विदर्भातील यशच्या रुपात घडला ‘सुलतान शंभू सुभेदार’

41

सामना ऑनलाईन । मुंबई

विदर्भातील सत्य घटनेवर आधारित असलेला सुलतान शंभू सुभेदार लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ‘सुलतान शंभू सुभेदार’ ही भूमिका साकारणारा बालकलाकार यश गिरोळकरच्या अभिनयाची सध्या चित्रपटसृष्टीत चर्चा रंगली आहे. यश हा सिनेमाचे निर्माते कैलास गिरोळकर यांचा मुलगा आहे

मूळचा अमरावतीचा असलेल्या १४ वर्षांच्या यशला लहानपणापासूनच गाण्याची, नाचण्याची आणि अभिनयाची आवड आहे. इतकंच नव्हे तर यश हार्मोनियम, सितार आणि कॅसियो ही वाद्यदेखील उत्तमरित्या वाजवतो. त्याबरोबर तो अमरावतीतील फॅशन शो चा विजेताही राहिला आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बालनाट्य पुरस्कार देखील पटकावला असून त्याने ‘सोबती’ नावाची शॉर्टफिल्म देखील केली आहे. तसेच भट्टी, झाडं यांसारखी नाटकं देखील केली आहेत. विविध कलाक्षेत्रात जबरदस्त पकड बसवलेला हा पठठ्या केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण विदर्भात खूपच प्रसिद्ध आहे.

सुलतान शंभू सुभेदार या भूमिकेत यशने केलेल्या अभिनयाची सध्या वाह वाह होत आहे. या भूमिकेसाठी यशने झोपडपट्टीतीवल राहणीमाणाचा अभ्यास केला. तेथील लोकांशी त्याने संवाद साधला. त्याच्या या मेहनती स्वभावामुळे त्याने साकारलेली भूमिका देखील चोख पार पाडली. यश गिरोळकरसह या सिनेमात दिगंबर नाईक, किशोर महाबोले, देवेंद्र दोडके, अॅड.प्रशांत भेलांडे, जयवंत भालेकर, उज्वला गाडे, सुप्रिया बर्वे, सिमरन कपूर, ज्योती निसळ यांच्या देखील भूमिका आहेत. डॉ. राज माने यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून कैलास गिरोळकर आणि अॅड.प्रशांत भेलांडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या