
सध्या अनलॉक प्रक्रियेमुळे दैनंदिन जनजीवन पुन्हा सुरू झाले असले तरी अजूनही कोरोना महामारीचे संकट आणि काही प्रमाणात लॉक डाऊन सुरूच आहे. अजूनही एक मोठा घटक घरूनच काम करीत आहे. ज्यावेळी कोरोना लॉक डाऊन होते त्यावेळी तर सर्व व्यवहार ठप्प असल्याने सगळेच घरी होते. या संपूर्ण कालावधीत हिंदुस्थानी जनमानसाच्या मनोरंजनाच्या पद्धतीत काही लक्षणीय बदल झाल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
हिंदुस्थानातील ग्राहकांच्या मनोरंजनाच्या पद्धतीमध्ये गेल्या पाच- सहा महिन्यांत बदललेल्या परिस्थितीत लक्षणीय बदल झाल्याचे दिसून आले आहे. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी डॉल्बीने केलेल्या एका सर्वेक्षणात हे निष्कर्ष निघाले आहेत. कोरोना महामारीमुळे घरातूनच काम करण्याची रूढ झालेली पद्धत आणि आराम करण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे नवीन व दर्जेदार कन्टेन्टसाठी तसेच सर्वोत्तम डिव्हायसेसच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वेकफिल्ड रिसर्चने (Wakefield Research) डॉल्बीसाठी चार देशांमध्ये केलेल्या नवीन जागतिक ग्राहक अभ्यासानुसार हिंदुस्थानी ग्राहक आता घरामध्येच अधिक वेळ व्यतित करत असल्यामुळे सर्वोत्तम मनोरंजनाला प्राधान्य देत आहेत.
डॉल्बी लॅबोरेटरीजच्या इमार्ंजग मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक पंकज केडिया म्हणाले. आम्हाला आमच्या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून अधिक सर्वोत्तम अनुभवांची निर्मिती करण्याचा अभिमान वाटतो. ग्राहक त्यांच्या मनोरंजनपूर्ण अनुभवांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत असताना डॉल्बी व्हिजन व डॉल्बी ऍटमॉसमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसण्यात येत आहे.
वेकफिल्ड रिसर्च येथील वरिष्ठ भागीदार नॅथन रिचर म्हणाले, आपण सर्व सध्या घरांमध्येच आहोत. व्यक्तिशः आणि व्हर्च्युअली मित्र व कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक दृढ करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करण्यासारखा दुसरा मार्ग कोणताच नसेल. लोकांना मनोरंजन आवडते आणि घरामध्ये आरामशीरपणे आनंद घेता येऊ शकेल अशा दर्जात्मक कन्टेन्टसाठी मागणीमध्ये अपवादात्मक वाढ झाली आहे. लोकांना समजले आहे की, उच्च दर्जाचा आवाज व व्हिज्युअल अनुभवाचा मोठा परिणाम दिसून येण्यासोबत पाहणे अधिक उत्साहवर्धक होते. शिवाय यामुळे मनोरंजनाचा आनंद वाढतो आणि सध्याच्या आव्हानात्मक काळादरम्यान लोकांना एकमेकांशी उत्तमपणे संलग्न होण्यामध्ये मदत होते.
हिंदुस्थानातील नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद व अहमदाबाद या सहा शहरांमध्ये हे संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा कोरोना महामारीदरम्यान कन्टेन्ट पाहण्याच्या पद्धतींमधील बदल जाणून घेण्याचा मनसुबा होता.
संशोधनामधील काही रोचक निष्कर्ष पुढीलप्रमाणे –
- कन्टेन्टमधून समाधान – कोविड-19मुळे अनेक हिंदुस्थानींनी तणाव दूर करण्यासाठी मनोरंजनाचा आधार घेतला आहे. 66 टक्के हिंदुस्थानी प्रतिसादक म्हणाले की, त्यांनी आरामासाठी या संधीचा वापर केला. 60 टक्के हिंदुस्थानी प्रतिसादक म्हणाले की, त्यांना इतरांसोबत कन्टेन्ट पाहण्याचा चांगला सामाजिक अनुभव मिळाला.
