साहित्यकट्टा – एकमेवाद्वितीय ‘ययाती’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश उदावंत

कादंबरी लिखाण हा एक जगमान्य साहित्य प्रकार आहे. त्यासाठी सशक्त कथानक व जबरदस्त मांडणीची गरज असतेही. अशातच वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘ययाती’ ही कादंबरी 60 वर्षांपासून वाचकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. याच कादंबरीला मराठी राजभाषेतील पहिला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (1976) मिळाला. या घटनेला 26 फेब्रुवारी रोजी 45 वर्षे पूर्ण होत आहेत.

मराठी साहित्यातील सुवर्णाक्षरांनी अलंकारित नाव म्हणजे विष्णू सखाराम उपाख्य वि. स. खांडेकर होय. त्यांनी लिहिलेली अजरामर कादंबरी ‘ययाती’ ही आज 60 वर्षांची ज्येष्ठश्रेष्ठ झाली असली तरी आजही या कादंबरीचा केशरी गोडवा टवटवीत आहे. बेस्ट सेलर, बेस्ट कथानक, बेस्ट भाषा, वाचकप्रिय असलेल्या या कादंबरीला आजही विक्रमी मागणी आहे. अस्सल भाषा, वाचकांना खिळवून ठेवण्याची अमोघ शैली, अजोड कथेचा सुगंधी दर्प खांडेकरांच्या साहित्यात असल्यामुळे ते वाचकप्रिय लेखक ठरले आहेत. म्हणूनच इतर मराठी लेखकांच्या तुलनेने खांडेकर हे वरचढ ठरतात.

खांडेकरांच्या लेखन प्रवासात जे काही लिखाण झाले, त्यातील ‘अमृतवेल’ व ‘ययाती’ या दोन कादंबऱया खास वाचकप्रिय ठरल्या. लघुकथा, विनोदी लेखन, ललित निबंध, स्फूट लेखन, कविता, नाटय़ व्यक्तिचित्रण अशा अनेक साहित्य प्रकारांतून त्यांनी लिखाणाची चुणूक दाखवली. तेवढी त्यांच्यात प्रतिभा होतीही. म्हणूनच ते खऱया अर्थाने कादंबरी व कथालेखनात विशेषत्वाने रमलेले दिसतात. यात त्यांच्या 15 पेक्षा जास्त कादंबऱया तर 27 पेक्षा अधिक कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. झपाटून लिहिताना दर्जेदारपणा व संयमितता पाळून वाचकांसमोर आदर्शवाद ठेवण्यावर त्यांनी भर दिला हे विशेष होय.

पुठलेही साहित्य हे ध्येयावर प्रेरित असते. साहित्यातील लेखनाची प्रतिभा आणि तिची वास्तविकता यावरून साहित्य निर्मितीची बैठक कळते. सर्वोत्तम लिखाणामागची प्रेरणा काहीही असली तरी त्यातील वस्तुपाठ नाकारता येत नाही. या तत्त्वाप्रमाणे वाचकांसाठी आदर्शवादाचा वस्तुपाठ वाचकांसमोर ठेवण्याची किमया खांडेकर करू शकले.

सन 1960 हे वर्ष साहित्य क्षेत्रासाठी नवप्रतिभेचे ठरले. याच वर्षात खांडेकरांची ‘ययाती’ प्रकाशित झाली आणि तिने सर्वच विक्रम प्रस्थापित केले. या विक्रमांची घोडदौड आजच्या डिजिटल युगातही अबाधित आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या 16व्या वर्षी म्हणजे 26 फेब्रुवारी 1976 मध्ये या कादंबरीस मराठी भाषेसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आज या गौरवशाली परंपरेला 45 वर्षे झाली आहेत. येत्या 5 वर्षांत या गौरवाची 50 वर्षे होणार आहेत.

यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर असा सन्मान मराठी राजभाषेला मिळालेला नव्हता. ही उणीव ‘ययाती’ने भरून काढली. अभिमानाची बाब म्हणजे खांडेकरांनंतर मराठीतील तीन लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. खांडेकरांनंतर 11 वर्षांनी प्रसिद्ध कवी तथा ज्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ते वि. वा. शिरवाडकर उपाख्य पुसुमाग्रज यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळविणारे ते मराठीतील दुसरे लेखक ठरले. यानंतरच्या 16 वर्षांनी म्हणजे 2003 मध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याचप्रमाणे 14 वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये समीक्षक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ते मराठीतील चौथे मानकरी ठरतात. असाच राष्ट्रीय पुरस्काराचा वारसा स्वाभिमानाने पुढेही चालू राहणार आहे.

वाग्देवीची मूर्ती, मानचिन्ह, प्रमाणपत्र, लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम अशा स्वरूपाचा हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्याची परंपरा आहे. 1976मध्ये प्रदान ज्ञानपीठ पुरस्काराच्या वेळी भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष शांतिप्रसाद जैन, उमाशंकर जोशी यांच्या सहीचे भव्य प्रशस्तीपत्र स्वीकारताना खांडेकर यांच्यासोबत तमाम मराठी भाषकांचा ऊर भरून येणे स्वाभाविकच होते.

