
>> प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे
ओमायक्रोनला घाबरण्याची गरज नाही. या नवीन प्रकारामुळे ऑक्सिजन पातळीत घट होत नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून ज्यांना गंभीर आजार नाहीत त्यांचे लक्ष विलगीकरणावर असावे. उपलब्ध माहिती असेही सूचित करते की, या आजारामध्ये बरे होण्याची प्रक्रिया खूप जलद होते. 80 ते 90 टक्के रुग्ण 5-8 दिवसांमध्ये बरे होत आहेत. त्यामुळे सतर्क राहा. कोविड प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करा. संसर्ग झाल्यास विलीनीकरण करा. या उपाययोजना आणि लसीकरणामुळे पूर्ण करा. 60 वर्षांवरील व्यक्तीनी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे.
ओमायक्रोनचा प्रभाव सौम्य आहे. घाबरू नका, विलगीकरण करा. याचा सामना करण्यासाठी आपण अधिक तयार आहोत. दुसऱया डोसच्या संरक्षणामुळे आपली प्रतिकारशक्ती अधिक चांगल्या स्थितीत आहे.
हिंदुस्थानात कोविडच्या तिसऱया लाटेला सुरुवात झाली आहे. रोज दीड लाखापेक्षा अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेला ओमायक्रोन हा प्रकार फुप्फुसांवर फारसा परिणाम न करता मुख्यत्वे वरच्या श्वसनमार्गावर आणि वायुमार्गांवर परिणाम करतो. ज्यांना इतर गंभीर आजार नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये. तसेच रुग्णालयातील खाटा अडवू नयेत. रुग्णांनी घरीच स्वतंत्र खोलीत राहण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण ओमायक्रोन या नवीन विषाणूच्या प्रकारामुळे पूर्ण बरे होण्यास लागणारा वेळ कमी आहे.
ओमायक्रोनचा फुप्फुसांऐवजी वरच्या श्वसनमार्गावर आणि वायुमार्गांवर परिणाम होत आहे. म्हणूनच ऑक्सिजनची पातळी कमी झालेले किंवा डेल्टा प्रकारामध्ये आपण पाहिलेले इतर गंभीर लक्षणे असलेले रुग्ण खूप कमी दिसतात. ताप येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे आणि खूप अंगदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे आपण येथे पाहात आहोत. यापैकी कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास, अशा रुग्णांनी पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी. कारण मग ते स्वतःला वेगळे ठेवू शकतात आणि समाजातील इतर लोकांमध्ये संसर्ग पसरण्यापासून रोखू शकतात.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जिनोमिक देखरेखीद्वारे 1500 ओमायक्रोन प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी 474 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
हिंदुस्थानातील फुप्फुस रोगांचे तज्ञ आणि हिंदुस्थानच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य, डॉ. गुलेरिया यांनी यावर जोर दिला की, ज्यांना गंभीर आजार होण्याची अधिक शक्यता आहे, त्यांच्यासाठी रुग्णालयातील खाटा मोकळ्या राहिल्या पाहिजेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची जरुरी नाही.
ओमायक्रोनला घाबरण्याची गरज नाही. या नवीन प्रकारामुळे ऑक्सिजन पातळीत घट होत नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून ज्यांना गंभीर आजार नाहीत त्यांचे लक्ष विलगीकरणावर असावे. आपण विलगीकरणाच्या धोरणावर काम केले पाहिजे. घाबरून जाऊन हॉस्पिटलमध्ये खाटा अडविणे आवश्यक नाही. उपलब्ध माहिती असेही सूचित करते की, या आजारामध्ये बरे होण्याची प्रक्रिया खूप जलद होते. 80 ते 90 टक्के रुग्ण 5-8 दिवसांमध्ये बरे होत आहेत.
भूतकाळातील संसर्गापासून उच्च पातळीच्या प्रतिकारशक्तीमुळे आणि दुसऱया डोसच्या लसीकरणाचे संरक्षण 60 टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपला देश अधिक चांगल्या स्थितीत आहे.
