लेख – विलक्षण वादळवाट…

 

>> सौरभ सद्योजात

हिंदी साहित्य जगतातील लोकप्रिय लेखिका मृदुला गर्ग यांची ‘चित्तकोबरा’ ही 1979 साली आलेली कादंबरी. मृदुला गर्ग यांच्या लेखनात मुक्त विचारांचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं. यामुळेच ते स्त्रीवादापलीकडे जात स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी अधिक वाटतं. एकविसाव्या शतकातलीच वाटावी इतकं हे लिखाण आजही लागू आहे. स्त्री-पुरुष संबंधांभोवतीचं मळभ दूर करू पाहत, प्रस्थापित मूल्यांना धडक देणाऱया ‘चित्तकोबरा’ कादंबरीचे समीक्षण, आकलन करणारा हा लेख.

तुम मेरे सफर के साथी जरूर बनोगे,
पर मंजिल के मुंतजीर नहीं

आपले प्रवास आपण अधोरेखित करावेत. शेवटाचा विचार करत वर्तमानाचा क्षण नासवू नये. या क्षणी आपल्या हाती जे आहे, ते कवटाळून ठेवावं, कसूर करू नये. स्त्री – पुरुष संबंधांभोवतीचं मळभ दूर करू पाहणारी मृदुला गर्ग सत्तरीच्या दशकाला एकविसाव्या शतकाचं दर्शन घडवू पाहत होती, पण अर्थातच भविष्य अनेक शक्यतांसह येत असतं. आजच्या वर्तमानाची घडी मोडू पाहणारं संवेदन त्यात असू शकतं. त्यामुळे दैनंदिन आणि चौकटीबद्ध आयुष्य जगणाऱया समाजाला ती बंडखोरी तर सोडाच, पण तिची चाहूलही नकोशी असते आणि अशा काळात एक विवाहिता परपुरुषावर मनस्वी आणि पश्चात्तापरहित प्रेम करू शकते अशी सशक्त शक्यता मांडून तिने प्रस्थापित मूल्यांना मोठीच धडक दिली. ’चित्तकोबरा’ ही 1979 साली आलेली तिची कादंबरी आणि त्यात असणाऱया मुक्त लेखनशैलीनं स्त्राrवादी लेखनाची एक स्वतंत्र वाट दाखवून दिली. मृदुला गर्ग एकविसाव्या शतकातलीच वाटावी इतकं ते लिखाण आजही लागू आहे.

