
>> सोनिया परचुरे, नृत्यदिग्दर्शिका
माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नृत्याचा रियाज. या दिवसांत मला भरपूर रियाज करता आला. रोजचे साडेतीन-चार तास रियाज होतोय. शरयू नृत्य कलामंदिर या माझ्या क्लासने रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण केलंय. संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी मी मोठा कार्यक्रम करते. मी नवीन बॅले करते. यावर्षीही कार्यक्रम ठरवला होता. त्यामुळे बॅलेचे काम एकीकडे सुरू होतं.
सुरुवातीचा महिना मी ऑनलाईन क्लासच्या भानगडीत पडले नाही. मी स्वत: त्यासाठी ‘कम्फर्टेबल’ नव्हते. शास्त्रीय कला गुरुच्या सान्निध्यातच व्हायला हवी. पण सध्याची परिस्थिती लवकर सुधारणार नाही, असं लक्षात आल्यावर मी ऑनलाईन क्लासचा विचार सुरू केला. विद्यार्थांच्या प्रशिक्षणात खंड पडायला नको म्हणून… त्यादृष्टीने मग ऑनलाईन वर्गाची योग्य ‘सिस्टीम’ बनवली. शास्त्रीय कला शिकायला प्रामाणिकपणा लागतो. त्या प्रामाणिकपणाला धक्का न लावता नृत्यप्रशिक्षणाचं कार्य करतेय. यात आणखी एक चांगली गोष्ट घडलेय, ती म्हणजे मी ओव्हरसीज ऑनलाईन क्लास सुरू केले. म्हणजे बाहेरचे लोक जे माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण त्यांना माझ्याकडून शिकायचं आहे, अशा लोकांसाठी हे वर्ग आहेत. जगभरातील नृत्यप्रेमींपर्यंत पोचणं, हा यामागचा उद्देश आहे.
मी आधी सांगितल्याप्रमाणे शरयू नृत्य कलामंदिरला 25 वर्षे पूर्ण झाली. मी नृत्य लहानपणापासून शिकतेय. गेली 24 वर्षे नाटक सिनेमासाठी कोरियोग्राफी करतेय. हा सगळा आढावा घेताना असं लक्षात आलं की मी बऱयाच लोकांबरोबर काम केलंय. बऱयाच लोकांना कोरियोग्राफ केलंय. मला विचारलं जातं की तुम्हाला अमुक एका अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला शिकवताना अडचण आली का? पण अगदी मनापासून सांगते, माझ्या असं लक्षात आलं की या आर्टिस्टना विचारावं की तुम्हाला सोनिया परचुरे बरोबर काम करताना कसं काटलं? उदाहरणार्थ निर्मिती सावंत, संजय नार्वेकर यांसारख्या कलाकारांनी नृत्यशिक्षण घेतलेले नव्हते. मग अशांना माझ्यासोबत नृत्य करताना कोणते अनुभव आले? त्यांना नेमकं काय वाटलं? ती तारेवरची कसरत त्यांनी कशी केली, हे मला जाणून घ्यायचं होतं. मला त्यांचा मनापासून सन्मान करायचा होता. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होती. म्हणून मी या दिवसांत ‘ग्रॅटिटय़ुड’ ही सीरीज फेसबुक पेजवरून सुरू केलेय. यामध्ये मी प्रत्येक कलाकाराकर एपिसोड करते. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी मी एक डान्स स्टेप दाखवते. जेणेकरून त्या स्टेप्सचा सराव प्रत्येकाने घरी करावा. अशा साधारण 30 ते 40 डान्स स्टेप्स माझे व्हिडीओ बघून सर्वांना शिकता येतील. तुम्ही जिमला जाता, व्यायाम करता, योग करता; त्याचप्रमाणे सौंदर्यशास्त्र विकसित करण्यासाठी तुम्हाला थोडा ‘डान्स’ पण आला पाहिजे. डान्सपेक्षा ग्रेसफुल मुव्हमेंट आल्या पाहिजेत. त्यासाठीच हा माझा प्रयत्न आहे.
स्वान्तसुखाय कला
आजूबाजूला नकारात्मक वातावरण असले तरी आपल्याला सकारात्मक राहायचंय. कलेमध्ये प्रचंड ताकद देईल. माणूस कलेपेक्षा मोठा नाही. कला मोठी आहे. कलेतून सकारात्मक उर्जेचा अखंड स्रोत वाहतो. त्याचा आनंद घेऊया. पण रोज नाचून, ते फेसबुकवर टाकून, लाईक्स बघून तो आनंद मिळेलच असं नाही. कोणतीही कला स्कान्तसुखाय असते. जेक्हा मी तोडा, परण, ठुमरी करते, तेक्हा मला त्यातून आनंद मिळतो. तो आंनंद कुणी तरी दुसऱयाने ’छान केलंस’ असं म्हणण्याच्या आनंदाशी संबंधित नसतो.
































































