
>> अरुण
माणसाचा संचार पृथ्वीवर सुरू झाला आणि दळणवळणाच्य्या आधुनिक होत जाण्य्याने त्य्यावर कसलाच निर्बंध राहिला नाही. आपल्य्या वसाहती सोडून शहरी माणसं जंगलांवर आक्रमण करू लागली. त्यापूर्वी वन-काननात राहणारे आदिवासी वनांचा निवास साधत, त्यांच्याशी मैत्री करत जगत होते. वनसंपदेच्या, पशु-पक्ष्यांचा, जलचरांचा सर्वनाश करण्याचं सत्र तेव्हा सुरू झालं नव्हतं. वनाकडून आपल्या गरजेपुरतंच घ्यावं आणि नवी रोपं रुजवून त्याचं देणं त्याला परतही द्यावं, अशी आदिम आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ प्रत्यक्षात आणणारी सुज्ञ संस्कृती गेल्या शतकभरात वेगाने लुप्त होताना दिसतेय. चार झाडं लावून अरण्य निर्माण करता येत नाही. त्यासाठी अलीकडेच दिवंगत झालेल्या शतायुषी थिमक्कांसारखा झाडामाडांना जगवणारा, त्यांना मातेची माया देणारा ध्यास लागतो.
परंतु कोटय़वधी लोकांमध्ये थिमक्कांसारखी प्रज्ञा कुटून येणार? निदान अनुकरणाने तरी काही शिकावं! पण तिथेही ठणठणगोपाळ! निसर्गचक्राची गती कुंठित करण्याचेच कार्यक्रम जास्त. मात्र त्याचा या ना त्या प्रकारे आपल्यावर उलटणारा दुष्परिणाम कसा होतो ते वातापमान आणि अनेकदा दुष्काळ तर काही ठिकाणी नको तेव‘ढटी’ पाऊस अशा गोष्टीतून सतत जाणवतंय.
मुख्यत्वे मारिशमध्ये सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मोठय़ा संख्येने दिसणाऱया ‘डोडो’ नावच्या बदकासारख्या, फारसं उडता न येणाऱया बेपक्ष्याचं अस्तित्वच नष्ट झालंय. त्याचं शेवटचं दर्शन 1662 मध्ये झालं होतं. उडण्याची क्षमता नसलेले हे पक्षी मुख्यत्वे शिकाऱयांनी म्हणजे हिंस्र पशूंनी आणि शिकार करणाऱया माणसांनीही संपवले. त्याचे विपरीत परिणाम निसर्गाच्या जैविक साखळीवर झाले.
‘डोडो-ट्री’ मानल्या जाणाऱया झाडाची गोष्ट यात विशेष. टाम्बालाकोक या झाडाला डोडो-ट्री म्हणतात. डोडो पक्षी या झाडाची फळं खायचे आणि नंतर त्याच्या विष्ठेतून पडणाऱया या झाडांच्या बियांमध्ये फलनशक्ती यायची असं सोप्या शब्दात सांगता येईल. मात्र ‘डोडो’च नष्ट (एक्स्टिंक्ट) झाल्याने, अशा प्रकारे या झाडाच्या बियांचं फलन थांबलं. अर्थातच त्यांचं प्रजोत्पादन थंडावलं.
आता जगात जी काही ‘डोडो’ झाडं आहेत ती फारच वृद्ध म्हणजे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘डोडो’ पक्षी नष्ट होण्यापूर्वीची आहेत. तीही निसर्गक्रमाने नाहीशी झाली की ‘डोडो’ जसा चित्रात उरलाय तशीच ती झाडंही ‘एक होतं डोडो ट्री’ अशा स्वरूपात केवळ फोटोमध्ये दिसतील.





























































