लेख – स्वागत दिवाळी अंकांचे (भाग- 4)

467

वसा

आयडिया ऑफ इंडिया आणि तरुणाईया विशेष विभागात राही श्रुती गणेश, हिना कौसर खान पिंजार आणि नचिकेत कुलकर्णी यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत आपल्या संकल्पनेतील भारत देश स्पष्ट करणारे लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. ‘राजकारणया सदरात चैत्रा रेडकर, राजू परुळेकर, प्रमोद मुजुमदार, श्रीरंजन आवटे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. कलेत रुजलेल्या जात व्यवस्थेची आणि त्याच्या दुष्परिणामांची चिकित्सा करणारा रिशेपिंग आर्टया गाजलेल्या इंग्लिश पुस्तकातल्या एका प्रकरणाचा संपादित मराठी अंश वाचकांना विचारप्रवृत्त करणारा आहे. याशिवाय सिस्टर फ्रेंडस् (संयोगिता ढमढेरे), व्हॅन गॉगरंगाचा शोधयात्री (सई पवार), कलेचा जागर (सिरत सातपुते), ‘स्टॅण्डअप कॉमेडी त्रस्त संतप्त हास्यरसहा दीपाली दोंदे यांनी तरुणाईच्या हास्यरसाचा घेतलेला धांडोळा आदी लेख वाचकांना नक्कीच आवडतील.

संपादक : संध्या नरेपवार

पृष्ठे : 224., मूल्य :  200/-.

कलामंच

सुप्रसिद्ध लेखक कवी चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरतीप्रभू यांच्या स्मरणार्थ हा दिवाळी अंक प्रकाशित होत असतो. ‘दिवंगत साहित्यिकांवर स्मरणलेखहा यंदाच्या या अंकाचा विषय आहे. अनेक वैचारिक नाटके लिहिणारे नाटककार गो. पु. देशपांडे यांची विद्वत्ता, त्यांची अस्वस्थ मानसिकता यावर प्रकाशझोत टाकणारा भारतकुमार राऊत यांचा लेख दर्जेदार आहे. चिं. त्र्यं. खानोलकरांची गाजलेली कादंबरी कोंडुरायावर अनुपम बेहेरे यांनी केलेले भाष्य अप्रतिम. याशिवाय इंदिरा संत (मोहन कुलकर्णी), आचार्य अत्रे यांच्या स्मृती (मधुसूदन फाटक), श्री. ना. पेंडसे एक दादामाणूस (प्रल्हाद आवळसकर), महान विदुषी दुर्गाबाई भागवत (शैलजा पुरोहित), लेखक, समाजसुधारक र. धों. कर्वे (हेमंत पराडकर) आदी स्मरणलेख उत्तम जमून आलेत. याशिवाय नामवंत कवींच्या कविता, भावस्पर्शी कथांनी अंक सजला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची अश्विन बापट यांनी घेतलेली रंजक मुलाखत अंकात असून तिचे देखणे मुखपृष्ठ अंकाची शोभा वाढविणारे आहे.

संपादिका : हेमांगी अरविंद नेरकर

पृष्ठे : 200, मूल्य : 70/-.

मेहता मराठी ग्रंथजगत

अफाट कर्तृत्वाच्या, अदम्य जिद्दीच्या वेगळय़ा माणसांच्या विश्वात डोकावत त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या दिवाळी अंकात केला आहे. यासंबंधित सयाजी शिंदे, अजित आपटे, वेंकट अय्यर आदींनी  लिखाण आहेअनुराधा प्रभुदेसाई, भरत वाटवानी, स्वाती शिंगाडे, वामन देशपांडे मान्यवरांचे व्यक्तिपरिचय करून देणारे लेखही स्फूर्तिदायक आहेत. सतीश भावसार यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ अंकाला साजेसे.

संपादक : सुनील मेहता

पृष्ठे : 160, मूल्य : 100/-.

श्री अक्षरधन

यंदाचा दिवाळी अंक या अंकाचे सर्वेसर्वा, संस्थापक प्रा. डॉ. रा. . गुजराथी यांच्या स्मरणार्थ त्यांना समर्पित केला आहे. अंकाच्या सुरुवातीला राम नाईक, शुभदा चौकर, डॉ. सुहासिनी सतं, प्रा. अविनाश देशपांडे, प्रा. उमाकांत कामत आदी त्यांच्या निकटवर्तीयांनी  श्रद्धांजली स्वरूपात लिखाण केले आहे. याशिवाय कवितांगण संगीता अरबुने, प्रतिभा सराफ, अनुराधा नेरूरकर, ज्योती कपिले यांच्या कवितांनी सजले आहे.

