
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]
आपल्या देशाची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितक्या गरजा जास्त. जेव्हा या गरजा योग्य पद्धतीने पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्या गरजा नवीन समस्यांना जन्म देतात. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अतिशोषणामुळे ग्लोबल वार्मिंग, नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. म्हणजेच मर्यादित साधनसंपत्तीवर अमर्याद गरजा भागवण्याचा दबाव पडत आहे. तो उत्तम व्यवस्थेलाही बिघडवत आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे जीवन जन्मापासूनच संघर्षमय बनते आणि हा संघर्ष आयुष्याच्या शेवटपर्यंत सुरूच असतो… आजच्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त.
वाढत्या लोकसंख्येमुळे शुद्ध हवा, पाणी आणि अन्नाचा प्रश्न झपाटय़ाने वाढतो. त्यानंतर चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, नोकरी किंवा व्यवसायासाठी संघर्ष होतो. त्यामुळे समाजात दारिदय़, उपासमार, रोगराई, निरक्षरता, बालमजुरी, बेरोजगारी, अमली पदार्थांचे व्यसन, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, घाणेरडे जीवनमान, झोपडपट्टय़ा, प्रदूषण, अस्वच्छता अशा समस्या जन्माला येतात. आर्थिक विषमता झपाटय़ाने वाढत आहे. भेसळ, महागाई, फसवणूक यांसारख्या समस्या शिगेला पोहोचल्या आहेत. कारण प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्यामुळे लोकांच्या विचारधारेत सतत नकारात्मकता वाढत जाते, ज्यामुळे वाईट प्रवृत्तींना जन्म मिळतो.
‘जागतिक लोकसंख्या दिन’ दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स वर्ल्डोमीटरच्या ताज्या आकडेवारीनुसार 4 जुलै 2023 पर्यंत हिंदुस्थानची सध्याची लोकसंख्या 1,42,06,44,759 झाली आहे आणि जगाची लोकसंख्या 8,04,23,45,910 च्या वर गेली आहे. आज हिंदुस्थानची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.7 टक्के इतकी आहे, जेव्हा की हिंदुस्थानचे एकूण क्षेत्रफळ जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 2.4 टक्के आहे. कंट्री मीटरनुसार 2023 मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या दररोज 49,179 व्यक्तींनी वाढत आहे. यूएनएफपीएच्या जागतिक लोकसंख्या अहवाल 2023 नुसार, हिंदुस्थान हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. अहवालानुसार, हिंदुस्थानच्या एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोकसंख्या 15 ते 64 वयोगटातील आहे, जी कोणत्याही देशाची कार्यरत लोकसंख्या मानली जाते.
हिंदुस्थान आता जागतिक स्तरावर वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मानव विकास निर्देशांक मात्र त्या तुलनेत वाढलेला नाही. मानव विकास अहवाल 2021-22 नुसार, 191 देशांपैकी हिंदुस्थान बांगलादेश आणि श्रीलंकेनंतर 132 व्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानी लोकसंख्येच्या शीर्ष 10 टक्के लोकांकडे 77 टक्क्यांपेक्षा जास्त संपत्ती आहे. हे खरं असूनही इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात अन्नाची किंमत कमी आहे. तरीही हिंदुस्थानातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येला 2020 पर्यंत सकस आहार घेणे शक्य झाले नाही. 15-49 वयोगटातील सर्व महिलांमध्ये ऑनिमियाचे प्रमाण 2015-16 मधील (एनएफएचएस-4) 53 टक्क्यांवरून 2019-21 मध्ये (एनएफएचएस-5) 57 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2022 मध्ये हिंदुस्थान 135 व्या क्रमांकावर आहे, ज्यानुसार स्त्रिया कर्मचारी केवळ 22 टक्के आहेत. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 नुसार, बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ही देशातील सर्वोच्च रँक असलेली संस्था आहे आणि जागतिक स्तरावर 155 व्या क्रमांकावर आहे.
आईक्यूएयर या स्वित्झर्लंडस्थित एअर क्वॉलिटी टेक्नॉलॉजी पंपनीने नुकताच 2022 चा वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट प्रकाशित केला असून त्यात हिंदुस्थान हा जगातील आठव्या क्रमांकाचा सर्वात जास्त प्रदूषित देश असल्याचे समोर आले आहे. 2022 च्या जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, 2020मध्ये (पहिल्या महामारीच्या वर्षात) जागतिक वाढीमध्ये हिंदुस्थानने 5.6 कोटी नवीन अत्यंत गरीब जोडले. जागतिक बँकेच्या डेटाबेसवरून असे दिसून आले आहे की, हिंदुस्थानी जगातील सर्वात गरीब लोकांमध्ये आहेत. त्याचे 2777 डॉलरचे दरडोई उत्पन्न हे 12,263 डॉलरच्या जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. पेंद्र सरकार 1 जानेवारी 2023 पासून संपूर्ण वर्षभर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे. म्हणजे हिंदुस्थानात एवढय़ा गरीब लोकांना मोफत रेशनची गरज आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 मध्ये, हिंदुस्थान 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आहे (29.1 गुणांसह), जी हिंदुस्थानातील तीव्र भूक पातळी दर्शवते. जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये हिंदुस्थानचा क्रमांक 136 पैकी 126 वर जगातील सर्वात कमी आनंदी देशांपैकी एक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआईई) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात हिंदुस्थानातील बेरोजगारीचा दर 7.7 टक्के होता. नुकत्याच जाहीर झालेल्या 2022 च्या जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक (एमपीआई) अहवालानुसार, जगातील 111 देशांमध्ये सुमारे 120 कोटी लोक दारिदय़ रेषेखाली आहेत. उपसहारा आफ्रिका (सुमारे 579 दशलक्ष) आणि दक्षिण आशिया (385 दशलक्ष) हे विकसनशील प्रदेश आहेत, ज्यात गरीबांची संख्या सर्वाधिक आहे. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2022 नुसार, निम्म्याहून कमी हिंदुस्थानी रोजगारक्षम आहेत आणि 75 टक्के पंपन्यांनी काwशल्यांमधील अंतर नोंदवले आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गाचा ऱहास होत आहे. जैवविविधतेची हानी, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाणी आणि अन्नाची कमतरता या सर्व गोष्टी आपल्या प्रचंड आणि सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाईट झाल्या आहेत. देशात बेरोजगारीची परिस्थिती इतकी घसरली आहे की, कोणत्याही सरकारी खात्यात सफाई कामगार किंवा शिपायाची भरती असली तरी हजारो उच्चशिक्षित पदवीधर, इंजिनीअर, एमबीए, पीएचडी पदवीधारकही अर्ज घेऊन येतात. अनेक विभागांत वर्षानुवर्षे नवीन भरती होत नाही, कर्मचाऱयांची सेवानिवृत्ती सुरूच असते, तर अनेक ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱयांची नियुक्ती केली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे, तरुणांची संख्या जास्त आहे, ज्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार, व्यवसाय आणि जीवनमान उंचावण्यासाठी योग्य संधी मिळाव्यात, जेणेकरून ते उत्कृष्ट नागरिक बनून देश आणि समाजाच्या विकासात योग्य ते योगदान देऊ शकतील.
























































