शेती आणि विज्ञान

213

>> शैलेश माळोदे

प्रा. गोविंदराजन पद्मनाभन. हिंदुस्थानी कृषीक्षेत्र आणि विज्ञान यांचा उत्तम मेळ घालणारे वैज्ञानिक.

“कृषी क्षेत्रात जनुक अभियांत्रिकीद्वारे विकसित करण्यात आलेले विविध टुल्स वापरले गेले पाहिजेत या मताचा आहे. माझ्या मते हिंदुस्थानमध्ये या तंत्रज्ञानाविषयी अजूनही बराच गोंधळ आहे. त्याचा वापर करून उत्पादन वाढ आणि गुणवत्ता सुधारणा शक्य आहे. एकीकडे ट्रान्सजेनिक पिकांविषयीच्या संशोधनास खूप मोठय़ा प्रमाणात मदत केली जात आहे, तर दुसऱया बाजूला त्यामधून निर्माण झालेली उत्पादने अद्याप शेतीमध्ये पोहोचलेली नाहीत. याउलट चीन याविषयी अधिक फोकस्ड आहे. अर्थात तिथेही ट्रान्सजेनिक पिकांविषयीची खूप काळजी आहे. माझ्या मते ट्रान्सजेनिक पिकांशी निगडित पर्यावरणीय सुरक्षिततेच्या मुद्दय़ाला अवास्तव महत्त्व देण्यात येतंय’’ असं रोखठोकपणे मत व्यक्त करीत 81 वर्षीय प्रा. गोविंदराजन पद्मनाभन अर्थात जी. पद्मनाभन या हिंदुस्थानच्या प्रसिद्ध जीवरसायनशास्त्र्ाज्ञ आणि जैव तंत्रज्ञानतज्ञ यांनी आपल्या स्वभावाची चुणूक दर्शविली.
त्याविषयीची आठवण सांगताना ते म्हणाले, ‘मी आय.आय. एस्सीचं संचालकपद अत्यंत नाटय़पूर्ण परिस्थितीत स्वीकारलं. मी कार्यभार स्वीकारण्याच्या आदल्या रात्री, संस्थेच्या उपकुलसचिवांचा फोन आला की, मुलांनी मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या वसतिगृहाचा जबरदस्तीने ताबा घेतला आहे. त्यावेळी खरोखरच वसतिगृहाचं शॉर्टेज होतं. संचालक म्हणून पहिली फाईल जी मी उघडली ती कर्मचारी संघटनेच्या नेत्याची होती. त्याने भ्रष्टाचार केल्याचं न्यायालयीन चौकशीत सिद्ध झालं होतं. मी दबावाला बळी न पडता कार्यवाही करून त्याला नोकरीतून दूर केलं. मला आयआयएस्सीला ‘हस्तिदंती मनोरा’ म्हणणे मान्य नव्हते. संशोधनाच्या दर्जाचा विचार करता ती संस्था तशी हवी, मात्र तिच्या संशोधनाची फळं लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक वाटत होतं.’
अशा प्रा. जी. पद्मनाभन यांचा जन्म कटप्पा (आंध्र प्रदेश) ला झाला. ते तामिळी असून त्यांचे आजोबा तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मुख्य अभियंते होते. ते म्हणतात, ‘माझ्या जन्मानंतर लगेच माझे वडील बेंगळुरूला शिफ्ट झाले. दहा वर्षांचा माझा शिक्षणाचा काळ वगळता आम्ही कर्नाटकातच राहिलोय. मी माझ्या आईच्या पोटात असताना माझे पालक केरळमध्ये राहत. थिरुवनंतपुरमच्या ग्रामदेवतेचं नाव मला देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. बी.एस्सीनंतर मी एम.एस्सीसाठी दिल्लीला गेलो. अभियंत्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या प्रा. पद्मनाभन यांनी रसायनशास्त्र्ाात पदवी प्राप्त केल्यावर इंडियन ऑग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली येथून माती रसायनशास्त्र्ाात एम.एस्सी आणि जैव रसायनशास्त्र्ाात पीएच.डी. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून 1966 साली प्राप्त केली, 1983 साली त्यांना शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक, 1991 साली पद्मश्री आणि 2003 साली पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. सध्या ते मानद प्राध्यापक म्हणून आय.आय.एस्सीत कार्यरत आहेत.
सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रामुख्यानं यकृतातील युकार्पोटिक जनुकांच्या ट्रान्सक्रिप्शनल नियमनाविषयी संशोधन केलं. हिवतापाच्या परोपजिवीविषयी त्यांच्या गटाने केलेले संशोधन पेशीय संशोधन क्षेत्रात खूपच नावाजलं गेलं. लशींच्या विकसनाबाबतही त्यांना खूप रस असून त्यांनी हिवतापरोधक अन्न घटकांविषयीदेखील संशोधन केलंय. यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘1979 सालच्या शिकागो येथील लॅबॅटिकलनंतर मी क्लोनिंगसंबंधी प्रयोगांना सुरुवात केली. त्या काळात ती एक अत्यंत व्यापक प्रक्रिया होती. जनुकांचं क्लोनिंग हा त्यावेळी एक अत्यंत ‘हॉट’ टॉपिक झाला होता. मात्र संशोधनासाठी लागणाऱया छोटय़ा छोटय़ा साधनांसाठी त्यावेळी खूप झगडावं लागलं. विविध लोकांची दाढी कुरवाळून कामं करून घ्यावी लागली. मागे वळून बघताना मला असं वाटतं की, माझे जैव विज्ञान संशोधन प्रयत्न हिरोचे वाटतील, परंतु बऱयाचदा केवळ अभिकारक मिळविण्यावर व्यतीत केलेला काळ मूर्खपणाचा वाटतो. यापेक्षा अधिक चांगलं संशोधन शक्य झालं असतं. फक्त चांगली जैव रसायनं, रेडिओ रसायनं आणि उपकरणं मात्र सहजगत्या मिळायला हवी होती. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. फक्त पुरेसा निधी आणि आयडियाजद्वारे रंजक प्रश्न निवडले की झालं.’
गेल्या काही वर्षांत जैव विज्ञानाला खूपच प्रसिद्धी लाभत आहे. सामान्य लोकदेखील याकडे आकृष्ट झाले आहेत. मात्र त्याबरोबर विविध नैतिक प्रश्नदेखील असे उभे ठाकले असल्याचं प्रा. पद्मनाभन लक्षात आणून देतात. हिंदुस्थानने अद्यापही विज्ञानात एकही नोबेल पारितोषिक का मिळवले नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ‘खरंच माझ्याकडे याचं उत्तर नाही, परंतु ती परिस्थितीचं विश्लेषण करू शकतो. कोणताही शास्त्र्ाज्ञ नोबेल पारितोषिकाचं उद्दिष्ट ठेवून संशोधन क्षेत्रात येत नाही. परंतु पुढे कश्मीरमध्ये वैज्ञानिकाला मान्यता मिळावंसं वाटतं. जैव विज्ञान क्षेत्रातली नोबेल पारितोषिकं नव्या संकल्पना, एखादं क्रांतिकारी तंत्र, विशिष्ट रेणू वा उत्पादनाकरिता दिली जातात. केवळ मूलभूत वा उपयोजित संशोधनाचा विचार यात नसतो. हिंदुस्थानच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हिंदुस्थानमध्ये मानवी जीवन सुधारण्यासाठीचं वा दुःख दूर करण्यासंबंधी काही विशेष संशोधन जैव विज्ञान क्षेत्रात झालेले नाही. कदाचित इतर क्षेत्रांतदेखील केवळ प्रा. जी. एन. रामचंद्रन यांचा अपवाद आहे. त्यामुळे तरुणांसाठी हे खुलं आव्हान आहे वैज्ञानिक नोबेलचं.
तरुणांनी खरोखरच विज्ञानात पॅशन म्हणून नवी संकल्पना तंत्र विकसित केल्यास नोबेलसाठी हिंदुस्थानचा दावा प्रबळ ठरू शकतो. प्रा. जी. पद्मनाभन यांनी लिहिलेलं पुस्तक ‘टू रिच द स्टार्स ऑर डिग द अर्थ’ आत्मकथनात्मक असून विज्ञान प्रसारद्वारे प्रकाशित या पुस्तकाचं उपशीर्षक ‘माय जर्नी थ्रू डुइंग सायन्स इन इंडिया’ आहे. हे त्यांना मार्गदर्शक ठरू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या