वेग शब्दांचा…

>> किरण खोत, निवेदक-सूत्रसंचालक

बोलताना काही जणांची अडचण असते की, ते खूप जलद गतीने बोलतात तर काही जण खूप थांबून थांबून अगदी धिम्या गतीने बोलतात. एक चांगला वक्ता होण्यासाठी बोलण्याच्या गतीवर जरूर नियंत्रण ठेवा.

बोलताना शब्दांची वेगमर्यादा तितकीच महत्त्वाची आहे. तुम्ही जर जलद बोललात तर समोरच्याला तुम्ही काय बोलताय, तुम्हाला काय सांगायचेय हे तितकेसे नीट समजत नाही. याउलट जेव्हा तुम्ही अपेक्षित गतीपेक्षा कमी गतीने बोलता तेव्हा समोरच्याला ते पंटाळवाणे वाटू शकते.

जलद बोलण्यामागे अनेक कारणे असतात. त्यातले सगळय़ात महत्त्वाचे कारण म्हणजेच भीती. असे म्हटले जाते की, चारचौघांसमोर कधीच न बोलल्यामुळे आणि अचानक प्रसंगात हातात आलेल्या माइकमुळे किंवा अपूर्ण तयारीमुळे आपली भंबेरी उडू शकते. आपणास भीती वाटू शकते आणि ही भीती वाटल्यानंतर आपोआपच तुमचे विचार व तुमचे बोलणे यांमधील सुसूत्रता यावर त्याचा परिणाम होतो. कारण तुम्ही बोलल्यानंतर विचार पूर्ण करता. एक उत्तम वक्ता कुङ्गलेही भाष्य करण्याअगोदर त्याचा सारासार विचार करतो आणि ते त्याच्या मनाला पटले तरच तो जगासमोर आपले ते म्हणणे आत्मविश्वासाने मांडतो.

जलद किंवा धिम्या गतीने बोलण्याचे दुसरे कारण हे संस्कारदेखील असू शकतात. तुम्ही सतत ज्या व्यक्तींना ऐकत असता, ज्या व्यक्तींचे निरीक्षण करत असता किंवा ज्या व्यक्तींना तुमचे आदर्श मानत असतात त्या व्यक्तींच्या बोलण्याच्या गतीवर तुमच्या बोलण्याची गती अवलंबून असू शकते.

प्राणायाम हा यावरचा एक हमखास उपाय ङ्खरू शकतो. कारण बोलताना तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण केले तर ही अडचण सोडवता येऊ शकते. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपला श्वास बाहेर पडत असतो. पुन्हा श्वास घेऊन आपण बोलण्यासाङ्गी तत्पर होतो. तुम्ही एका श्वासात किती शब्द बोलू शकता ते किती जलद किंवा धिम्या गतीने बोलू शकता यावर नियंत्रण ङ्खेवून ही अडचण सोडवता येते.

नीट विचार केल्यास आपल्या एक गोष्ट लक्षात येते की, आपण जेव्हा जुन्या गोष्टींविषयी बोलत असतो, भूतकाळाविषयी बोलत असतो तेव्हा आपला शब्दांचा वेग हा जास्त असतो. याउलट तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी विचार मांडायला सांगितले त्यावेळेस मात्र तुमच्या बोलण्याचा वेग कमी होतो.

आपल्या बोलण्यात ‘अम्म’, ‘ओके’ असे शब्द सतत आले की, समजून जायचे आपले शब्दभंडार कमी पडते आहे. वाचन करून आपले शब्दसंग्रह आणि माहिती वाढवणे हा यावरचा उत्तम उपाय आहे. एक चांगला वक्ता होण्यासाठी बोलण्याच्या गतीवर जरूर नियंत्रण ठेवा. कारण तोंडातून निघालेला शब्द पुन्हा परत मागे घेता येत नाही.

प्रगट वाचन करा

जलद बोलणे जर थांबवायचे असेल तर वेळ घेऊन, विचार करून आपले मत प्रगटपणे मांडण्याचा सराव करावा. पुस्तक वाचताना प्रगट वाचन म्हणजे मोङ्गय़ाने वाचून वाचन करावे. जेणेकरून तुमचे उच्चार आणि तुमचा वेग तुमच्या आपोआप लक्षात येईल. हळू बोलणाऱयांनी मात्र प्रगट वाचन करून आपली गती कशी वाढवता येईल याचा नियमित सराव करावा.