
>> शिरीष कणेकर
मी माझ्या ‘ओरिजिनल’ जपानी सुझुकीवरून (दीपलात?) राजेश खन्नाच्या खार येथील ऑफिसात (ऑफिस-कम-सेपंड होम) चाललो होतो. गेल्या गेल्या ‘काका’ राजेशवर कसा हल्ला चढवायचा याची मी वाटते उजळणी केली. मुख्य म्हणजे तो ‘सुपरस्टार’ होता हे मला विसरायचं होतं. नाहीतर मी त्याच्यावर तोंडसुख कसं घेऊ शकलो असतो? आम्ही दोस्त होतो (असं वाटून घ्यायला मला आवडायचं.) याच नात्यानं मी त्याला माझ्या साठीच्या सोहळय़ाला बोलावलं होतं. तो कार्यक्रमस्थळी पोहोचला तेव्हा त्यावेळचे मुख्यमंत्री सुशीलपुमार शिंदे येऊन, बसून, भाषण करून निघूनही गेले होते. शूटींगला उशीरा जाणं व षष्टय़ब्दीपूर्ती सोहळय़ाला उशीरा जाणं ही ‘काका’च्या दृष्टीनं एकच गोष्ट होती. कारण पुठेही गेला तरी तो ‘सुपरस्टार’च होता. खरं म्हणजे माझ्या साठीच्या समारंभाला मी बासष्ट-त्रेसष्ट होईपर्यंत पोहोचणं हे त्याच्या कीर्तिला साजेसं होतं. आल्या आल्या दरवळलेल्या तोंडानं त्यानं माझ्या कानाला लागून विचारलं, ‘चीफ मिनिस्टर अभी आया नहीं?’
‘आके चला गया.’ मी म्हणालो, ‘उसका मढ आयलंडपे दुसरा शूटिंग था.’
तोंडातल्या तोंडात शिव्या पुटपुटत तो खुर्चीत बसला. प्रमुख पाहुण्यानं उत्सवमूर्तीला शिव्या घालण्याचे प्रसंग कधी घडले असतील?
एकदा तो मला म्हणाला होता, ‘मंत्रालयात माझे दोन मित्र आहेत. ते मला सांगत होते की तू चांगलं लिहितोस म्हणून.’
‘माझेही मंत्रालयात दोन मित्र आहेत’, मी म्हणालो, ‘तेही मला सांगत होते की, तू चांगला तर आहेस म्हणून. तुझे मित्र खरं बोलतायत. माझे मित्र खोटं बोलतायत.’
तो मला मारायला लिफ्टपर्यंत माझ्या मागे धावला होता.
आता मी त्याला माझ्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला चाललो होतो. त्याला कसं हाताळायचं याची मी मनातल्या मनात तयारी करीत होतो. विचारांची गती वाढली की आपसूक माझ्या मोटार-सायकलचा वेग वाढत होता. मृत्यूगोलात फटफटी चालवल्यासारखं मला वाटत होतं.
नेहमीच्या वॉचमननं मला पाहून नेहमीचा चेहरा केला. मी तो असा वाचला, ‘हे फालतू लोक का येतात काकाजींकडे? ते तरी का येऊ देतात? आम्हाला सांगून ठेवा. xxवर लाथ हाणू…’
मी वर गेलो. काकाजी वर्तमानपत्र चाळत बसला होता. माझ्याकडे न बघता तो म्हणाला, ‘का रे साल्या?’
मी माझी हवा जाऊ न देता त्याच्यावर बरसलो. माझा अपशब्दांचा साठा संपत आल्यावर मी कडाडलो, ‘कोण समजतोस रे तू स्वतःला? ‘सुपरस्टार’ अशील तुझ्या घरी. (घरी पुठे? तो चित्रपटप्रेमींच्या हृदयात वस्तीला होता.) मला तोरा नाही दाखवायचा. काय समजलास?’
तो काहीच समजला नाही. काही समजावं असं मी बोललोच नव्हतो. बिचारा आ।़।़ वासून ऐकत होता.
‘पण झालंय काय?’ त्यानं हबपून विचारलं.
‘झालंय नाही, होणार आहे.’ मी अकारणच जोरात म्हणालो.
‘माझ्या मुलाचं लग्न. ही निमंत्रणपत्रिका. याउपर तू नखरे दाखवलेस आणि आला नाहीस तर मी बघून घेईन.’
मी काय आणि कसं बघून घेणार होतो मलाही माहीत नव्हतं. तो राजेश खन्ना होता. मी कोण होतो?
तो मोकळा हसला आणि म्हणाला, ‘थोडक्यात तू मला निमंत्रण द्यायला आलायस. ड्रामेबाज साला. मै आ जाऊंगा. खूश?’
मी खूश झालो आणि समाधानानं बाहेर पडलो. या खेपेला मी वॉचमनचा चेहरा पाहणे कटाक्षानं टाळलं. वाटेत मी ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ गात होतो.
आता ‘अँटी क्लायमॅक्स’ बघा. माझा मित्र राजेश खन्ना लग्नाला फिरकलादेखील नाही. आम्ही मित्र अवश्य असू, पण त्यानं नाही ठरविलं तर नाही. हू अॅम आय टू क्वश्चन हिम? राजेश खन्ना कोण होता – तो की मी?
एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात मी लिहून दिलेली उत्तरे त्यानं मंचावरून दिली. प्रेक्षक जल्लोष करीत होते. एका प्रेक्षकानं नंतर मला विंगेत येऊन विचारले, ‘काय, राजेश खन्नानं आज जिरवली की नाही तुमची?’
‘प्रश्नच नाही.’ मी म्हणालो, ‘शेवटी तो राजेश खन्ना आहे बाबा. मै किस खेतकी मूली?’
‘काका’नं एका उत्तररात्री (उत्तरक्रीय करतात ती उत्तररात्र, अशी त्याची समजूत असावी.) दिल्लीहून मला पह्न लावला. मी दचपून उठलो. यमाचा तर नसेल? या अवेळी त्याला त्याच्या मृत्यूपत्राचा मसूदा हवा होता. मी झोपेत काही तरी बरळलो. त्यानं ऐकलं की नाही व उतरून घेतलं की नाही मला माहीत नाही.
‘याच्या बदल्यात तू तुझा ‘आशीर्वाद’ बंगला माझ्या नावावर कर’ घडय़ाळाकडे बघत मी म्हणलो.
‘मै तो तुझे अठन्नी भी नहीं दूंगा.’ तो म्हणाला.
मात्र हे शब्द त्यानं खरे केले.
माझ्या ‘पुन्हा यादों की बारात’ला त्यानं प्रेमानं प्रस्तावना लिहिली होती हे मी विसरू शकत नाही, विसरू इच्छित नाही.
z [email protected]




























































