ठसा – ऍड. शिवांगी झरकर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

‘कायदे में रहोगे… तो फायदे में रहोगे’ असा मूलमंत्र प्रत्येक उद्योगाला आणि उद्योजकतेला किती गरजेचा आहे याची जाणीव, तसेच  प्रत्येक उद्योगाला कायदेशीर उद्योग कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती हीच Law Fleeter च्या संचालिका आणि वकील ऍड. शिवांगी झरकर यांची ओळख. वयाच्या 18 व्या वर्षापासून त्यांनी स्वतःच्या करिअरला सुरुवात केली. एका प्रख्यात घ्ऊ कंपनीमध्ये जॉब करता करता त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय आणि ट्रेनिंग या स्वरूपात त्यांनी 2005 पासून उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आणि स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली. एक लाखाहून अधिक उद्योगांना मार्गदर्शन केले. उद्योजकांचे औद्योगिक आराखडे बनवले,  फ्रेंचाइझी मॉडेल डिझाईन केले,  स्टार्टअपला घडवले आणि कन्सल्टन्ट क्षेत्रात स्वतःचे अढळ असे स्थान प्राप्त केले.  परंतु त्यांचा प्रवास इथपर्यंत थांबला नाही, जेव्हा त्यांना समजले की, उद्योगधंद्याना कायदेशीर आराखडय़ाची आवश्यकता आहे. तेव्हा कायद्याची डिग्री (LLB) घेऊन Business आणि Corporate  Law त्यांनी बिझनेस आणि कॉर्पोरेट लॉमध्ये मास्टरी मिळवली.  आज त्या NCLT,  उच्च न्यायालय,  Technology Law,  Fintech law,  Cyber law,  MSME,  जिल्हा व सत्र  न्यायालय, RERA,  IPR,  DRT, विमा आणि बँक न्यायालय यांमध्ये सक्रियरीत्या काम करतात आणि उद्योगांना कायदेशीर मदत करतात. कायदा उद्योगाला कसा वाचवतो आणि न्यायालय कारवाई न करता उद्योग कसा करावा यासाठी त्या विशेष मार्गदर्शन नवनवीन उद्योग आणि उद्योजकाला करतात.  कोरोनाच्या काळात बऱयाच लोकांचे पैसे अडकले आणि किंवा त्यांचे पैसे बुडाले. अशा सर्व लोकांच्या सायबर, कन्झ्युमर तसेच चेक बाऊन्सच्या केसेस त्यांनी या कोरोनाच्या काळात सोडवल्या.

आजपर्यंत  ऍड. शिवांगी यांना तब्बल 25 हून अधिक राष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत आणि 2021 मध्ये इंटरनॅशनल आशिया अवॉर्डदेखील त्यांना प्राप्त झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी 4 research पेपरदेखील लिहिले आणि पब्लिश केलेत. आज ऍड. शिवांगी यांचे व्हर्च्युअल लॉयर सर्व्हिस आणि बिझनेस लिगल कार्ड सामान्य उद्योगाला कॉर्पोरेटप्रमाणे कायदेशीर सुरक्षितता देतात.

आज ऍड. शिवांगी काही औद्योगिक चेंबर सोबत सक्रिय काम करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीना कायदेशीर सल्ले देतात आणि परदेशात भारतीय उद्योगांना उद्योग विकासाची संधी देतात. स्टार्टअप ते IPO या प्रोग्राम द्वारा स्टार्ट अप आणि SME उद्योगांना VC फंड आणि IPO ला रजिस्ट्रेशनसाठी मदत करतात.

आज स्टार्टअप ते पब्लिक लिमिटेड सर्व कंपनीना कायद्याची मदत ही लागतेच. अशा प्रत्येक उद्योगाला एक वकिलाची मदत ही लागतेच. अशा  या औद्योगिक, कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रात ऍड. शिवांगी यांचा मोलाचा वाटा आहे.

  •  रचना लचके–बागवे