साथीचा रोग अजून संपलेला नाही. नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे. आपण ओमायक्रोनच्या रूपात एक नवीन प्रकार पाहत आहोत, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत. हे अनेक घटकांमुळे शक्य झाले आहे. प्रथमतः आपली प्रतिकारशक्तीची पातळी खूप चांगली आहे. लसीकरण मोहिमेमुळे, जवळजवळ 80 टक्के प्रौढ लोकसंख्येला दुहेरी लसीकरण केले गेले. नैसर्गिक संसर्गामुळे मोठय़ा संख्येने लोकांना नैसर्गिक प्रतिकारशक्तीदेखील मिळाली आहे आणि सेरो सर्वेक्षण माहिती असे सूचित करते की, आमच्या लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे.
दुसरे असे की, आपण वैद्यकीय सुविधांच्या बाबतीतही चांगले तयार आहोत. मग ते मेडिकल ऑक्सिजन प्लांट्स असोत, आयसीयू बेड्स असोत, व्हेंटिलेटर असोत, रेमडेसिवीर इंजेक्शन असोत, तयारी आणि प्रतिकारशक्तीच्या बाबतीत आपण चांगल्या स्थितीत आहोत. कोविड-19 विषयी पाळलेले नियम हे नवीन प्रकाराशी लढण्यासाठी सर्वात प्रभावी साधन असेल. म्हणून, जेव्हा तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आणि वारंवार हात स्वच्छ धुणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ओमायक्रोनवरील उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, देशात आणि बाहेर ओमायक्रोनचा प्रसार थांबवण्यासाठी चाचणी महत्त्वाची आहे.
भूतकाळाच्या तुलनेत घाबरण्याचे कारण नाही. युरोप, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतून ओमायक्रोनसंदर्भात उपलब्ध माहितीनुसार ओमायक्रोन विषाणू सौम्य आहे. यामध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसतात. हॉस्पिटलमधे दाखल होण्याची आणि ऑक्सिजनची गरज फारच कमी भासते. आपल्याकडे रुग्णांची संख्या वाढेल, परंतु रुग्णालयात दाखल होण्याइतके ते गंभीर नसतील. ओमायक्रोनचा संसर्ग झालेल्यांनाही पूर्ण लसीकरणामुळे गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण मिळत राहील.
उपलब्ध माहिती असे स्पष्टपणे दर्शविते की, गंभीर रोग आणि मृत्यूपासून पूर्ण लसीकरण संरक्षण करत आहे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांनी पुढे येऊन लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय, त्यांच्यापैकी ज्यांचा दुसरा डोस चुकला आहे, त्यांनी पुढे येऊन दुसरा डोस घ्यावा. कारण तुम्ही दोन्ही डोस घेतल्यावरच आपले पूर्णपणे संरक्षण होईल.
घरगुती कार्यक्रमांमुळे ओमायक्रोन अधिक वेगाने पसरू शकतो. त्यामुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकते. अधिक महत्त्वाचे म्हणजे, हा एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे त्यामुळे गर्दीत जाणे टाळा. ज्यामुळे संसर्ग अधिक वेगाने पसरू शकतो. विशेषतः बंदिस्त जागेत हवा खेळती नसल्याने या जागेत ओमायक्रोन अधिक वेगाने पसरू शकतो. अर्थात ओमायक्रोन विषाणूला घाबरण्याचे कारण नाही. आता तर Molunipirav नावाच्या गोळ्याही पुढील आठवडय़ात उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे सतर्क राहा. कोविड प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करा. संसर्ग झाल्यास विलीनीकरण करा. या उपाययोजना आणि लसीकरणामुळे पूर्ण करा. 60 वर्षांवरील व्यक्तीनी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांना बूस्टर डोस लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे.






























































