
>> विशाल फुटाणे
दक्षिण भारतातील मध्ययुगीन शिलालेखांत ‘क्षितिरुह नोम्पी’ या व्रताचे उल्लेख आहेत. चालुक्यकालीन कन्नड-तेलगू मिश्रित या शिलालेखात बोप्पण नायक व त्याची पत्नी सिंदेवी यांच्या समाजहितासाठी या वृक्षारोपणाच्या व्रताचा पवित्र संकल्प केल्याचे उल्लेख म्हणजे पर्यावरण जोपासल्याचे उदाहरणच आहे.
दक्षिण भारतातील प्राचीन मध्ययुगीन शिलालेखांतून अनेक व्रत कल्पना यांचा उलगडा होतो. भारतीयांच्या दैनंदिन रूपूजा, व्रते, लोकविश्वास हे सर्व निसर्गकेंद्रित आहेत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक व्रताचा हेतू आहे स्वतचे शुद्धीकरण आणि समाजाचे कल्याण, पण काही व्रते अशी असतात, जी माणूस आणि निसर्ग यांच्यातील संबंधच बदलून टाकतात. क्षितिरुह नोम्पी हे असेच विलक्षण व्रत. दक्षिण भारतातील मध्ययुगीन शिलालेखांत उल्लेखिलेल्या ‘क्षितिरुह नोम्पी’ या व्रताचे महात्म्य अतिशय विलक्षण आहे. क्षितिरुह म्हणजे पृथ्वीवर रुजणारा वृक्ष आणि नोम्पी म्हणजे उपवास संकल्प दान या धार्मिक त्रिसूत्रीने युक्त व्रत. म्हणजेच झाड लावणे, झाड जगवणे आणि ते समाजहितासाठी अर्पण करणे हा या व्रताचा एक पवित्र आध्यात्मिक संकल्प.
इ.स.1190 च्या सुमारास भिल्लम चालुक्य राजाच्या कारकीर्दीतील एक चालुक्यकालीन कन्नड-तेलगू मिश्रित शिलालेख आहे. या शिलालेखात बोप्पण नायकाचे (सामंत) महत्त्वपूर्ण कार्य दिसून येते. यात त्याच्या पत्नीचे सिंदेवी नावाच्या एका विलक्षण स्त्राrचे कार्य प्रकाशात येते. इतिहासामध्ये स्त्राr-पुरुषांची ओळख बहुतेकदा घराणे, वैवाहिक नाते किंवा राजकीय प्रतिष्ठा यांवरून होत असे. परंतु या शिलालेखात सिंदेवीची ओळख तिच्या नवऱयाच्या पदावरून नाही, तर तिच्या आध्यात्मिक आणि पर्यावरणप्रति असलेल्या जाणिवेतून होते तिला ‘व्रतकर्मी’ असे गौरवपूर्ण संबोधन दिले आहे. तिने क्षितिरुह विदुवोन्नु नोम्पी म्हणजेच ‘वृक्ष रुजवण्याचे जगवण्याचे व्रत’ अखंड निष्ठेने आणि दूरदृष्टीने केले. तिने वृक्ष लागवडीसाठी धर्मसंस्था स्थापन केली, जी प्रत्येक गावात वृक्षारोपण करीत असे आणि त्याचे संरक्षण आणि संगोपन करायची. एका स्त्राrच्या हातून पूर्ण गावाच्या परिसंस्थेला, अर्थव्यवस्थेला, सामाजिक जीवनाला आणि धार्मिक परंपरांना नवी झळाळी देणारा हा उपक्रम होता.