मनू नावाची विवाहित स्त्राr, तिचा पती महेश आणि त्यांना असणारी दोन अपत्ये, तर रिचर्ड नावाचा जगभर भ्रमण करणारा प्रोटेस्टंट पाद्री, त्याची पत्नी जेनी आणि त्यांची तीन अपत्ये असे सगळे या कथेत डोकावतात, पण मुळात ही कथा मनू आणि रिचर्डमधल्या नाजूक नात्याची आहे. इतर सगळं हलकेच डोकावून जाणारं आहे. अशा प्रकारच्या कथांबाबत बोलताना विवाहबाह्य प्रेमसंबंध, बंडखोरी आणि गरजांची पूर्ती अशी सरसकट लेबलं लावली जातात. त्या लेखनातून उगवू पाहणारं नव्या वळणाचं तत्त्वज्ञान समोर आलं, पटू लागलं की, लोक डोळेझाक करतात. मृदुलाने मनू – रिचर्डचं साहसी पण नाजूक नातं तर दाखवलंच, पण सहसंबंधांमधून घडत जाणारं तत्त्वचिंतनही या लिखाणात उलगडून दाखवलं. ’स्त्राr – पुरुष नातेसंबंध’ हा अतिशय ‘clich’ विषय झाल्याची ओरड समाज माध्यमांवर ऐकायला, वाचायला मिळते. अर्थात उथळ लेखन त्याबाबत भरपूर झालंही. तोचतोचपणाही खूप आला, पण अशा टीकांमुळे या प्रवासातल्या अनेक रानवाटा दुर्लक्षित राहण्याचा संभव असतो. त्यातही शहरी वळणाचे मानसिक, शारीरिक प्रश्न अजूनही बहुतांश लोकांसाठी दुय्यम ठरू शकतात. एक लक्षात घ्यायला हवं की, प्रत्येक नातेसंबंधाला एक विशिष्ट आकार असतो. ते झगडत असतात त्या परिस्थितीचा कचाटा वेगवेगळा असतो… आणि म्हणून त्यातून जन्माला येणारा अनुभवही. मृदुलाच्या लेखनात प्रेमाला जसं केंद्रीय स्थान आहे तसंच ते त्यात अंतर्भूत असलेल्या तत्त्वज्ञानाला आहे. जगभर प्रवास करणारा रिचर्ड आणि आपल्या घरात अडकून राहिलेली मनू यांचा सांधा जोडताना ती ‘स्पेस आणि टाईम’चा प्रभावी संकेत देते. एकाच वेळी स्वप्नवत आणि वास्तव जगाचं अस्वस्थ करणारं अथांग द्वंद्व ती लहानसहान प्रसंगांतून मांडते. मृदुलाची गुंतवून ठेवणारी लेखनशैली हादेखील चर्चेचा वेगळा विषय होऊ शकेल. ‘चित्तकोबरा’मधली मनू एकाच वेळी मनसोक्त प्रेम करत विसर्जित होत जाते, तर परत वेगाने वेलीसारखी वाढत आपल्या धारणा काळाच्या कसोटीवर तासून घेते. त्यामुळे मनूच्या ओठी येणारे संवाद हे एखाद्या विरहिणीने मांडलेल्या अर्थगर्भ ओवीसारखे आहेत, पण ते सशक्त, स्पष्ट आणि जबाबदार आहेत. अपराध बोधाचं ओझं तिने लीलया झटकलं आहे. त्यावेळच्या हिंदी साहित्य जगाला अपराध बोध झटकून हिमतीने जगण्याची कक्षा विस्तारणाऱया स्त्राrची कल्पना आक्रमक वाटणं स्वाभाविक होतं. आजही नव्या नात्यांच्या शोधात माणसं भटकत असतात. कारण ती काळाच्या पटलावरून न पुसली जाणारी चिरंतन गरज आहे. समाज माध्यमे असा मोकळा श्वास घेण्यासाठीची सोय देत असले तरी सगळी द्वंद्वं सांभाळणाऱया स्त्राr – पुरुषात मूळ तशी शक्ती आणि स्पष्टता असणं अभिप्रेत असतं. ‘चित्तकोबरा’ हे अशाच दोन सशक्त पात्रांचं कथानक आहे.

