साठीतील बीवायपी

88

>> शुभांगी बागडे

मराठी जाहिरातविश्वात अग्रक्रमाने घेतलं जाणारं नाव म्हणजे बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी. ग्राहकांशी अतूट नातं निर्माण करणाऱया या जाहिरात संस्थेला नुकतीच 60 वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त या संस्थेच्या प्रवासाचा घेतलेला वेध.

मराठी माणसाला उद्योग-व्यवसाय जमत नाही हे विधान खोडून काढणारी अनेक मराठी नावं उद्योग जगतात आपलं स्थान टिकवून आहेत. यातीलच एक नाव म्हणजे बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी प्रा. लिमिटेड कमर्शियल, नाटक, सिनेमा इत्यादी क्षेत्रांच्या जाहिराती विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करून ग्राहकांशी अतूट नातं निर्माण करणारी ‘बी. काय. पाध्ये पब्लिसिटी’ या जाहिरात संस्थेला अलीकडेच 60 वर्षे पूर्ण झाली. 9 एप्रिल 1959 रोजी दादरमध्ये या जाहिरात संस्थेची स्थापना झाली. बी. वाय. पाध्ये व त्यांची मेहुणी जयंती जोशी यांनी ‘बी. काय. पाध्ये पब्लिसिटी प्रा. लि’ या जाहिरात संस्थेची स्थापना केली. आज बी. काय. पाध्ये हयात नाहीत तरी त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय विजय, दिलीप व श्रीराम पाध्ये आणि त्यांची मावशी जयंती जोशी यांनी समर्थपणे पुढे सुरू ठेवला आहे. बी. वाय. पाध्ये म्हणजेच बाळकृष्ण यज्ञेश्वर पाध्ये यांनी जाहिरात क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. दांडगा संपर्क, जाहिरात व्यवसायाला पूरक असलेले कलागुण, व्यावसायिकतेसोबत माणसं जोडण्याचं कौशल्य, नवनवीन गोष्टी आणि तंत्र आत्मसात करण्याची हातोटी असे काही महत्त्वाचे गुण जाहिरात क्षेत्रात टिकून राहण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतात. या गुणांच्या बळावरच ‘बीवायपी’ हा ब्रँड तयार झाला.

जाहिरात क्षेत्रात नव्याने येणाऱयांची संख्या बरीच आहे. सध्याच्या डिजिटल क्षेत्रामुळे तर जाहिरात क्षेत्रासाठी नवं दालन खुलं झालं आहे. या क्षेत्रात जम बसवायचा तर गुणवत्ता, कल्पकता, नावीन्य, कौशल्य हे सारेच गुण आवश्यक. यामुळेच केवळ काही संस्थाच स्वत:चं अस्तित्व टिकवू शकतात. हीच बी. वाय. पाध्ये या संस्थेची खासियत आहे. गेल्या साठ कर्षांहून अधिक काळ ग्राहकांना जाहिरात सेवा देत असलेली ‘बी. काय. पाध्ये पब्लिसिटी’सारखी संस्था अजूनही आपलं स्थान बळकट ठेवून उभी आहे.

ही जाहिरात संस्था सुरू करण्यापूर्वी दादा पाध्ये म्हणजे बी. वाय. पाध्ये हे ‘लोकमान्य’ या वर्तमानपत्रात मुद्रितशोधक म्हणून काम करत होते. काही कारणाने हे वृत्तपत्र बंद पडले आणि त्यानंतर पाध्ये यांनी ही जाहिरात संस्था सुरू केली. या प्रवासाबाबत दादांचे थोरले चिरंजीव आणि सध्याचे संस्थेचे संचालक विजय पाध्ये सांगतात, ‘‘1959 मध्ये दादा आणि मावशी जयंती जोशी यांनी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा याबाबत काहीच माहिती नव्हती. ‘जाहिरात एजन्सी’ ही कल्पना बऱयापैकी नवीन आणि फारशी परिचयाच्या नसलेल्या त्या काळात सुरुवातीला अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. खूप मेहनत करावी लागली. त्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तसेच आऊटडोअर मीडियाच्या (होर्डिंग्ज) जाहिराती यांचं प्रस्थ नसल्याने सुरुवातीला प्रिंट मीडियामध्ये काम सुरू झालं. सुरुवातीला संस्थेतलं काम सगळं दादा आणि मावशींनाच करायला लागायचं. ओळखींतून, प्रयत्न करून पार्टीकडून जाहिराती आणायच्या, त्या तयार करून त्या त्या प्रकाशनाला, वृत्तपत्राला किंवा मासिकाच्या ऑफिसला पोहचवायच्या हे सारं दोघंच करत असत. संस्था सुरू झाल्यानंतर चार-पाच वर्षांनी हाताखाली माणूस ठेवण्याइतकी गरज आणि परिस्थिती निर्माण झाली. हे पहिले गृहस्थ म्हणजे धामणसकर जे आजही आमच्यासोबत आहेत.’’

विजय पाध्ये यांनी 1971 पासून संस्थेच्या कामात सहभाग घेतला आणि तेव्हापासून प्रिंट मीडियासोबत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जाहिरातींचं कामही सुरू झालं. बी. वाय. पाध्येंच्या जाहिराती आकाशवाणी, दूरदर्शनवर झळकू लागल्या. याबाबत रेडिओच्या जाहिराती बनवताना बाळासाहेब कुरतडकर, अमीन सयानी यांच्या मदतीचा अनुभव बरंच काही शिकवणारा होता असं विजय जोशी सांगतात.

काळ बदलला तसं क्रिएटिव्हिटीचं स्वरूप, त्याचं माध्यम हे सारं काही बदललं. हे सारे बदल बी. वाय. पाध्ये संस्थेने चांगल्या पद्धतीने आत्मसात केले. ‘डेस्कटॉप पब्लिशिंग’ म्हणजे डीटीपीच्या युगातील नवीन तंत्रं, साधनं अंगिकारत नवीन तंत्रं स्वीकारली गेली. जे व्यवसाय टिकवण्यासाठी फार गरजेचं असतं. याबाबत विजय जोशी सांगतात, ‘‘दादांनी आणि मावशीने मुहूर्तमेढ रोवून नवा रस्ता तयार करण्याचं मोठं काम केलं होतं. कष्ट, स्नेह, हितसंबंध, व्यवहार हे सारं जपत दादांनी व्यवसाय उभारला. त्यांनी संस्थेसोबत केकळ ‘पाध्ये’ हे आडनावच नव्हे तर कसा आणि कारसाही दिला.’’

आज ‘बी. काय. पाध्ये पब्लिसिटी’ संपूर्ण हिंदुस्थान आणि परदेशात सर्व माध्यमांतल्या जाहिराती करते. ‘बी. काय. पाध्ये पब्लिसिटी’ हा एक ब्रँड झाला आहे. छोटय़ा-मोठय़ा, नव्या-जुन्या अशा साऱ्याच कंपन्यांना कमीजास्त प्रमाणात भेडसावणाऱया या समस्या. खरं तर अशा प्रश्नांचा हात धरतच कुठलीही व्यावसायिक संस्था काढते, बहरते, पुढे जाते. तरीही या प्रश्नांचं संधीमध्ये रूपांतर करत ग्राहकांशी आणि समाजाशी असलेली बांधिलकीही जपणारे विरळाच. ही बांधिलकी जपणारी ही संस्था म्हणूनच वेगळी ठरते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या