
>> वैश्विक, [email protected]
सध्या रात्रभराच्या आकाशदर्शनाला चांगले दिवस आहेत. वातावरण बदलामुळे पूर्वीसारखं म्हणजे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी या काळात दिसायचं तसं प्रदूषणमुक्त आणि मेघमुक्त आकाश आता रात्री क्वचितच लाभतं, परंतु तरीही बराच वेळ आकाशदर्शन आणि खगोलीय छायाचित्रण (अॅस्ट्रोपह्टोग्राफी) करण्याची संधी खगोलप्रेमी अनुभवतायत. मात्र, अजून तरी (पृथ्वी वगळता) बरीचशी ग्रहमाला, संध्याकाळच्या अंधारात दिसत नाही. याचा अर्थ ही ‘ग्रहमंडल दिव्यप्रभा’ कुठे गायब झालीय असं नव्हे, तर ग्रह पाहायचे तर पहाटेपर्यंत जागावं लागेल पिंवा पहाटे लवकर उठावं लागेल. शुक्र, मंगळ, गुरू, शनी हे ग्रह नवख्या निरीक्षकांची नजर खिळवून ठेवतात. यापैकी गुरू कालपासून मीन राशीच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे, परंतु तोसुद्धा पहाटेच.
गुरू हा पृथ्वीपेक्षा सुमारे अकरापट मोठा असलेला महाग्रह. मंगळापुढची ग्रहसृष्टी वायुरूप ग्रहांची, त्यात गुरूचा क्रमांक पहिला. सूर्यापासून त्याचं अंतर सुमारे सत्त्याहत्तर कोटी किलोमीटर म्हणजे पृथ्वीपासून बासष्ट कोटी! हे एवढं अंतर पार करून कधीकाळी मानवनिर्मित यान गुरूकडे धाव घेईल याची कल्पना हा ग्रह आणि त्याचे चार महत्त्वाचे चंद्र दुर्बिणीतून पाहणाऱया गॅलिलिओनेही 1609 मध्ये केली नसेल. मात्र गॅलिलिओच्याच नावाने 1995 मध्ये गुरूकडे एक मानवनिर्मित यान गेलं आणि त्याने या ग्रहाची खूप छायाचित्रं पृथ्वीकडे पाठवली. नुसत्या निरीक्षणातून आकलन झालेल्या गुरूची ‘ओळख’ माणसाला त्यामुळे अधिक पटली. एकदा या विशाल ग्रहाचा ध्यास लागल्यावर शास्त्र्ाज्ञ थोडेच स्वस्थ बसतात! त्यांनी आणखी जय्यत तयारी करून ‘ज्युनो’ हे यान 5 ऑगस्ट 2011 रोजी गुरूच्या दिशेने धाडले. नेहमीप्रमाणेच हा अवकाशप्रवास कठीण होता. ‘गॅलिलिओ’ यान औष्णिक ऊर्जेवर चालणारं होतं, तर ‘ज्युनो’ तीन मोठय़ा ‘सोलार पॅनल्स’द्वारे सौर ऊर्जा प्राप्त करून ‘स्वच्छ ऊर्जे’वर (क्लीन एनर्जी) मार्गक्रमण करणार होतं. ‘नासा’ने केप कार्नेवल येथून सोडलेल्या या यानाची रचना ‘जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी’ने केली होती. अपेक्षा होती की, ‘ज्युनो’ सात ते दहा वर्षे कार्यरत राहील आणि आपल्याला हवी ती माहिती पाठवेल.
काय अपेक्षा होती ‘ज्युनो’कडून? यासाठी त्याच्या नावापासून सुरुवात करू. ‘ज्युनो’ ही ग्रीक कथेनुसार ज्युपिटर म्हणजे गुरूची पत्नी. त्याची काही रहस्ये तिने उघड केली अशी काहीशी कथा. तसंच पण वैज्ञानिक काम या ‘ज्युनो’च्या नावाने गुऊ ऊर्फ ज्युपिटर ग्रहाचा वेध घेणाऱया यानाला करायचं होतं. पृथ्वी सोडल्यावर त्याला पृथ्वीसह मंगळादी ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा वेग वाढवण्यासाठी करावा लागला. 9 ऑक्टोबर 2013 रोजी पृथ्वीपासून अवघ्या 560 किलोमीटर अंतरावरून पसार झालेल्या ‘ज्युनो’ने 5 जुलै 2016 रोजी गुरूच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. मला वाटतं, आपण त्यावेळी याच स्तंभातून त्याची दखल घेतली होती. मग आता पुन्हा त्याचं प्रयोजन असं की, सुरुवातीला गुरूभोवती 53 दिवसांत (पृथ्वीचे दिवस) परिक्रमा करणाऱया ‘ज्युनो’ची फेरी आता 43 दिवसांवर आली आहे आणि 2021च्या जानेवारीत ज्या मोहिमेची सांगता करण्याचं ठरलं होतं तो ‘ज्युनो’ प्रोब आता 2025च्या सप्टेंबरपर्यंत कार्यरत असणार आहे. ‘ज्युनो’वरच्या शक्तीशाली पॅमेऱयाने या ग्रहाच्या गॅनिमिड आणि युरोपा या जवळच्या उपग्रहांसह गुरूच्या दक्षिण गोलार्धात 22 अक्षांशावर असलेल्या पृथ्वीपेक्षा महाकाय वादळाचेही अप्रतिम पह्टो केवळ 4270 किलोमीटर अंतरावरून घेतले आहेत. 1665 पासून माणसाला ठाऊक असलेलं हे महावादळ आजही घोंगावत असल्याचे पुरावे आहेत. गुरूच्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून टायटॅनियमची एक सेंटिमीटर जाडीची ‘कवचपुंडलं’ धारण केलेलं ‘ज्युनो’ सतत 11 वर्षे फिरतंय!



























