मुळात ही कादंबरी झोतात आली त्याचं कारण म्हणजे लेखिकेला अश्लील लेखनाच्या आरोपाखाली झालेली अटक. ती 1980 साली म्हणजे पुस्तक प्रकाशित होऊन साधारण एका वर्षानंतर झाली. व्यावसायिक स्पर्धा, नव्या आणि बंडखोर, पण प्रभावी अशा लेखिकेचा उदय आणि स्त्राr लेखिका असूनही साहित्य जगतावर नसलेलं अवलंबन अशी कारणे त्या मागे होती असं मृदुला एका मुलाखतीत सांगते. मनू आणि तिचा पती महेश यांच्या प्रणयाचं, त्या वेळी स्त्राrच्या शरीरात आणि मनाच्या पातळीवर होणारे बदल अशा प्रसंगांचं चितारलेलं ते कलात्मक वर्णन आहे. मुळात भारतीय समाजमन ‘अश्लील’ शब्दाच्या मर्यादित आणि अनेक वेळा चुकीच्या अर्थात गुरफटून गेला आहे. माझ्या स्नेही आणि मराठीच्या अभ्यासक, प्राध्यापिका डॉ. राजश्री कुलकर्णी यांच्याशी बोलताना ‘श्लील – अश्लील’च्या वापरातली ही गल्लत स्पष्ट झाली. अश्लील म्हणजे असुंदर. ते धड कुरूपही नाही. ‘बयो! तुझे हे नाटक अश्लील गो’ ही आरतीप्रभूंनी केलेली टिपणी त्या सांगत होत्या. अर्थातच त्याचा संबंध असुंदर, अस्ताव्यस्त असण्याशी आहे हे उघड आहे, पण लोक शारीर स्तरावर व्यक्त केलेल्या, होणाऱया स्नेहाचा संबंध ‘अश्लील’ शब्दाशी जोडून त्याचा मोठाच विपर्यास करतात. हा भाषिक ज्ञानाचा अभाव असतो. ‘चित्तकोबरा’मधील प्रणय प्रसंगांचं वर्णन हे मन आणि देहाला वेगवेगळं मानून केलं आहे, पण व्यावसायिक राजकारणाने त्याला वेगळं वळण दिलं. मोजके साहित्यिक सोडता कुणीही मृदुलाच्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसत नाही. तिची मुलाखत वाचताना मला रत्नाकर मतकरी सर आठवत होते. ‘ऍडम’मधील कथावस्तूची गरज म्हणून शरीरसंबंधांचं विश्लेषण त्यांनी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे मांडलं होतं. पुरुषाचं स्त्राr देहाविषयी असलेलं आकर्षण, वयोपरत्वे त्यात होणारे बदल, स्त्रियांकडून होणारा पुरुषाचा शारीरिक वापर यांबाबत त्यांनी स्पष्टतेसह लिहीत वेगळा प्रयोग केला होता, पण असं नवं खिंडार फोडणाऱयाची भीती प्रस्थापित लेखकांना ( अगदी मोठी नावे!) असणार यात शंका ती काय! पण ही कादंबरी सशक्त आहे. अनेक प्रयत्नांनी ‘ऍडम’ पुढे आली आणि ती आजही वाचली जाते, तिचं अपार कौतुक होतं. साहित्य क्षेत्रातल्या धुरिणांनी येणारं वारं (फक्त काही काळ!) थोपवून धरल्याची ही वैषम्यपूर्ण उदाहरणे आहेत.

‘चित्तकोबरा’ वाचणारी कुठलीही संवेदनशील आणि समर्थ स्त्राr जगण्याची कक्षा कशी प्रसरण पावू शकेल याच्या गहन विचारात गढून जाईल. हे प्रसरण केवळ शारीर स्तरावर होण्याचा अट्टहास यात नाही… आणि मुळात अमुक तमुक करायचं नाही असं बंधनही नाही. ‘एक स्त्राr के लिए स्वयं को विखंडित किये बिना एक से अधिक रिश्ता निभाना आसान है’ हे वाक्य आपापल्या अनुभवाशी ताडून पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला तर लक्षात येईल की, हे सत्यता आणि स्त्रियांचा गुणधर्म स्पष्ट करू पाहणारं ‘पॉवरफुल स्टेटमेंट’ आहे. ते नातेसंबंधांच्या समजुतीतून अभ्यासाअंती आलेलं आहे. त्याला याविषयीचा मर्यादित, पण तात्त्विक आधार आहे. या ग्रंथामुळे भारतातल्या स्त्राrवादी लेखनक्षेत्राला एक नवी रानवाट मिळाली, जी अपराध- बोधापासून, पश्चात्तापापासून खूप दूर स्वतंत्रपणे, मानाने मार्गक्रमण करते आहे. ही नवी वाट आकर्षक, पण चालायला तितकीच अवघड! स्त्राr – पुरुष नात्यातली ही विलक्षण वादळवाट या विषयाला वेगळा आयाम देणारी ठरली आहे यात शंका नाही !

(लेखक स्तंभ लेखक आहेत)