… हा विचार व्हायला हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे, [email protected]

आपले पर्यावरण हे बाप्पाचे वरदान आहे. त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. शाडूच्या मूर्तीलाही आज धातूच्या मूर्तीचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

बाप्पा येण्याचे वेध खरे तर एक वर्षापूर्वीच लागलेले असतात. गणेशमूर्ती म्हटलं की विविध चांगले पर्याय उपलब्ध असले तरी मात्र चटकन मिळणारा सोपा प्लास्टर ऑफ पॅरिसचा पर्याय मात्र निवडला जाते

वैज्ञानिकांनी देवाचं अस्तित्व मान्य करणं वा न करणं हा वादाचा मुद्दा असला तरी एकूणच एखादा उत्सव हा पर्यावरणाला अनुकूल पद्धतीनं पार पडतो वा नाही? किंवा तो कसा पार पडावा यासाठी मात्र पर्याय आणि मार्गदर्शन त्यांच्यामार्फत प्राप्त होऊ शकतं, तर आता पर्यावरणप्रेमी वा इको फ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना प्रत्यक्षात किती फायदय़ाची ठरू शकते आणि तिचा प्रसार किती झालाय हे जाणून घेत विविध प्रकारच्या गणेशमूर्ती पर्यायांचा आपण विचार करूया.

सर्वप्रथम शाडू मातीच्या गणेशमूर्तींविषयी विचार करूया. शाडू माती म्हणजे नेमकी कोणती माती? कोकणातल्या नदय़ांमध्ये आठवून येणारी चिखल माती म्हणजे कलेचं नाव आहे ‘शाडू माती.’ ही प्रामुख्याने असलेली स्थिती आहे. इको फ्रेंडली गणेशमूर्तींचं निर्माण करण्याचं शाडू माती हे पारंपरिक माध्यम राहिलेलं आहे. महाराष्ट्रात अनेक शतकांपासून अशाच प्रकारे निर्मित मूर्तींचे पूजन केले जात असे. शाडू माती ही संपूर्णपणे निसर्गनिर्मित असल्यामुळे जल प्रदूषणात भर घालत नाही. शिवाय पाण्यातील सजीवसृष्टीलादेखील फारशी हानिकारक ठरत नाही. काहींच्या मते शाडू मातीच्या वापरालादेखील मर्यादा आहेत. एक तर त्या चिखल मातीच्या असल्यामुळे भंग पावू शकतात. पीओपीच्या मूर्तींच्या तुलनेत त्यांचे वजन जास्त असल्यामुळे लांब ठिकाणी वाहतूक करणं कठीण ठरतं. मग या मूर्तीनिर्मितीचं कौशल्य सगळीकडे तयार असणं गरजेचं ठरतं. परंतु पेणच्या गणेशमूर्तींचं वेगळं आकर्षण आणि शाडू मातीची उपलब्धता आणि पुरवठा या बाबीदेखील लक्षात घ्याव्या लागतात. तरीही पीओपीपेक्षा त्यांचा वापर चांगला आणि कारागीरांनी नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास अधिकच चांगलं. त्याविषयी जागृती निर्माण झाल्यास अधिक परिणामकारक ठरतं. त्यामुळे नेहमीच्या रंगांऐवजी नैसर्गिक रंग कमी प्रमाणात प्रदूषण पसरवतात. त्यामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती होणं चांगलं.

शाडू मातीच्या गणेशमूर्ती इकोफ्रेंडली आहेत का याची मात्र खात्री करून घेणे गरजेचे आहे. सर्वत्र शाडू माती गणेशमूर्ती निर्मितीच्या कार्यशाळा सध्या जोरात सुरू आहेत. मात्र या प्रचंड गर्दी खेचणाऱया कार्यशाळेतून दिलं जाणारं कौशल्य कितपत उपयुक्त आहे हे तपासावे लागेल. कारण प्रचंड मागणीच्या ओझ्याखाली शाडू मातीच्या पुरवठय़ाचा प्रश्न पर्यावरणदृष्टय़ा तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र ‘पर्यावरणप्रेमी शाडू’ असे लेबल फसवं ठरू शकतं. खरं तर ते साहित्य ‘फ्लाय ऍश’ असू शकते. हे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतून बाहेर पडणारा एक उपउत्पादन (बायप्रॉडक्ट) आहे. मूर्तिकार आणि तज्ञांच्या मते शाडू माती म्हणून वापरण्यात येणारा पदार्थ प्रत्यक्षात चिखल आणि शाडू माती यांचे मिश्रण असून त्याला चुकून खाल्ल्यास- प्यायल्यास वा श्वासावाटे आत घेतल्यास कर्करोगास आमंत्रण ठरण्याबरोबरच चेतासंस्थेलाही हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे विविध कॉग्निटिव्ह डेफिसिटस्सह, उशिरानं वाढ होणं आणि वागण्याविषयी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय ती इकोफ्रेंडली गणेशोत्सवाच्या मुलभूत संकल्पनेस मारक ठरू शकते. आजकाल अशा प्रकारच्या भेसळीच्या शाडू मातीच्या वापराच्या आणि पुरवठय़ाच्या घटना खूपच वाढत असून शाडूच्या मातीच्या शुद्धतेची हमी उरलेली नाही. महाराष्ट्र आणि गुजरातमधील बहुतांश पुरवठय़ांद्वारे किमान 20 टक्के फ्लाय ऍशची भेसळ होत असावी. त्यामुळे मूतीकारांपुढे खऱयाखुऱया शाडू मातीचं आव्हान आहे असे नाशिकमधील एक प्रमुख मूर्तीकार मयूर मोरे यांचे म्हणणे आहे.

आता मूर्तीनंतर तिच्या विसर्जनाचा विचार करता शाडूची मूर्ती विरघळण्यास साधारण तीन आठवडे लागतात. पीओपीची मूर्ती विरघळल्यास तीन ते चार महिने तर पेपर पल्पच्या मूर्तीला तीन दिवस लागतात. पेपर पल्प तुलनात्मक दृष्टीनं सुरक्षित वाटली तरी शिसेधारीत रंग त्यामधील फायदे मारून टाकतात असं केंद्रीय सागरजलीय मत्स्य संशोधन संस्थचे शास्त्र्ाज्ञ वायुनंदन यांनी सांगितलेय. याला पर्याय म्हणून त्यांनी चार नैसर्गिक रगांचे पर्याय सुचविले आहेत. एक म्हणजे मुल्तानी माती, हळद, टेराकोटा आणि पोस्टर कलर्स. कृत्रिम रंगांपेक्षा पोस्टर कलर्सचा विषारीपणा खूपच कमी आहे. त्यामुळे तो उत्तम पर्याय आहे.

शाडू मातीला पर्याय पंचधातूच्या मूर्तीचा असून विसर्जन प्रतिकात्मक करून महत्त्वाची नैसर्गिक साधन संपदा वाचविली जाऊ शकते. त्यामुळे हा पर्यायदेखील वापरायला हवा. निदान कौटुंबिक गणेशोत्सवाबाबत. तेव्हाच इकोफ्रेंडली गणेशोत्सव प्रत्यक्षात अवतरेल.