महाभारतातील रंजक कथानक म्हणजे ययाती. शुक्राचार्यांची मुलगी देवयानी व दासी शर्मिष्ठा. देवयानी जरी ययातीची पत्नी असली तरी तिचे प्रेम कचावर असते, तर ययातीचे शर्मिष्ठावर प्रेम जडते. अहंकारातून अग्निज्वाला प्रकटतात. त्यातून वणवा पेटतो…जिवाची लाही लाही होते. महत्त्वाकांक्षेतून देवयानी ययातीशी लग्न करते, पण यात तिच्या वाटय़ाला दुःख येते. देवयानी व शर्मिष्ठा या दोन नायिकांना समजावून सांगता सांगता कथेत ययाती सुखांच्या गाद्यांवर लोळत असला तरी अतृप्त राहतो. याउलट कचाचा स्वभाव असतो. विचारशील, संयमी जीवन जगणारा कच निरपेक्ष प्रेम करतो. शुक्राचार्यांसारखीच विद्या कचाने प्राप्त केली होती. पृत्रिम वार्धक्य दूर करण्याची सिद्धीविद्या त्याने प्राप्त केली होती. याच सिद्धीनुसार कचाने शर्मिष्ठsचा पुत्र पुरूचे यौवन त्यास पुन्हा परत मिळवून दिले होते. याच पुरूने वडिलांचे म्हणजे ययातीचे वार्धक्य घेऊन आपले यौवन ययातीला दिले होते. आपला भाऊ यदूसाठी त्याने राजसिंहासन नाकारले होते, पण पुढे तोच महाराजा होतो.

अशी ढोबळमानाने ‘ययाती’ कादंबरीची रचना असली तरी मानवी जीवनातील अक्षांश-रेखांशाचा आलेख आहे. कादंबरीतील ययाती हा सम्राट महाराजा आजच्या सामान्य व्यक्तीचा प्रतिनिधी आहे अशी स्वतःच कबुली खांडेकर देतात. यासंदर्भात ‘ययाती’ कादंबरीच्या शेवटी 25 पानांची विस्तृत पार्श्वभूमी देऊन खांडेकरांनी कादंबरी लिखाणामागची प्रेरणा, कथानुभव, कथाविष्करण याबाबत स्पष्टीकरण केलेले आहे.

आज 61 वर्षांच्या या कादंबरीने वाचकांची मने जिंपून निस्सीम प्रेम केलेले आहे. डिजिटल युगातही ही कादंबरी पुनः पुन्हा वाचावीशी वाटते.

दोन पिढय़ांचा संस्कार

खांडेकरांच्या ‘ययाती’ कादंबरीचे पहिले प्रकाशन रेडबुक अॅण्ड कंपनीतर्फे 1959 मध्ये झाले होते. सध्या या कादंबरीचे हक्क पुण्यातील मेहता पब्लिशिंग हाऊसकडे आहेत. कादंबरीची आज तब्बल 41 वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. यासंदर्भात मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्याशी थेट संपर्क केल्यानंतर त्यांनी मराठी राजभाषेचा गौरव आणि खांडेकरांविषयी आपुलकी व्यक्त केली. प्रचंड खपाची ही कादंबरी 60 वर्षांत दोन पिढय़ांमधील संस्कार आहे. वाचकांनी कादंबरीवर प्रचंड प्रेम केल्याचे सुनील मेहता यांनी अभिमानाने सांगितले. 2013-14, 2016 मध्ये ‘ययाती’च्या तब्बल दोन आवृत्त्या काढाव्या लागल्या. ‘ययाती’ची दरवर्षी 10 हजार प्रतींची विक्री होत असली तरी आज प्रकाशित पुस्तकांच्या आवृत्त्या छोटय़ा झाल्या आहेत. आज 6 ते 8 हजार प्रतींची आवृत्ती निघत असल्याची खंतही मेहता व्यक्त करतात. मराठीत ललित लेखनाला मोठी परंपरा आहे. मराठीचा राष्ट्रीय पातळीवर जेवढा गौरव व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. अशा परिस्थितीत 70च्या दशकात खांडेकरांना ‘ज्ञानपीठ’ रूपाने मराठी राजभाषेसाठी राष्ट्रीय नामांकन मिळाले ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘ययाती’मधील कथानक विलक्षण आणि एकमेवाद्वितीय आहे. महाकथात्मक स्वरूपातील ‘ययाती’ दर्जेदार कादंबरी आहे असे सांगत मेहता यांनी जाता जाता आज घडीला दर्जेदार नवसाहित्य निर्माण व्हायला पाहिजे असा आशावादही व्यक्त केला.

– ganeshudawant21 @gmail.com