून बरोबर दारात सोडलं. स्कॉटलंड यार्डबद्दल आदर होताच. तो द्विगुणीत झाला. तो डोळे मिचकावत म्हणाला, ‘‘ उद्या लॉकनेसच्या काठावर फिरताना तो राक्षसी प्राणी दिसतो का पहा. दिसेलही कदाचित.’’ मी त्याला ‘‘तू तो पाहिलायस का?’’ हे विचारलं नाही. कारण तो ‘‘हो’’ म्हणाला असता तर माझा स्कॉटलंड यार्डवरचा विश्वास उडाला असता. मीसुद्धा डोळे मिचकावत म्हटले, ‘‘तो नेमका कुठे आहे हे स्कॉटलंड यार्डखेरीज कुणाला जास्त ठाऊक असणार? सांगा ना पत्ता?’’ तो गडगडाटासारखा हसला आणि निघून गेला.


























































