मन आणि आहार

>> शमिका कुलकर्णी, (आहारतज्ञ)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वच जण सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत. जरी आता अनलॉक फेज सुरू झाला असला तरी महत्त्वाचे कारण असल्याशिवाय अनेक जण घराबाहेर पडत नाहीत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वच जण स्वच्छंदी आयुष्य जगण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही नक्कीच झाला आहे. आपल्या जवळच्या माणसांना आपल्याला हवे तेव्हा भेटता येणे, वारंवार एकत्र येऊन आनंद लुटणे हे सर्व आपण खूप मिस करत आहोत.

त्यामुळे साहजिकच मानसिक तणाव हा कुठेतरी वाढत आहे. आता हा मानसिक तणाव आपण फोनवर किंवा व्हिडीओ चाट करून कमी करू शकतो, पण काही वेळा या मानसिक तणावाचा परिणाम आपल्या आहारावरही होतो किंवा आहाराचा परिणाम मानसिक तणाव कमी करण्यास किंवा वाढवण्यास दिसून येतो.

आपली प्रतिक्रिया द्या