
>> मृणाल घनकुटे
त्वचेचे अनेक प्रकार असतात. काहींची त्वचा तेलकट असते, तर काहींची त्वचा कोरडी असते. तेलकट त्वचेमुळे मुरूमांसारख्या समस्या उद्भवू शकतात. नियमित काळजी न घेतल्याने चेहऱयाच्या स्किनटोनची शेड कमी होऊन त्वचा सावळीही दिसू शकते. या समस्येवर व्हिवा कॉस्मेटिक क्लिनिक येथील डॉ. दीपम शाह यांनी केलेले मार्गदर्शन…
अशी ओळखा तेलकट त्वचा
- कपाळ आणि नाकावरच तेल जास्त येणे.
- रात्री चेहरा स्वच्छ करून झोपा, मग सकाळी आरशात चेहरा पाहा आणि चेक करा की, चेहरा चमकतोय का. तसं असेल तर तुमची त्वचा तेलकट आहे.
यामागील कारणे
तेलकट त्वचा ही हवामान बदलामुळे, हॉर्मोन्स बदलामुळे, आनुवंशिक गुणधर्मांमुळे व जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकते. आपल्या त्वचेला मऊ बनवण्यासाठी आपल्या शरीरातील सेबाशियस ग्रंथी सेबम तयार करत असते, परंतु जर हे सेबम जास्त प्रमाणात तयार झाले तर तुमची त्वचा ही तेलकट होऊ शकते. ऑइली स्किन असलेल्या लोकांना स्किनसंबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेल आणि घामामुळे ऑइली स्किन अजून खराब होते. यामध्ये ब्लॅकहेड्स आणि अॅक्नेसारख्या समस्यांचा समावेश असतो.
फायदेशीर उपाय
- एक्सफोलिएशन ः तेलकट त्वचेवर मृत त्वचेच्या पेशी आणि घाण जमा होतात, त्यामुळे चेहऱयावर मुरूम आणि मुरूमांची समस्या सुरू होते. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठवडय़ातून एकदा स्क्रब करून चेहराच्या त्वचेला शांत आणि थंड करून स्वच्छ ठेवा.
- फेस पॅक ः स्क्रब किंवा एक्सपहलिएट केल्यानंतर तेलकट त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फेस पॅकचाही वापर करणे आवश्यक आहे. नैसर्गिक घटकांनी बनलेला मुलतानी माती फेस पॅक, कोरफड आणि हळद फेस पॅक इत्यादी वापरू शकता. फेस पॅकच्या मदतीने त्वचेची छिद्रे बंद होऊन त्यात तेल व धूळ साचण्याची शक्यता कमी होते.
- चेहरा थंड पाण्याने धुवा ः चेहरा तेलकट होण्याची समस्या असल्यास दिवसातून किमान दोन वेळा चेहरा जरूर धुवावा. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल धूळ व घाम निघून जातो. थंड पाणी ब्लड सर्क्युलेशन सुधारते. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. ते तुमची त्वचा ताजेतवाने करते. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
- योग्य आहार घ्यावा ः आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, खनिजे यांसारखी पोषकतत्वे असतात. ज्यामुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते आणि पिंपल्सचा त्रासही कमी होतो.
- फास्ट फूड टाळावे ः तेला-तुपाचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, चरबीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. तसेच खारट पदार्थ, जंक फूड व गरजेपेक्षा अधिक चहा, कॉफीही वारंवार पिणे टाळावे.
- योग्य उपचार मिळवण्यासाठी स्वतः कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



























































