टीप्स – कमी बजेटमध्ये घर सजावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण आपले घर सजविण्यासाठी इनडोअर प्लॅण्ट लावतो. हल्ली घरात छानशी रोपटी अथवा झाडे लावून घर डेकोरेट करण्याचा एक नवा ट्रेंडही आहे, परंतु या झाडांची विशिष्ट प्रकारे काळजी घेणं गरजेचं असतं. घर असो अथवा बाहेर असो, आपल्याला नेहमीच झाडांची हिरवळ आकर्षित करत असते. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही तितकंच चांगलं ठरतं. यासाठी कोणती झाडे लावावीत, या झाडांची कशी लागवड करायची याच्या काही सोप्या टिप्स.

  • या झाडांना पाणी कमी घालावे. माती ओलसर राहील इतकंच पाणी घालावं. सतत झाडाचं भांडं ओलं राहील इतकं पाणी घालू नये. तसंच एक दिवस आड पाणी घाला. सतत पाणी घालून झाडं खराब होतात.
  • ज्या झाडांना कीटक वा बुरशी कमी लागते अशाच झाडांची निवड करावी. पाथेस, डेव्हिस आयव्ही, फिलॉडेंड्रॉन यांसारख्या झाडांची यासाठी निवड करता येईल.
  • इनडोअर प्लॅण्टस्ना कमी सूर्यप्रकाश लागतो. तुमच्या घरात जिथे सूर्यप्रकाश फारसा येत नसेल तर अशाच कोपऱयामध्ये ही झाडे ठेवावीत. अन्यथा झाड सुकून जाऊ शकते.
  • झाडांची निवड करताना घराची सुंदरता व आकर्षकता वाढेल अशाच झाडांची निवड करा. यासाठी बोन्साय हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.
  • अशा झाडांची वेळोवेळी छाटणी आणि कापणी करणे गरजेचे असते. तेही त्याची आकर्षकता कायम राहील अशा प्रकारेच करावे.
  • इनडोअर प्लॅण्टस्ना खतांचीही आवश्यकता असते. मात्र खतांचा वापर योग्य माहिती घेऊन करावा. रासायनिक खत जास्त प्रमाणात झाल्यास झाड मरण्याची शक्यता असते, तर पंपोस्ट खताला मुंग्या वा इतर कीटक लागण्याची शक्यता असते.
  • इनडोअर प्लॅण्टसाठी विशिष्ट स्वरूपाच्या मातीची निवड केली पाहिजे. जी माती जास्त वेळ पाणी धरून ठेवते अशी माती यासाठी उपयोगाची नाही हे लक्षात असू द्या.
  • मातीच्या भांडय़ाला ठिकठिकाणी छिद्रं पाडून पाणी जाण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी जागा करून द्यावी. तसेच भांडय़ाखाली पाणी जमा होण्यासाठी पसरट प्लेट ठेवावी. ज्यायोगे पाण्याचा निचरा होईल.
  • झाडाची माती वेळोवेळी खणणे आणि बदलणे हे जिकरीचे काम असले तरी घर सुंदर दिसावं यासाठी ही आवड जोपासली पाहिजे.