सामान्यत भारतीय व्रते ही देवभक्ती, मनशुद्धी किंवा कौटुंबिक मंगलासाठी केली जात. पण क्षितिरुह नोम्पी हा त्यापेक्षा वेगळा आध्यात्मिक दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम. हे व्रत देवपूजेइतकेच भूमीपूजेसाठी होते. पृथ्वीचे ऋण झाड लावून, झाड वाआणि झाड समाजाला सोपवूनच फेडता येते ही तत्त्वज्ञानाची शिकवण या व्रताच्या केंद्रस्थानी आहे. या व्रताच्या तीन पायऱया होत्या उपवास, संकल्प आणि दान. यात भारतीय धार्मिक व निसर्गदृष्टीचा दिव्य त्रिवेणी संगमच आहे. उपवास हा मनःशुद्धीसाठी दिवसभर उपाशी राहून, संकल्प हा व्रताच्या दीर्घकालीन परिणामांना पवित्र दिशादर्शन करण्यासाठी ब्राह्मणाच्या साक्षीने समस्त जनतेसमोर विधीपूर्वक केला जाई आणि शिलालेखातून दान नोंद करणे म्हणजे झाड व समाज दोघांसाठी टिकाऊ रचना उभी करणे. शिलालेखांतून कळते की, झाडांची नेमणुकीसोबत त्यांच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी माळी, जमीन, उत्पन्नाचे हक्क आणि जबाबदाऱया निश्चित केल्या जात. म्हणजेच झाड लावून सोडणे नव्हे, तर झाड जपण्याची व्यवस्थित ग्रामव्यवस्था तयार केली जाई. आज आपण ज्या गोष्टींना ‘सस्टेनेबिलिटी’, ‘एन्व्हायर्नमेंटल एथिक्स’ म्हणतो, त्या त्या काळी धर्म आणि सामाजिक कर्तव्य मानल्या जात होत्या.
सिंदेवी हे या व्रताचे सर्वात तेजस्वी आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. तिचा पती बोप्पण नायक हा 100 गावांचा प्रमुख होता, परंतु इतिहासाने तिच्या नवऱयापेक्षा तिच्या व्रताला जास्त महत्त्व दिले. कारण तिचा संकल्प गावाच्या पलीकडे जाऊन भूमीमातेच्या रक्षणाशी जोडलेला होता. तिने आंबा, पिंपळ, वड, जांभूळ, चिंच, नारळ, पळस, सुपारी अशी असंख्य वृक्ष प्रजाती मोठय़ा प्रमाणावर लावल्या. तिने लागवड करून झाडे कोरडीत न सोडता त्यांना वायासाठी माळी नेमला. त्याला घर, जमीन आणि झाडांच्या उत्पन्नावर विशिष्ट हक्क दिले. चिंचेच्या झाडाच्या वार्षिक उत्पन्नाचा काही भाग मंदिराला देण्याची तिची योजना ही पर्यावरण, धर्म आणि अर्थशास्त्र यांच्या अद्भुत एकत्रीकरणाचा उत्तम नमुना आहे. 11 व्या शतकातील प्राचीन शिलालेखांतून दिसणारी झाडांची निवडही भारतीयांच्या सूक्ष्म विवेकाचे द्योतक आहे. वड हा दीर्घायुष्याचे आणि छायादानाचे प्रतीक, पिंपळ हा धार्मिक पवित्रतेचे केंद्र, लिंब निंब हा औषधी आणि आरोग्याच्या शास्त्राशी जोडलेला वृक्ष, तर आंबा समृद्धी आणि हंगामी अर्थव्यवस्था, चिंच मंदिरांना निश्चित उत्पन्न, पळस पशुधन आणि वनऔषधीसाठी उपयुक्त. शिलालेखात मसाले वृक्ष हे व्यापारासाठी नमूद आहेत. म्हणजे ही झाडे केवळ सौंदर्यासाठी नव्हती, तर गावाची अर्थव्यवस्था, जलव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था यांच्यातील महत्त्वाची कडी होती. या व्रताचे सामाजिक परिणाम अत्यंत व्यापक होते. आज ज्या गोष्टींसाठी आम्ही कोटींचे प्रकल्प आखतो, त्या गोष्टींना त्या काळात एका स्त्राrच्या व्रताने सहज शक्य केले होते. हे व्रत म्हणजे पर्यावरण संवर्धनाची सर्वात प्राचीन आणि व्यवहार्य भारतीय पद्धती.
क्षितिरुह नोम्पी हे व्रत आजही शिकवते, झाड म्हणजे दान, कर्तव्य, धर्म होते. हा विचार हजार वर्षांपूर्वी जितका सार्थ होता, तितकाच आजही आहे. सिंदेवीचे कार्य म्हणजे केवळ एक ऐतिहासिक नोंद नाही, तर ती भारतीयांची सर्वात सुंदर पर्यावरण परंपरा आहे. आज तिची आठवण करणे म्हणजे पृथ्वीप्रति दिलेला एक हरित प्रणच आहे.
(लेखक इतिहास व पुरातत्व संशोधक आहेत.)





























































