लेख – ईशान्येतील अशांतता संपविण्यासाठी…

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ([email protected])

हिंदुस्थानी सैन्याने आसामात रक्तपात घडवून आणणाऱ्या बोडो दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली. त्यामुळे बोडो दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. मात्र बांगलादेशी घुसखोरी या मूळ समस्येवरही कायमचा न्याय शोधला पाहिजे. विविधतेत एकता हे वैशिष्टय़ टिकवायचे तर घुसखोरांबाबतचे कायमस्वरूपी धोरणही ठरवण्याची गरज आहे. अन्यथा वांशिक संघर्षाची धग अशीच जाणवत राहील. बोडोंच्या राजकीय महत्त्वाकांक्षांनाही राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळाले पाहिजे. ‘बोडो करारकरून ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवाद संपवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे.

24 जानेवारीला आसाममध्ये बंदी घालण्यात आलेल्या आठ दहशतवादी संघटनांच्या 644 दहशतवाद्यांनी 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनांच्या दहशतवाद्यांनी आसामाचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले.

बोडोलॅण्ड वादामुळे आतापर्यंत 2 हजार 823 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 27 वर्षांतील हा तिसरा आसाम करार आहे. या करारानुसार नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड या संघटनेचे 1,550 माओवादी 30 जानेवारी रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. केंद्र सरकारने बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा 1967 अंतर्गत या संघटनेवर बंदी घातली. या हिंसाचारादरम्यान 2 हजार 823 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

आसामातून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीने आसामचे दोन भाग केले आहेत. अप्पर आसाम आणि लोअर आसाम. वरच्या आसामातली सुपीक जमिनीत चहाच्या मळ्यांची तेजी आहे. ढुबरी, कोक्राझार, बोंगाईगाव, गोलपारा हा सारा भाग खालच्या आसाममधला. बोडो-कचारी या आदिवासी जमाती याच भागातल्या. त्या भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरी झाली आणि त्यातून बोडोलॅण्डची मागणी पुढे आली. 1952 सालापासून स्वदेशी विरुद्ध आक्रमक परकीय अशा चकमकी वारंवार झडत आहेत. परंतु असे घुसखोर ‘पाक’ असल्याने त्याविरोधात ठोस भूमिका घेणे त्यावेळच्या सरकारला आवश्यक वाटले नाही. 1993, 1994, 2008 साली असेच घुसखोर पुरस्कृत मोठे दंगे झाले होते. परंतु मतपेटीचे राजकारण्यामुळे घुसखोरी निर्विघ्नपणे सुरू होती. बोडो ही जमात पंचमहाभूतांची उपासना करते. त्यातील एक गट यज्ञ करतो. ते हिंदू आहेत. बोडो आदिवासी सशस्त्र आहेत. त्यांची पूर्वपीठिका महाभारत काळापर्यंत जाते. आसाममधील मूळ रहिवासी-आदिवासी स्वतःला भीमपुत्र घटोत्कचाचे वंशज मानतात. महाभारतातील कौरव-पांडव युद्धाचा शेवट घटोत्कचाच्या पराक्रमाने झाला असता, पण खास शक्ती वापरून कर्णाने घटोत्कचाला ठार केले.

पूर्वांचलामधील बोडो ही एकच भाषा आहे, जिची लिपी देवनागरी आहे. बोडो समाज हा पूर्वांचलामधील सर्वात मोठा व प्रगत समाज आहे. 2015 सालचे निवडणूक आयुक्त ब्रह्मा हे बोडो आहेत. बांगलादेशी घुसखोरांनी तेथील जमिनी बळजबरीने काबीज केल्या. तेथील जंगले, जमिनी, वनखात्याच्या जागा, सरकारी जागा बांगलादेशी घुसखोरांनी काबीज केल्या आहेत. त्यावेळेच्या सरकारने त्या अधिकृत केल्या.

मूळ बोडो आंदोलन 1982 मध्ये सुरू झाले. IDMT कायदा स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पारित केला. पण या कायद्यातील त्रुटी अशा आहेत की, त्यातून बांगलादेशी घुसखोर आसामात नीट स्थापित व्हावेत. 2000 सालापर्यंत फक्त 800 घुसखोर परत पाठवण्यात आले. बांगलादेशी घुसखोर असणाऱ्या समाजाचा विकास जाणीवपूर्वक केला गेला, परंतु बोडोंचा विकास मात्र झाला नाही.

त्यातूनच Bodo libaration tigers चा जन्म झाला. सशस्त्र उठाव केला गेला.  Bodo Teritorial administrative Distrit तयार केले गेले. ‘बोडोलॅण्ड एरिया टेरिटोटिअल डिस्ट्रिक्टस्’ (BATD) निर्माण करून दिल्याने बोडोना काही अंशी स्वायत्तता मिळाली. गेल्या 20 वर्षांत BATD च्या कोक्राझार, चिरांग, बक्सा व उदालगुडी या चार जिल्हय़ांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या प्रचंड वाढू लागली. वनभूमी व शेतजमीन बळकावणे, कापणी झालेली पिके लुटणे, जनजातीयांच्या मुली पळवणे, मंदिरे नष्ट करणे, जागोजागी अवैध मशिदी व मदरसा बांधणे अशा प्रकारच्या घटना गेली काही वर्षे लोअर आसामच्या या जिल्हय़ांमध्ये वरचेवर घडू लागल्या.

2008 मध्ये हिंसाचार बोडो विरुद्ध बांगलादेशी घुसखोर असा झाला. बोडो बंडखोरांचा आसामच्या कोक्राझार आणि बक्सा जिह्यांत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यावेळच्या राज्य सरकारने 2013 मध्ये बांगलादेशींना स्वरक्षणासाठी शस्त्र उपलब्ध करून देण्याचा अफलातून निर्णय घेतला.

2012 मध्ये झालेली लोकसंख्या गणनेची आकडेवारी यूपीए सरकारने जाहीर केली नाही, कारण आसामची 35-40 टक्के लोकसंख्या बांगलादेशी आहे. बाकी देशात मतदारांच्या संख्येत 1.5 टक्के वाढ झाली आहे, पण आसामचे मतदार याच काळात 16 टक्के वाढले आहेत. अर्थात ही वाढ बांगलादेशी घुसखोरांमुळे आहे. घुसखोरी अशीच चालू राहिली तर 2026 च्या आधी एखादा बांगलादेशी आसामचा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. अनेक तज्ञांच्या मते या सीमेपासून 500 यार्डांच्या आत निवृत्त/रिटायर झालेल्या सैनिक आणि अर्ध सैनिकांच्या वस्त्या, घुसखोरी कायमची थांबण्यासाठी वसवल्या पाहिजे.

हिंदुस्थानी सैन्याने आसामात रक्तपात घडवून आणणाऱ्या बोडो दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली. त्यामुळे बोडो दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. मात्र बांगलादेशी घुसखोरी या मूळ समस्येवरही कायमचा न्याय शोधला पाहिजे. विविधतेत एकता हे वैशिष्टय़ टिकवायचे तर घुसखोरांबाबतचे कायमस्वरूपी धोरणही ठरवण्याची गरज आहे. अन्यथा वांशिक संघर्षाची धग अशीच जाणवत राहील. बोडोंच्या राजकीय महत्त्वाकांक्षांनाही राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळाले पाहिजे. ‘बोडो करार’ करून ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवाद संपवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून बोडोलॅण्ड वाद संपुष्टात आणण्यास केंद्रातील सरकारला यश आले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो माओवादी यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारामुळे गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेला बोडोलॅण्ड वाद तूर्त तरी संपुष्टात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या