निरामय – न्याहारी महत्त्वाची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

न्याहारीची वेळ म्हणजे आपला रात्रभरचा उपवास मोडण्याची वेळ असते. सकाळी उठल्यानंतर आपण पहिले अन्न खातो ते म्हणजे न्याहारी.

– वजन कमी करण्यास मदत होते. कारण सकाळी पौष्टिक आहार खाल्ला की जास्त भूक लागत नाही. मोजका आहार घेतल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
– लहानापासून मोठय़ांपर्यंत सर्वांनाच नियमित न्याहारी केल्याचा फायदा होतो. एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मोठय़ांबरोबर घरातील लहान मुलांनासुद्धा नियमित न्याहारीची सवय लावणे गरजेचे आहे.
– पोषक आहार नियमित घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.
न्याहारीची योग्य वेळ म्हणजे सकाळी 7 ते 10 या कालावधीत. आपण यावेळी शरीराला योग्य पोषण दिले पाहिजे.
– न्याहारीत कर्बोदके, प्रथिने, थोडय़ा प्रमाणात स्निग्ध पदार्थ यांचा समावेश असला पाहिजे.
– पारंपरिक पदार्थ जसे उपमा, पोहे, सांज, शिरा, थालीपीठ, डोसा, इडली, घरगुती मिसळ, टोमॅटो ऑम्लेट, मुगाचे डोसे अशा प्रकारचे पदार्थ खाणे गरजेचे आहे.
– जर ताजे पदार्थ करायला काही कारणामुळे वेळ झाला नाही तर एखादे फळ आणि त्याबरोबर दूध आणि मूठभर सुकामेवा खावा. यामुळे भूकही भागते आणि शरीराला आवश्यक असलेली पोषक घटकही मिळतात.
– न्याहारीत बाहेरचे रेडी टू कूक किंवा रेडी टू इट पदार्थांचा समावेश असू नये.