- बातम्यांपासून दूर – सध्याची स्थिती प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या निवडींबाबत दक्ष करू शकते. यामध्ये हिंदुस्थानातील 92 टक्के प्रतिसादक म्हणाले की, बातम्यांचा ते पाहत असलेल्या कन्टेन्टवर परिणाम होतो.
- 97 टक्के हिंदुस्थानी प्रतिसादकांनी वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत कन्टेन्टवरील त्यांच्या मासिक खर्चांमध्ये सरासरी 48 टक्क्यांची वाढ केली आहे.
- 88 टक्के हिंदुस्थानी प्रतिसादकांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये त्यांची स्ट्रिमिंग सेवा अद्ययावत करण्यामध्ये यापूर्वीच गुंतवणूक केली आहे.
- 96 टक्के हिंदुस्थानी प्रतिसादक पुढील 6 महिन्यांमध्ये त्यांचे मनोरंजन साहित्य अद्ययावत करण्याचे नियोजन करत आहेत.
- साहित्य अद्ययावत करण्यामध्ये सर्वोत्तम मोबाइल डिव्हाइसेसचा समावेश आहे.
- व्यापक आवाका – ग्राहक सध्या घरीच असल्यामुळे मनोरंजनासाठी खूप वेळ आहे. अनेक ग्राहकांनी यापूर्वी कधीच न पाहिलेले कन्टेन्ट पाहिले.
- 95 टक्के भारतीय प्रतिसादकांनी यापूर्वी न पाहिलेले नवीन प्रकारचे कन्टेन्ट पाहिले.
- नवीन प्रकारचे कन्टेन्ट पाहणाऱया प्रतिसादकांना विविध प्रकारच्या कन्टेन्टमधून निवड करण्याची संधी मिळाली. हिंदुस्थानमध्ये लाइव्ह म्युझिक इव्हेण्ट्स स्ट्रिमिंग करणे लोकप्रिय नवीन कन्टेन्ट ठरले (50 टक्के), त्यानंतर कॉमेडी (48 टक्के), व्हिडीओ गेम स्ट्रिमिंग (46 टक्के) आणि डीआयवाय व्हिडीओज (45 टक्के) हे होते.
- मनोरंजन पाहण्याचे विविध मार्ग – हिंदुस्थानमध्ये 29 टक्के प्रतिसादक म्हणतात की, त्यांचा स्मार्टफोन त्यांचे प्रमुख मनोरंजन डिवाईस आहे. यानंतर 22 टक्के प्रतिसादकांनी टेलिव्हिजनला, तर 20 टक्के प्रतिसादकांनी कम्प्युटरला प्राधान्य दिले.
- लहान क्रीन्स, उच्च दर्जा – ग्राहकांनी चित्रपट व टीव्ही मालिका पाहण्यासाठी विशेषतः वर्धित पिक्चर व साऊंड दर्जामध्ये रूची दाखवली आहे. हिंदुस्थानमध्ये 49 टक्के प्रतिसादकांनी वर्धित दर्जा असलेल्या चित्रपटांना मनोरंजनाच्या दोन अव्वल प्रकारांपैकी एक मानले आहे.
- आता कामासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची आवश्यकता असल्यामुळे अनेकजण वैयक्तिक उद्देशांसाठी तंत्रज्ञान ’खरेदी’ करत आहेत. 92 टक्के प्रतिसादक सामाजिक उद्देशांसाठी वर्क व्हिडीओ ऍप्लिकेशन्सचा उपयोग करत आहेत. 80 टक्के प्रतिसादक अधिककरून किंवा संपूर्ण वेळ याचा उपयोग करत आहेत.
या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, फक्त डिव्हाईसेसपुरताच नाही, तर कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेण्यामध्येही झपाटय़ाने वाढ होत आहे.






























































