
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
पावसाळय़ात हवेत ओलावा जास्त असतो. त्यामुळे अनेक वेळा चेहरा किंवा शरीरावरील प्रत्येक अवयवाचीच जास्त काळजी घेणे, ते स्वच्छ पाण्याने धुणे खूप गरजेचे असते. कारण पावसाळय़ात अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. त्यामुळे आजारांसोबतच त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवत असतात. अशा वेळेस जर तुम्ही मेकअप करणार असाल तर त्या मेकअप प्रॉडक्टची काळजीही घ्यावी लागते. कारण ओलाव्यामुळे फंगस येऊन तुमचे प्रॉडक्ट खराब होण्याची भीती जास्त असते आणि ते मेकअप प्रॉडक्ट जर तुमच्या चेहऱयावर वापरणार असाल तर तेही कोणत्या प्रकारचे वापरावेत हेही समजून घ्यावे लागते.
पावसाळय़ात पायाचा जास्त काळ पाण्याशी संबंध येत असल्यामुळे अनेक वेळा बोटांमधील त्वचेत अनेक आजार उद्भवतात आणि त्यामुळे ही त्वचा खराब होण्याची भीती असते. अशा वेळेस स्वच्छ पाण्याने पाय धुऊन ते कोरडे करून त्यावर पावडर किंवा एखादा क्रीमचा हाताने थोडासा मसाज करावा. तुमच्या पायांची त्वचा खराब होणार नाही. पावसाळय़ात केसांवरही पावसाच्या पाण्याचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे पावसाळय़ात जर पावसाच्या पाण्यामुळे केस भिजले तर ते व्यवस्थित चांगल्या पाण्याने पुन्हा धुऊन घेणेही जास्त फायदेशीर ठरेल. नाहीतर अनेक वेळा काsंडा, केस गळणे तसेच इतर केसांचे आजार उद्भवू शकतात.
पावसाळय़ात फाऊंडेशन पॅची होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फाऊंडेशनचा बेस लावल्यानंतर पावडर लावून तो व्यवस्थित सेट करण्याची जास्त गरज असते. पावसाळय़ात मेकअप करण्यापूर्वी मेकअप बेस योग्य असणे तितकेच महत्त्वाचे असते. लॉन्ग लास्टिंग पावडर, फाऊंडेशन तसेच पावडरयुक्त फाऊंडेशनचा वापर केल्यास चेहऱयावरील मेकअप टिकून राहतानाच तुमचा मेकअप लुक खराब होणार नाही.
- पावसाळय़ात क्रीम बेस मेकअपबरोबर पावडर बेस मेकअपचा वापर करा. त्यामुळे मेकअप जास्त काळ टिकेल. सेटिंग पावडरचा वापर करा. त्यामुळेही मेकअप जास्त काळ टिकू शकतो.
- पावसाळय़ात वॉटरप्रूफ आयशॅडोचा वापर करा, पण त्यातही जर आवश्यकता नसेल तर कमीत कमी आयशॅडो लावा किंवा एकदमच नॅचरल लाइट रंगाची आयशॅडो वापरा. वॉटरप्रूफ आयलाइनरपेक्षाही जेल बेस आयलाइनर किंवा काजळाचा वापर करा. तसेच लिपस्टिकही फार ग्लॉसी न लावता ती मॅट असल्यास ती जास्त काळ टिकेल.
- आयब्रोसाठी अनेक चांगला पंपन्यांचे टॅटू ब्रो येतात. ते तुम्ही मस्कारासारख्या ब्रशने तुमच्या आयब्रोवर लावल्यास एक-दोन दिवस आयब्रो तशाच दिसतील.
- अनेक पंपन्यांनी लॉन्ग लास्टिंग वॉटरप्रूफ मेकअपचे फाऊंडेशन बेस बाजारात आणले आहेत. त्याचा वापर केल्यासही मेकअप जास्त काळ टिकेल. मात्र हे फाऊंडेशन कमी प्रमाणात लावून ते जास्तीत जास्त ब्लेंड करणं आवश्यक असतं. जेवढे जास्त ब्लेंडिंग कराल म्हणजे चांगल्या रीतीने पसरवाल तेवढेच ते व्यवस्थित टिकून राहील आणि कमीत कमी सहा ते आठ तास तुम्ही फ्रेश दिसाल.
वॉटरप्रूफ उत्पादने वापरा
पावसाळ्यात मेकअप केला आणि चेहऱयावर पाणी पडले तर मेकअप जास्त खराब होतो. पावसाळय़ाच्या वातावरणात आर्द्रतेमुळे ओलावा असतो आणि त्यामुळे जास्त घाम येऊन मेकअप खराब होऊ शकतो. मेकअप ओला होऊन तो पसरू शकतो. त्यासाठी वॉटरप्रूफ बेस, वॉटरप्रूफ मस्कारा, वॉटरप्रूफ आयलाइनर या गोष्टींचा वापर केल्यास मेकअप जास्त काळ टिकून राहू शकतो.



























































