लेख – रेटिनाची वृद्धत्व प्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवाला नैसर्गिकरीत्या वृद्धापकाळाचा सामना करावाच लागतो आणि डोळा हा अवयव याबाबतीत अपवाद नाही. डोळा हा कॅमेऱयासारखा आहे ज्यामध्ये दोन लेन्स सिस्टम्ससह (कॉर्निया व नैसर्गिक लेन्स) एक क्रिन (रेटिना) व एक केबल (ऑप्टिक नर्व्ह) आहे जे डोळ्यांना मेंदूशी जोडतात. डोळ्यामध्ये येणारे विविध वृद्धत्व बदल मूलभूतरीत्या नैसर्गिक असून त्याचे कोणतेच गंभीर परिणाम नाहीत. पण क्वचितच त्याचे डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम होण्यासोबत गंभीर परिणाम होऊ शकतात.
n प्रेसब्योपिया हा आजार सामान्यतः वयाच्या 40व्या वर्षी होतो. या आजारामध्ये जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसणे अवघड होऊन जाते आणि हा आजार जवळपास जागतिक स्तरावर आहे. या आजारामध्ये जवळच्या वस्तू पाहण्यासाठी लेन्सला मदत करणाऱया सूक्ष्म रचना व स्नायू कडक होतात. यामुळे नैसर्गिक लेन्स जवळच्या वस्तू पाहताना तिचा आकार बदलू शकत नाही. सामान्यतः 40 वर्षांवरील व्यक्ती बारीक अक्षरे वाचण्यामध्ये अवघड होत असल्याची तक्रार करू लागतात किंवा अक्षरे समजण्यासाठी वाचन करावयाचा पेपर डोळ्यांपासून काही विशिष्ट अंतरावर धरावा लागतो.

उपाय – सामान्यतः मोनो फोकल, बायफोकल किंवा प्रोग्रेसिव्ह लेन्सेसच्या रूपात वाचनासाठी वापरला जाणाऱया चष्मांच्या वापर करण्यास सांगितले जाते. वयाच्या 40 वर्षे ते 55 वर्षांपर्यंत प्रेसबायोपिया अधिक खालावत जात असल्यामुळे वाचनासाठी वापरल्या जाणाऱया चष्म्याचा नंबर हळूहळू वाढत जातो.

डोळ्यांमधील आणखी एक वृद्धत्व बदल म्हणजे मोतीबिंदू होणे. या आजारामध्ये लेन्सची सामान्य पारदर्शकता कमी होते आणि अपारदर्शक व पुसट बनते. मोतीबिंदूच्या प्रमाणानुसार दृष्टी अधू होण्याचे प्रमाण विभिन्न असू शकते.

उपाय – आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चष्मा बदलणे पुरेसे ठरू शकते, पण प्रगत टप्प्यावर असल्यास शस्त्रक्रिया आवश्यक आहे. यामुळे डोळे कोरडे होणे, मोठे दिसणे, लाल होणे आणि डोळे थकल्यासारखे वाटणे अशा समस्या होऊ शकतात.

कोरडे डोळे सामान्यतः वाढत्या वयासह आढळून येतात. डोळ्यांमध्ये अश्रूचे पाणी तयार होणे कमी होत जाते. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ही समस्या आढळून येते.

उपाय – बहुतांश व्यक्तींमध्ये पूरक टीअर ड्रॉप्स/ आय ल्युब्रिकंट्ससह या आजाराचा सुलभपणे उपचार करता येतो.

डोळ्याचा आणखी एक भाग ज्यावर परिणाम होऊ शकतो (सामान्यतः वयाच्या 65 वर्षांनंतर) तो भाग आहे रेटिना. या आजाराला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) म्हणतात. ज्यामध्ये रेटिनाचा मध्यभाग कमकुवत व बारीक बनतो. ज्यामुळे काही अंशी वाचन करताना दृष्टीवर परिणाम होतो. क्वचितच एएमडीचा मध्यभागी असलेल्या रेटिनामधील फ्लू रक्त संचयनावर परिणाम होऊन दृष्टीवर गंभीररीत्या परिणाम होऊ शकतो.

उपाय – सध्या नवीन इंजेक्शन थेरपीज अनेक रुग्णांना आशेचा किरण देत आहेत.

वृद्धत्वाशी संबंधित शेवटचा, पण महत्त्वाचा आजार म्हणजे काचबिंदू. डोळ्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थाचे सामान्यतः सततपणे अभिसरण होत असते. वाढत्या वयासह बाहेरील मार्ग कडक होऊन जातो.

वृद्धत्वासह डोळ्यांच्या दृष्टीमध्ये सामान्य बदल होण्याव्यतिरिक्त सुर्यप्रकाशामुळे वयाशी संबंधित बदलांमध्ये जलदपणे भर पडते. बेरी, सोयाबीन, कंदमुळे, सिमला मिरची इत्यादी सारखे ऍण्टीऑक्सिडंट्सनी युक्त पदार्थांचे सेवन केल्याने रेटिनाची वृद्धत्व प्रक्रिया कमी होते आणि वयाशी संबंधित सामान्य नुकसानापासून संरक्षण होते. संपूर्ण आयुष्यभर बाहेर जाताना अल्ट्राव्हायोलेट फिल्टर सनग्लासेसचा वापर केल्याने निश्चितच रेटिनावर प्रकाशामुळे होणारे परिणाम कमी होतात. वयाच्या 40 वर्षांनंतर नियमितपणे डोळ्यांची तपासणी आणि मधुमेह व रक्तदाबावर नियंत्रण ठेवल्याने दीर्घकाळापर्यंत डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये मदत होईल. शेवटचे म्हणजे डोळ्यांमध्ये जळजळणे, पुसट दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे किंवा इतर असामान्य लक्षणे दिसून येत असतील तर विलंब न करता ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट किंवा स्थानिक डॉक्टरांशी सल्लामसलत करायला हवा.
– डॉ. पी. सुरेश
(लेखक मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील ऑफ्थॅल्मोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.)