संपादिका : सरिता गुजराथी

पृष्ठे : 128., मूल्य : 120/- रु.

चिंतन आदेश

यंदाचा हा दिवाळी अंक प्रभावया विषयावर आधारित आहेविविध प्रभावाचे परखड लिखाण या अंकात लेखकांनी केले आहे. अरविंद गोखले, सुरेशचंद्र पाध्ये, प्रदीप निफाडकर, अविनाश पाठक, डॉ. श्रीकांत नरूले आदींचे लेख वाचकांना अंतर्मुख करणारे आहेत. ‘सृजनस्पर्शया कवितेच्या दालनातील मान्यवरांच्या कविताही प्रभावशाली आहेत. अंकातील व्यंगचित्रेही त्या संबंधित आहेत. या अंकाचा वाचकांवर चांगला प्रभावपडेल हे नक्की.

संपादक : अभिनंदन थोरात

पृष्ठे : 232, मूल्य :  100/- रु.

 

छोटय़ांचा आवाज

बालकुमारांसाठी अफलातून धमाल मनोरंजनाचा खजिना घेऊन येणारा हा दिवाळी अंक नेहमीप्रमाणे आकर्षक झाला आहे. गिरिजा कीर, भा. . महाबळ, प्रभाकर झळके, डॉ. विजया वाड, माधव गवाणकर, प्रियंवदा करंडे, अशोक लोटणकर, बाळ पोतदार, संध्या जोशी, रेवती सप्रे आदी मान्यवरांच्या छोटय़ांना आवडतील अशा कथालेखांचा समावेश या अंकात आहे. याशिवाय कथाचित्रे, हास्यचित्रे, कॉमिक्स, शब्दकोडे आदी भरगच्च विनोदांची पेरणी बच्चेकंपनीला खिळवून ठेवणारी आहे. विवेक मेहेत्रे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ मुलांना भावणारे आहे.

संपादिका : वैशाली मेहेत्रे

पृष्ठे : 128, मूल्य : रु. 100/-

क्षत्रिय संजीवनी

या अंकात अलिबागचा इतिहास, युगांडा सफारीपालेभाज्यांचे औषधी उपयोग, झोप लागण्याकरिता घरगुती उपाय, आध्यात्मिक भोजन, स्वामींचे अस्तित्वदादर मठ आदी वाचनीय लेख आहेत. याशिवाय चौलचे देदीप्यमान शिवदत्त मंदिर’, खानाखजाना, सुगरणींचा सल्ला, वास्तुटिप्स याविषयी लिखाणाचा समावेश आहे. बाल विभागात कविता, चित्रकला स्पर्धा, गोष्टी आदी समाविष्ट केल्या आहेतहा अंक क्षत्रिय ज्ञाती सभेच्या सभासदांना विनामूल्य वाटण्यासाठी प्रसिद्ध केला आहे.

संपादक : प्रशांत मस्तकार

पृष्ठे : 140

ऊसमळा

ऊसमळा या दिवाळी अंकामध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार्‍या लेखांचा समावेश आहे. मांजरी येथील व्हिएसआयचे मार्गदर्शनपर लेख वाचनीय झाले आहेत. पूरपरिस्थतीत ऊसपीकांचे व्यवस्थापन, ऊर्जा जैवसंजीवनी, निर्यातक्षम  पिकांसाठी इनोराची उत्पादने, जनावरांमधील विषबाधा, तसेच पाडेगाव येथील ऊसकेंद्राची पूर्व हंगामी ऊस लागवड हे लेख माहितीपूर्ज्ञ आहेत. याशिवाय यशोगाथा, प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ यांच्याशी बातचीत भाग्यश्री देसाई यांचे मनोगत, कथा, ललितलेखन, कविता, राशीभविष्य, साखर उतारा असा साहित्य फराळ वाचनीय आहे.

संपादक : सुरेखा खोचीकर

किंमत : 50 पृष्ठे : 70

आपली प्रतिक्रिया द्या