प्रासंगिक – बालगंधर्व ते आनंदगंधर्व

1398

>> मुलाखत – शिल्पा सुर्वे

पंचम निषादची संकल्पना आणि ऋत्विक फाऊंडेशन आयोजित ‘बालगंधर्व ते आनंदगंधर्व’ – बखर नाट्यसंगीताची हा बहारदार कार्यक्रम शनिवार, 18 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता नेहरू सेंटर ऑडिटोरियम, वरळी येथे सादर होणार आहे. त्यानिमित्ताने प्रसिद्ध शास्त्र्ााrय संगीत गायक आनंद भाटे यांच्याशी साधलेला संवाद…

बालगंधर्क ते आनंदगंधर्व-बखर नाटय़संगीताची या कार्यक्रमाची नेमकी संकल्पना काय आहे?

‘बालगंधर्व ते आनंदगंधर्व’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध नाटय़संगीताच्या परंपरेविषयीचा कार्यक्रम आहे. पंचम निषादचे शशी व्यास यांची ही संकल्पना आहे. मराठी नाटय़संगीत जगप्रसिद्ध करण्यात बालगंधर्वांची भूमिका फार मत्त्वाची असून सामान्य रसिकांमध्ये त्यांनी नाटय़संगीताची गोडी रुजकली आहे. मी लहानपणापासून बालगंधर्कांची गाणी गातोय. मी दहा वर्षांचा असताना मला ‘आनंदगंधर्व’ म्हटले गेले. म्हणून कार्यक्रमाचे नाव ‘बालगंधर्व ते आनंदगंधर्व’ असे आहे. माझ्याबरोबर आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा कैशंपायन, सुमेधा देसाई असे गायकही आहेत. बालगंधर्क ते इतर गंधर्व, म्हणजे छोटा गंधर्व, सवाई गंधर्व त्याबरोबर मास्टर दीनानाथजी यांच्यासारखे इतर दिग्गज गायक यांना कार्यक्रमातून मानकंदना दिली जाणार आहे. माझ्या वैयक्तिक सहभागाबद्दल म्हणाल तर मी बाल गंधर्व, छोटा गंधर्व, सवाई गंधर्व यांची गंधर्व गायकी उलगडून गाणी सादर करणार आहे.

तुमच्या ‘गंधर्व गान’ वेबसीरिजप्रमाणेच हा कार्यक्रमही वेगळा प्रयोग म्हणायचा का?

आम्ही ‘गंधर्व गान’ नावाची वेबसीरिज केली. स्मृतिगंध या फेसबुक पेजवर आणि यू टय़ूब चॅनेलवर ही सीरिज प्रकाशित झाली. गंधर्कगानचे दोन पर्वात 18 भाग झाले. साधारणपणे 15 ते 20 लाख ह्यूज मिळाले, रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लोक नुसतं नाटय़संगीत ऐकतातच, पण त्यातील जी सौंदर्यस्थळं आहेत, ती जर लोकांना दाखवली, गायकीची वैशिष्टय़े सादर केली तर लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. असाच प्रयत्न आम्ही गंधर्व गान सीरिजच्या माध्यमातून केला, आता या कार्यक्रमातून करतोय असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

असे प्रयोग करताना गुरू पंडित भीमसेन जोशी यांचे स्मरण नक्कीच होत असेल.

सवाई गंधर्वांचा शास्त्र्ााrय संगीताचा वारसा मी पंडित भीमसेनजींकडे शिकलो. सवाई गंधर्वांशी माझं नातं भीमसेनजींच्या माध्यमातून निर्माण झालं. तसं म्हटलं तर त्यांच्याशी माझं दोन बाजूंनी कनेक्शन आहे. सवाई गंधर्व जसे शास्त्र्ााrय संगीत गायचे, तसे त्यांनी पूर्वी संगीत नाटकांत पण कामे केलेली आहेत. सवाई गंधर्व आणि माझे पणजोबा, भाटे बुका हे एकाच नाटक कंपनीत, नाटय़कलाप्रवर्तक संगीत मंडळी या कंपनीत होते. त्यामुळे ते नातं आहेच. फिल्म डिव्हिजनच्या एका कार्यक्रमात पंडित भीमसेनजींनी ‘आनंद भाटे के उपर भरोसा है’, असे म्हटले होते. भीमसेनजींनी दाखवलेला हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करतोय. भीमसेनजींना कुठलाही संगीत प्रकार निषिद्ध नव्हता. ते शास्त्र्ााrय संगीताचे सम्राट होते. नाटय़संगीत आणि संतवाणीदेखील त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती. त्यामुळे माझाही तसाच प्रयत्न असतो. शास्त्र्ााrय संगीताच्या मैफलीप्रमाणे अन्य प्रकारही मी सादर करतो.

माध्यमं बदलताहेत, प्रयोग होताहेत… नाटय़संगीताचे भविष्य कसे बघता?

कुठलीही परंपरा टिकवण्यासाठी त्या परंपरेचा गाभा तसाच ठेवून त्यात प्रयोग केले की ती टिकते. ‘बालगंधर्व’ सिनेमाच्या माध्यमातून नाटय़संगीत घराघरांत आणि नव्या पिढीपर्यंत पोचले. जे लोक मुद्दाम उठून मैफलीला जाणाऱयातील नाहीत त्यांच्यापर्यंत नाटय़संगीत सिनेमाच्या मार्फत पोचले. शाळा-कॉलेजातील मुले आजही सांगतात आम्ही ‘बालगंधर्क’ सिनेमा बघितला, तेव्हापासून शास्त्र्ााrय संगीत, नाटय़संगीत ऐकायला लागलो. बालगंधर्व आणि त्यानंतर आलेला ‘कटय़ार काळजात घुसली’ हा सिनेमा याबाबत मैलाचा दगड आहेत. या दोन्ही सिनेमांच्या बाबतीत हेच झाले की परंपरा आहे, पण ती वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलीत. ‘बालगंधर्व’ सिनेमाच्या बाबतीत पारंपरिकता जपली गेली, पण जे रेकॉर्डिंग टेक्निक, बॅकग्राऊंड थोडे नकीन पद्धतीचे होते. अशा प्रकारे परंपरेला धक्का न लावता प्रयोग केले की लोकांना निश्चित भावतात, ‘गंधर्वगान’ सीरिजदेखील नकीन माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली. नवा ट्रेंड लोकांना आवडू लागलाय…बदल होतोय.

 

आपली प्रतिक्रिया द्या